Home » Priya Marathe : अतिशय फिल्मी आहे प्रिया-शंतनूची प्रेमकहाणी

Priya Marathe : अतिशय फिल्मी आहे प्रिया-शंतनूची प्रेमकहाणी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Priya Marathe
Share

आजच्या दिवसाची सकाळ मराठी मनोरंजनविश्वासाठी खूपच वाईट ठरली. केवळ कलाकारच नाही तर प्रेक्षकांसाठी देखील आजचा दिवस एक दुःखद आणि वाईट बातमी घेऊन आला. मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय गुणी अभिनेत्री प्रिया मराठेचे आज सकाळी ४ वाजता दुःखद निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. प्रिया मागील बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झगडत होती. यातच तिचा अंत झाला. मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेच्या अशा अकाली निधनामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. दोन वर्षांपूर्वीच प्रियाने आरोग्याचे कारण देत मालिकेला रामराम केले होता. मात्र, प्रिया मराठे हिच्या कर्करोगाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. (Entertainment News)

प्रियाला कॅन्सर झाल्यानंतर तिचा नवरा शंतनू सतत तिच्यासोबत होता. तिच्या संपूर्ण उपचारामध्ये त्याने तिची साथ कधीच सोडली नाही. या आजारामध्ये तो प्रियाची सर्व कामं करत होता. तिची सेवा करणे, तिची काळजी घेणे सर्वच त्याने अगदी प्रेमाने केले. एक उत्तम नवरा म्हणून त्याने तिची सर्व जबाबदारी घेतली आणि ती प्रामाणिकपणे पूर्ण देखील केली. प्रिया आणि तिचा पती अभिनेता शंतनू मोघे हे मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडपे होते. या दोघांना कमालीची फॅन फॉलोविंग देखील होती. विविध कार्यक्रमांमध्ये, मुलाखतींमध्ये प्रिया आणि शंतनू कायम दिसायचे. या दोघांना एक आदर्श कपल म्हणून देखील ओळख होती. मात्र तुम्हाला माहित आहे, का या दोघांची जोडी जितकी सुंदर आहे, तितकीच सुंदर त्यांची प्रेमकहाणी आहे. (Marathi News)

शंतनू हा मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा. शंतनू आणि प्रिया या दोघांनी २४ एप्रिल २०१२ मध्ये लग्न केले. दोघांची लव्हस्टोरी एकदम हटके आणि फिल्मी आहे. प्रियाच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली झी मराठी वाहिनीवरील अतिशय गाजलेल्या ‘या सुखांनो या’ या मालिकेपासून. या सुखांनो या ही मालिका प्रियाच्या करियरचा महत्वाचा टप्पा होती. या मालिकेत तिने विक्रम गोखले यांच्या मुलीची पावनीची भूमिका साकारली होती. या मालिकेत कामं करणारी प्रियाची सहकलाकार शर्वरी लोहकरेमुळे प्रिया आणि शंतनूची पहिल्यांदा भेट झाली. (Todays Marathi Headline)

Priya Marathe

प्रिया मूळची ठाण्याची मात्र ती शूटिंगसाठी अंधेरीत राहायची. प्रियाची रूममेट होती अभिनेत्री शर्वरी लोहकरे. शर्वरीमुळेच शंतनूसोबत तिची ओळख झाली. शंतनू आणि शर्वरी ‘आई’ या मालिकेमध्ये एकत्र काम करत होते. मालिका संपण्याच्या वेळेला एक मस्त पार्टी ठेवण्यात आली होती. याच पार्टीमध्ये शंतनू आणि प्रिया यांची मैत्री झाली. त्यादिवशी या दोघांनी भरपूर गप्पा मारल्या, भरपूर वेळ एकमेकांसोबत घालवला. पुढे याच मालिकेत शंतनू देखील होता. त्यामुळे ते एकमेकांसोबत अधिकचा वेळ घालू लागले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. अशातच शंतनूला त्याचे प्रियावर प्रेम असल्याची जाणीव झाली आणि त्याने त्याच्या भावना प्रियाला सांगायचे ठरवले. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दीड वर्षे डेट केल्यानंतर शंतनूने फिल्मी स्टाईलने प्रियाला प्रपोज केले. (Top Marathi Headline)

शंतनू प्रियाला फिल्मसिटीमधील एका जागी घेऊन गेला. चांदण्याच्या प्रकाशात गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलने शंतनूने प्रियाला प्रपोज केले होते. प्रियाचे सुद्धा शंतनूवर प्रेम असल्याने तिने देखील लगेच होकार दिला. मात्र, शंतनू आणि प्रियाने त्यांचे नाते गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या या नात्याबद्दल काहीच माहित नव्हते. पण, एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान शंतनूने स्टेजवरच प्रियाचे नाव घेतले आणि घरच्यांना, सगळ्यांनाच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल समजले. दोन्ही कुटुंबाकडून होकार असल्यामुळे त्यांचे लग्न थाटामाटात पार पडले. २४ एप्रिल २०१२ रोजी दोघं बोहल्यावर चढले. इतकंच नव्हे तर अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर दोघांनीही व्यवसायातही जम बसवला. शंतनू आणि प्रियाने एक कॅफे सुरू केला होता. मात्र आता प्रियाच्या या अकाली निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान प्रियाच्या करियरबदल सांगायचे झाले तर तिने अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये कामं केले होते. खासकरून खलनायकी भूमिकांमध्ये तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. तिच्या निगेटिव्ह भूमिका देखील कमालीच्या गाजल्या. प्रियाने तिच्या करियरची सुरुवात ‘या सुखांनो या’ या मालिकेतून केली. त्यानंतर ती ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमध्ये झळकली. (Top Trending News)

=========

Ganesh Chaturthi : गणपती म्हणून सुपारी का पूजतात?

=========

हिंदी मालिकांमध्ये तिची सुरुवात ‘कसम से’ या मालिकेतील ‘विद्या बाली’ या भूमिकेपासून झाली. पुढे ती ‘पवित्र रिश्ता’मध्ये ‘वर्षा’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’मध्ये ‘ज्योती माल्होत्रा’च्या भूमिकांमध्ये दिसली. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत प्रियाने साकारलेली ‘भावनी राठोड’ ही नकारात्मक पण मोठी आणि मुख्य भूमिका देखील खूपच गाजली. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत तिने ‘गोदावरी’ची भूमिका साकारली होती. यासोबतच प्रियाने अनेक नाटकांमध्ये देखील कामं करत आपला नावलौकिक वाढवला. तिची ‘कोण म्हणतं टक्का दिला’ आणि ‘अ परफेक्ट मर्डर’ ही नाटकं लोकप्रिय झाली. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.