चीनला मागे टाकत भारत लवकरच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. मात्र तुम्ही अशा एखाद्या देशाची कल्पना करु शकता का, जेथे लोकसंख्या केवळ २७ आहे? बहुतांश जणांच्या हे कल्पनेबाहेर आहे. परंतु असा एक देश इंग्लड जवळच असून त्याचे नाव सीलँन्ड असे आहे. तो इंग्लडच्या सफोल्क बीच पासून जवळजवळ १० किमी अंतरावर आहे. जो खंडर झालेल्या समुद्रातील किल्ल्यावर वसला आहे. हा किल्ला दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटेनकडून बनवण्यात आला होता.(Principality of sealand)
ब्रिटेन द्वारे तो खाली केल्यानंतर त्याला मायक्रो नेशन म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सीलँन्डवर विविध लोकांनी ताबा मिळवला होता. दरम्यान, जवळजवळ १३ वर्षांपूर्वी ९ ऑक्टोंबर २०१२ रोजी रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वत:ली सीलँन्ड्सचा प्रिंस घोषित केले होते. रॉय बेट्सच्याा मृत्यूनंतर या मायक्रो नेशनवर त्याचा मुलगा माइकल याचे शासन आहे. मायक्रो नेशन अशा देशांना बोलले जाते ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाही. म्हणजेच ते कोणत्याच देशाचा हिस्सा नसतात. सीलँन्डचे एकूण क्षेत्रफळ १ किमीचा चौथा हिस्सा म्हणजेच २५० मीटर आहे. दरम्यान, अत्यंत वाईट स्थितीत पोहचलेल्या या किल्ल्याला सीलँन्डसह रफ फोर्टच्या नावाने ही ओळखले जाते.

कोठुन येतात पैसे?
सीलँन्ड, समुद्रात केवळ २५० मीटर पसरलेला आहे. अशातच येथील लोकांजवळ आपले जीवन जगण्यासाठी कोणतेही संसाधन नाही. त्यानंतर सीलँन्ड संबंधित बातम्या जेव्हा व्हायरल झाल्या तेव्हा जगातील लोकांना त्या बद्दल कळले. तेव्हा त्या देशाला खुप दान केले गेले. यामुळेच तेथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्य रुळावर आले. विकीपिडीयावर ‘प्रिंसिपॅलिटी ऑफ सीलँन्ड’ (Principality of sealand) बद्दलची माहिती मिळते. या व्यतिरिक्त विविध सोशल साइट्सवर या लहान देशाचे पेज सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत. येथे लोक फिरण्यासाठी येतात, तेव्हा कुठे त्यांना पैसे मिळतात. या मायक्रो नेशनचे स्वत:चे हेलीपॅड ही आहे.
हे देखील वाचा- जगातील सर्वाधिक महागडे फूड्स, एका बर्गरची किंमत ४.५ लाख रुपये
मान्यता नसलेल्या देशांमध्ये भले ही सीलँन्ड सर्वाधिक लहान देश आहे. परंतु जगातील सर्वात लहान देश वेटिकन सिटी आहे. युरोपीय कंट्री वेटिकल सिटी, इटलीची राजधानी रोमच्या मधोमध वसलेले आहे. याचे क्षेत्रफळ ०.४४ स्क्वेअर किलोमीटर म्हणजेच अर्ध्या किमीपेक्षा ही लहान आहे. येथे पोप यांचे शासन आहे.