Home » प्रॉपर्टी गिफ्ट दिल्यानंतर पुन्हा घेऊ शकतो का?

प्रॉपर्टी गिफ्ट दिल्यानंतर पुन्हा घेऊ शकतो का?

by Team Gajawaja
0 comment
Property Gift Deed
Share

ज्या प्रमाणे तुम्ही काही गोष्टी गिफ्ट म्हणून देता त्याच प्रमाणे प्रॉपर्टी सुद्धा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून देऊ शकता. परंतु तुमच्या नावे असलेलीच संपत्ती तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.जर तुम्ही तुमचे घर, दुकान, शेती अशा काही प्रॉपर्टी एखाद्याला गिफ्टच्या रुपात दिली आहे आणि आता तुम्हाला ती पुन्हा तुमच्या नावे हवे असेल तर कायदा काय सांगतो याच बद्दल आपण जाणून घेऊयात. (Property Gift Deed)

प्रॉपर्टी गिफ्ट करणे म्हणजे मालक आपली संपत्ती आपल्या मर्जीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रांसफर करत आहे. या बदल्यात तो त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची रक्कम अथवा काहीही घेत नाही. अशातच प्रॉपर्टी गिफ्ट करण्यासाठी व्यक्तीला सेल डीड प्रमाणे गिफ्ट डीड सुद्ध तयार करावी लागते.

कोणती संपत्ती गिफ्ट करु शकतो.
गिफ्ट तुम्ही कायद्याअंतर्गच करु शकता. याबद्दलचे काही नियम आहेत. प्रॉपर्टी गिफ्ट करण्यासासंदर्भात असे म्हटले जाते की, ती केवळ गिफ्ट रुपातच तुम्ही देऊ शकता. अथवा दान करु शकता. परंतु ती प्रॉपर्टी मालकाच्या नावे असणे आवश्यक आहे.

गिफ्ट केलेली संपत्ती पुन्हा घेता येते?
कायद्यानुसार गिफ्टमध्ये मिळाली संपत्ती आपण अशीच ठेवू शकत नाही. जर गिफ्ट दिलेल्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी आपल्या मर्जीने दुसऱ्या व्यक्तीला दिली असेल आणि दुसऱ्याने ती स्विकारली असेल तर. संपत्तीच्या नव्या मालकाच्या नावे ती ट्रांसफर होते, तर सामान्य परिस्थितींमध्ये हा व्यवहार रद्द केला जाऊ शकत नाही. पण काही असाधारण परिस्थितींमध्ये असे होऊ शकते. (Property Gift Deed)

हेही वाचा- घरबसल्या बदलता येईल बोर्डिंग स्टेशन, केवळ ‘या’ सोप्प्या टीप्स करा फॉलो

कलम १२६ मध्ये काही विशेष परिस्थितींचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये गिफ्ट डीड रद्द केली जाऊ शकते. ज्या उद्देशाने तुम्ही संपत्ती गिफ्ट करत आहात तो उद्देश पूर्ण न झाल्यास दिली गेलेली प्रॉपर्टी पुन्हा घेऊ शकत. जर गिफ्ट देणारा आणि घेणारा, दोघेही त्यावर सहमत असती, एकमेकांच्या समजूतीने गिफ्ट डीडला सस्पेंड अथवा रद्द केले जाऊ शकते. जर गिफ्ट डीडवर कागदपत्रांशिवाय प्रॉपर्टी ट्रांन्सफर झालेले नसेल आणि नंतर गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीने आपला निर्णय बदलला तर अशा स्थितीत त्याच्या मर्जीने गिफ्ट डीड रद्द होऊ शकते. या व्यतिरिक्त गिफ्ट देणारा व्यक्ती मानसिक रुपात ठीक असला पाहिजे. अथवा जर तो मानसिक रुपात अस्वस्थ किंवा गिफ्ट मिळवण्यासाठी दबाब टाकत असेल तर डीडला अमान्य घोषित केले जाऊ शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.