Home » ही सोय आंघोळीची गोळी घेणा-यांसाठी !

ही सोय आंघोळीची गोळी घेणा-यांसाठी !

by Team Gajawaja
0 comment
Project Usoyaro
Share

शरीराची स्वच्छता हा पहिला नियम असतो. आई आपल्या मुलाला हा स्वच्छतेचा पहिला धडा देते, अगदी शाळेत गेल्यावरही शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात येते. कोरोना नावाच्या रोगानं तर या स्वच्छतेचे महत्त्व अधिक अधोरेखित केले आहे. तरीही काही शारीरिक स्वच्छतेकडे कानाडोळा करणारे असतातच. आंघोळ केली का, हा प्रश्न त्यांना विचारला तर, नाही, आम्ही आंघोळीची गोळी घेतली आहे, असे सांगून ते वेळ मारुन नेतात. अशाच महाभागांसाठी आता चक्क आंघोळीची गोळी नाही तर आंघोळ घालणारी मशिन बाजारात येत आहे. जपानमधील एक कंपनीनं हा अविष्कार केला असून यामध्ये फक्त 15 मिनिटात आंघोळ घालण्यात येणार आहे. आत्तापर्यंत कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी मशीनचा वापर करण्यात येत होता. मात्र माणसानाच धुवून काढणारे हे पहिलेच मशीन आहे. संबंधित कंपनी नव्या वर्षापासून ही मशीना बाजारात आणणार असून तंत्रज्ञानातील हा अविष्कार मानवी जीवन बदलणारा ठरणार आहे. आत्तापर्यंत कपड्यांचे आणि भांडी धुण्याचे मशीन बघितले होते. पण आता बाजारात माणसांना धुवून काढण्याचे मशीन बाजारात येत आहे. जपानच्या एका कंपनीने मानवी वॉशिंग मशीनचा प्रयोग यशस्वी केला आहे. (Project Usoyaro)

फक्त 15 मिनिटांमध्ये माणसाची आंघोळ होणार आहे. जपानच्या ओसाका या कंपनीनं हा अविष्कार केला आहे. ही कंपनी प्रगत स्वयंपाकघर आणि अन्य तंत्रज्ञानासाठी परिचित आहे. आता ती बाथ तंत्रज्ञानासाठी ओळखली जाणार आहे. ही कंपनी ज्या मानवी वॉशिंग मशीनवर काम करत आहे, त्याला ‘प्रोजेक्ट उसोयारो’ असे नाव देण्यात आले आहे. यात केवळ 15 मिनिटांत माणसाचे शरीर स्वच्छ करण्यात येत आहे. या मशीनचे नाव “मिराई निंगेन सेंटुकी” आहे. जपानच्या एका तंत्रज्ञान टेक्समध्ये या मशीचे प्रात्यक्षीक दाखवण्यात आले. कॅप्सूल सारखी मानवी वॉशिंग मशीन अनेक वैशिष्ट्यांसह येणार आहे. या मशीनमध्ये एक पाऊल टाकताच त्या व्यक्तीला एखाद्या फायटर प्लेनच्या कॉकपिटमध्ये शिरल्याचा भास होईल. या मशीनमध्ये माणसाला फक्त आरामात झोपायचे आहे. मग ही मशीन त्या मानवी शरीराचा ताबा घेईल. त्यातनंतर मशीनमधील जेलमधून शरीराचा मसाज कऱण्यात येईल. एखाद्या स्पा मध्ये बसल्याचा हा अनुभव असेल. यावेळी अधिक आरामदायी वाटावे म्हणून संगीतही वाजण्याची सुविधा आहे. हे मशीन मानवी शरीर आणि त्वचेनुसार स्वयंचलितपणे कार्य करणार आहे. यात फाइन बबल टेक्नॉलॉजी, मॉनिटरिंग सेन्सर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिमद्वारे व्यक्तीला आंघोळीचा वेगळा अनुभव मिळणार आहे. मशीनमध्ये एक पारदर्शक टब असून तो गरम पाण्याने भरला जाणार आहे. (International News)

=======

हे देखील वाचा : गोवा फक्त दारू, बीच पुरता नाही !

======

या पाण्यातून लहान बुडबुडे बाहेर पडतात. हे बुडबुडे फुटतात आणि त्वचेतील घाण साफ करतात. त्या दरम्यान मशीन सतत व्यक्तीच्या शरीराच्या स्थितीचे निरीक्षण करते आणि स्वयंचलितपणे पाण्याचे तापमान आणि दाब तयार करते. एवढंच नाही तर हे मशीन व्यक्तीच्या भावना देखील समजून घेते आणि त्याला दिलासा देण्यासाठी टबच्या आतील स्क्रीनवर दृश्य दाखवण्यात येतात. ओसाका ही कंपनी या मानवी बाथ मशीनवर अजून काम करत असून 2025 मध्ये हे मशीन बाजारात विक्रीसाठी आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी कंपनीनं बुकींग घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय कंपनी घरगुती वापरासाठीचे एक लहान मॉडेलही तयार करत आहे. याची किंमत कमी असून रोजच्या वापरासाठी याचा वापर शक्य होईल, अशी कंपनीला आशा आहे. ओसाका कंपनीचा हा मानवी बाथ मशीन प्रोजेक्ट ड्रिम प्रोजेक्ट आहे. या कंपनीचे चेअरमन यासुआकी ओयामा यांनी ते 10 वर्षांचे असतांना अशा प्रकारच्या मशीनची कल्पना केली होती. 1970 मध्ये एका प्रगत तंत्रज्ञान शिबिरात अशा प्रकारचे मशीन मांडण्यात आले होते. तेव्हा स्वप्नवत वाटणारे मशीन आता 2025 मध्ये ओसाका बाजारात आणत आहे. मानवी जीवन सुसह्य व्हावे यासाठी बाजारात दररोज नवनवीन उत्पादने दाखल केली जातात. त्यामध्येच या मानवी बाथ मशीनचा समावेश होणार आहे. 2025 मधील सर्वात क्रांतीकारी शोध मानला जाईल. (Project Usoyaro)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.