नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक सेंटरच्या उद्घाटनचा सोहळा मुंबईमध्ये चांगलाच गाजला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूडमधील मान्यवर तारे तारकांनी उपस्थिती लावली होती. या सर्वांत उठून दिसत होती ती आपली देशी गर्ल प्रियंका चोप्रा…अर्थात ही आपली देशी गर्ल आता परदेशी बहू झाली आहे. प्रियंका तिच्या नव-यासह, निक जोहान्ससह या सोहळ्याला उपस्थित होती. प्रियंका आता हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरली आहे. प्रियंकानं नीता अंबानी सांस्कृतिक सेंटरच्या दुस-या दिवशीच्या फॅशन शो साठी केलेला पोशाख खास ठरला. यात प्रियंकान चक्क 65 वर्ष जुनी बनारसी पटोला साडी घातली होती. अर्थात प्रियंकाच्या स्टाईलनुसार ती बनारसी साडी अतिशय बोल्ड रुपात प्रियंकान घातली होती. याच साडीवर तिनं रणबीर सिंगबरोबर तिच्या सुपरहीट गाण्यावर नाचही केला. प्रियंकाची ही बनारसी साडी तयार करण्यासाठी गेली सहा महिने कारागिर परिश्रम घेत होते. अर्थात या मोठ्या इन्व्हेन्टमध्ये प्रियंकाची आणि तिच्या लूकची झालेली चर्चा बघत त्यांची ही मेहनत कामी आल्याचे म्हटले पाहिजे. (Fashionable saree)

नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक सेंटरच्या उद्घाटनासाठी सर्व बॉलिवूड एका जागी जमा झाले होते. या सर्वात आपल्या देसी गर्लनं पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही देसी गर्ल साडीत आली होती. पण प्रियंकाचा हा साडी लूक जसा जास्तच बोल्ड होता. ही साडी बनारसी पटोला होती. महाराष्ट्रीयन येवला पैठणीसारखीच पटोला साडीही खूप महागडी साडी मानली जाते. ही साडीही हातानं तयार केली जाते. साधारणपणे तीन जणांना एक साडी तयार करण्यासाठी चार ते सात महिने लागतात. त्यामुळे त्या साडीची किंमत वाढते. पटोला लूमचे वैशिष्ट्य म्हणजे ते एका बाजूला झुकलेले असते आणि साडीवर दोन लोकांना एकत्र काम करावे लागते. काहीवेळा खास डिझाईनच्या साड्या करण्यासाठी वर्षाचाही कालावधी लागते. पटोला साडीमध्ये साधारणपणे अमूर्त रचना असते. हत्ती, मानवी आकृती, कलश, फुले, शिखरे, सुपारीची पाने आणि पोपट यांच्यासह गुजरातच्या स्थापत्यकलेने प्रेरित असलेल्या डिझाईन्स लोकप्रिय आहेत.(Fashionable saree)
गुजरात आणि अन्य भागात लग्नासाठी या साड्या खासकरुन वापरल्या जातात. अशीच सुंदर साडी प्रियंकान घातली होती. मात्र प्रियंकानं त्या साडीचे पारंपारिक रुप बदलत तिला बोल्ड रुप दिले होते. प्रियंकानं घातलेली साडी ही 65 वर्षाची जुनी साडी होती. या साडीपासून ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल सहा महिने लागल्याची माहिती आहे. अमित अग्रवाल या डिझायरनं ही साडी प्रियंकाच्या पोशाखासाठी खास निवडली होती. ही बनारसी साडी काही लाखाच्या घरात होती. या बनारसी पटोला साडीसह प्रियांकाने तिचा लूक डायमंड चोकर आणि इअरिंग्जने पूर्ण केला होता. प्रियंकानं स्वतःच या तिच्या डिझायनर साडीचं वैशिष्ट सांगितलं आहे. हा सुंदर पोशाख 65 वर्षांच्या बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीपासून बनवला गेल्याचं प्रियंकानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिवाय या साडीसाठी चांदीचा धागा वापरला असून खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंग केल्याचेही प्रियंकानं सांगितलं आहे. साडी करण्यासाठी नऊ रंग वापरण्यात आले असून वाराणसीच्या क्राफ्ट क्लस्टरमध्ये हाताने विणलेल्या विंटेज कापडांसह ही उत्कृष्ट साडी प्रियंकासाठी तयार करण्यासाठी अमित आणि त्याच्या टीमला सुमारे 6 महिने लागले आहेत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उद्घाटन समारंभात, प्रियंका चोप्राने एली साबच्या कलेक्शनमधील एक आकर्षक पीच रंगाचा चमकदार गाऊन घातला होता. तर प्रियंकाचा नवरा निक काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये दिसला.(Fashionable saree)
=======
हे देखील वाचा : कॉटनसह फॅब्रिक कपड्यांना इस्री करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
=======
बॉलिवूडपासून दूर गेलेली प्रियंका आता हॉलिवूडमध्ये सेटल झाल्यासारखी आहे. सध्या तिची आगामी वेबसिरीज ‘सिटाडेल’ 28 एप्रिल रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या मालिकेत प्रियंकासोबत रिचर्ड मॅडननेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. प्रियांका भारतातील या भेटीत आपल्या वेबसिरीजचे प्रमोशनही करणार आहे. सध्या प्रियंकाचे नाव आणखीही एका कारणामुळे हॉलिवूडमध्य गाजत आहे. प्रियांकाने सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी ब्युटी ब्रँडच्या यादीत कायली जेनर आणि सेलेना गोमेझला या हॉलिवूड ब्युटींनाही मागे टाकले आहे. प्रियंकाने अमेरिकेत तिचे रेस्टॉरंट उघडल्यानंतर सौंदर्य उद्योगातही पाऊल टाकले आहे. तिच्या लेबल या सौदर्य प्रसाधनांच्या उद्योगानं एका वर्षात 4000 कोटींहून अधिक कमाई केली आहे(Fashionable saree). यासोबत मुंबईत येण्यापूर्वी प्रियंकानं बॉलिवूडविषयी तिखट प्रतिक्रीया देऊनही खळबळ उडवून दिली होती. एकूण ही देसी गर्ल पूर्णतः परदेसी झाली असली तरी तिचा कडक स्वभाव मात्र कायम आहे.