जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून तीसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी यांचे खासगी आयुष्य नेहमीच लाइमलाइट पासून दूर असते. अदानी हे नेहमीच आपल्या पत्नीला त्यांच्या आयुष्याचा आधारस्तंभ मानतात. अदानी यांनी एका मुलाखतीत असे सांगितले होते की, त्यांच्या यशासाठी अदानी यांच्या पत्नीने त्यांचे करियर दाव्यावर लावले होते. त्यांनी आपल्या लग्नासंदर्भात ही सांगितले होते. त्यांनी असे म्हटले होते की, जेव्हा ते प्रीति यांना लग्नापूर्वी पहिल्यांदा भेटले तेव्हा ते खुप शांत होते.(Priti Adani)
गौतम अदानी आणि प्रीति यांचे अरेंज मॅरेंज झालेले आहे. त्यांच्या भेटीबद्दल अदानी असे सांगतात की, ते सुरुवातीला खुप लाजाळू होते. मी तर एक अशिक्षित वक्ती पण ती डॉक्टर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार असे सांगितेल जाते की, त्यांचे लग्न घरातील मोठ्या मंडळींनी ठरवले होते.
प्रीति यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा जन्म मुंबईतलाच. त्यानंतर त्या अहमदाबादला गेल्या. त्यानंतर काही काळासाठी आपल्या परिवारासोबत अमेरिकत सुद्धा राहिल्या आहेत. प्रीति या अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी शासकीय डेंटल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटल, अहमदाबाद मधून डॉक्टरचे शिक्षण घेतले. परंतु लग्नानंतर त्यांना आपले करियर सोडावे लागले होते. लग्नानंर १९९६ मध्ये त्या अदानी यांच्या एनजीओ अदानी फाउंडेशनच्या चेअरपर्सन झाल्या.
आपल्याला आपले करियर सोडावे लागले याचे दु:ख प्रीति यांना नव्हते. आपल्या नवऱ्याच्या ६० व्या वाढदिवासानिमित्त त्यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ३६ वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला… मी माझ्या करियरला माझ्यापासून वेगळे केले आणि गौतम अदानी यांच्यासोबत एक नवा प्रवास सुरु केला. आज, जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मला अत्यंत सन्मानित आणि स्वत:चा गर्व वाटतो.(Priti Adani)
हे देखील वाचा- सौदी अरेबियात अब्जाची उलाढाल?
जेव्हा आपले करियर सोडून अदानी यांना दिला पाठिंबा
ऐवढे मोठे साम्राज्य उभं करण्यासाठी अदानी यांना आपल्या पत्नीकडून खुप साथ मिळाली. ते असे सांगतात की, प्रीति ही माझा आधारस्तंभ आहे. ती घराव्यतिरिक्त अदानी फाउंडेशन सुद्धा सांभाळत आहे. पेशाने ती एक डॉक्टर ही आहे. तिने आपले करियर सोडून मला नेहमीच पाठिंबा दिला. तिने परिवाराला सांभाळले. मुलांना मोठं केल. जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा तिने फाउंडेशनची जबाबदारी आपल्या हाती घेतली.
आपल्या पत्नीचे कौतुक करत त्यांनी पुढे असे म्हटले की, आज मी खरंच संतुष्ट आहे की, प्रीति ही फाउंडेशनसाठी सर्वाधिक काम करत आहे. रोज ७-८ तास तेथे देते. प्रीतिच्या हाताखाली फाउंडेशनची खुप मोठी प्रगती झाली आहे.
जेव्हा अदानी फाउंडेशनची स्थाना झाली होती तेव्हा त्यासाठी केवळ दोन कर्मचारीच होते. परंतु आज फाउंडेशनकडून असा दावा केला जात आहे की, ते पूर्ण वर्षभरात जवळजवळ ३२ लाख लोकांची मदत करतात.