स्वीडनमध्ये नोबेल पारितोषिक समारंभ नुकताच थाटात झाला. अल्फ्रेड नोबेल यांच्या नावानं देण्यात येणा-या या पुरस्काराच्या वितरणाचा सोहळा स्टॉकहोम, स्वीडन येथे झाला. यावेळी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. या नोबेल पारितोषिक समारंभात स्वीडिश राजघराण्यातील सर्व सदस्य उपस्थित होते. मात्र या सर्वात एका प्रमुख सदस्य अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती, ती सदस्य म्हणजे, स्वीडनची राजकुमारी सोफिया. (Princess Sofia)

राजकुमारी सोफिया या समारंभाला उपस्थित नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. गेल्या काही दिवसात स्वीडनच्या या राजकुमारीच्या नावाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. कारण एपस्टाईन फाईलमध्ये राजकुमारी सोफियाचेही नाव आल्याची माहिती आहे. जेफ्री एपस्टाईन हा एक कुख्यात अमेरिकन फायनान्सर होता. अल्पवयीन मुलींचे शोषण आणि तस्करीसाठी त्याच्यावर खटला चालवण्यात आला, मात्र त्याला शिक्षा होण्यापूर्वीच तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या एपस्टाईन प्रकरणात युरोपमधील मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ब्रिटन राजघराण्यातील राजकुमार अँड्र्यू यांचेही नाव या फाईलमध्ये आले आहे. (International News)
ब्रिटन राजघराण्यानं राजकुमार अँड्र्यू यांच्यावर कारवाई करत त्यांना राजघराण्याबाहेर काढले आहे. आता स्वीडनची राजकुमारी सोफिया हिचेही नाव या एपस्टाईन फाईलमध्ये आल्यावर तिच्यावरही कारवाई करण्यात आली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. एका सामान्य घराण्यातील मुलगी ते राजकुमारी, स्वीडनच्या राजगादीची वारसदार असा प्रवास करणा-या सोफियाला एपस्टाईन प्रकरणाचा फटका बसणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. स्वीडनची राजकुमारी सोफिया ही कायम चर्चेत असते. शाही समारंभासोबत राजकुमारी सोफिया अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होते. मात्र हिच राजकुमारी नोबेल पारितोषिक समारंभामध्ये दिसली नाही, त्यामुळे तिच्याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. (Princess Sofia)
स्वीडनच्या राजघराण्यानं मुद्दामहून राजकुमारी सोफियाचे नाव या समारंभाच्या यादीतून काढल्याची चर्चा सुरु झाली. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनसोबतच्या तिच्या पूर्वीच्या संबंधांच्या बातम्या समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी, ब्रिटनचे राजकुमार अँड्र्यू देखील एपस्टाईन वादात अडकले होते. प्रिन्स अँड्र्यूवर अल्पवयीन व्हर्जिनिया गिफ्रेशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप झाल्यानंतर त्याचे शाही पद गेले. त्यांच्यानंतर एपस्टाईन वादात अडकणारी सोफिया ही राजघराण्यातील दुसरी सदस्य बनली आहे. राजकुमारी सोफिया आणि जेफ्री एपस्टाईन यांच्यासोबतच्या बातम्या स्वीडिश वृत्तपत्रात आल्यावर तिथे खळबळ उडाली आहे. सोफिया, मार्गदर्शक असलेल्या एहनबॉम हिच्यामार्फत २००५ मध्ये एपस्टाईनला भेटल्याची माहिती आहे. (International News)
तेव्हा सोफिया न्यू यॉर्कमध्ये एक नवोदित अभिनेत्री म्हणून काम करत होती. एपस्टाईननं सोफियला कॅरिबियन बेटांवर पाठवल्याचेही या बातम्यांमध्ये सांगण्यात आले आहे. हा सर्व खुलासा झाल्यामुळेच राजकुमारी सोफियाच्या विरोधात आता स्वीडनमध्ये वातवरण तयार झाले आहे. स्वीडनची राजकुमारी सोफिया ही प्रिन्स कार्ल फिलिप आणि डचेस ऑफ वर्मलँड यांची पत्नी आहे. राजकुमाराबरोबर लग्न करण्यापूर्वी सोफिया एक ग्लॅमर मॉडेल आणि रिअॅलिटी टीव्ही स्पर्धक होती. सोफियाचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे. तिचे आईवडिल हे मार्केटिंग मॅनेजर आणि सल्लागार म्हणून काम करत होते. (Princess Sofia)
मेरी आणि ऑस्कर यांच्या तीन मुलींमधील सोफिया ही दुसरी मुलगी आहे. २० वर्षाची असतांना सोफियाला ‘स्लिट्झ’ या स्वीडिश पुरुषांच्या मासिकासाठी मॉडेल म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली. या फोटोशूटमध्ये सोफियानं बिकिनी घातली होती आणि तिच्या शरीराभोवती एक साप गुंडाळला होता. या फोटोमुळे सोफिया लोकप्रिय झाली, पण तिच्यावर तेव्हा स्वीडनमध्ये मोठी टीकाही झाली. त्यानंतर सोफियाने मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. ‘पॅराडाईज हॉटेल’ या रिॲलिटी टीव्ही मालिकेत तिला प्रवेश मिळाला. यात अविवाहित लोक एका आलिशान हॉटेलमध्ये एकत्र राहतात आणि शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या उद्देशाने एकमेकांसोबत जोड्या बनवतात. सोफिया अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. २००५ मध्ये सोफिया न्यू यॉर्कला गेली. तिने एका पिझ्झेरियामध्ये वेट्रेस म्हणून आणि योग प्रशिक्षक म्हणूनही काम केले. मात्र अभिनय क्षेत्रात योग्य संधी न मिळाल्यामुळे ती मायदेशात परतली. पण या न्यू यॉर्कच्या मुक्कामात तिची जेफ्रीसोबत ओळख झाल्याची माहिती आहे. (International News)

स्वीडनमध्ये परत आल्यावर सोफियानं स्टॉकहोम विद्यापीठात पदवी घेतली. येथेची तिची भेट राजकुमार कार्ल फिलिप यांच्यासोबत झाली. या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर सोफिया आणि कार्ल फिलिप यांच्यावरही टीका झाली. सोफियाचा आत्तापर्यंतची कारकिर्द त्याला कारणीभूत ठरली. पण या सर्व टीकाकारांकडे दुर्लक्ष करीत राजकुमार कार्ल यांनी सोफियासोबत लग्न केले. त्यानंतर सोफियाला राजकुमारीचा दर्जा मिळाला. आता या जोडप्याला चार मुले आहेत. सध्या सोफिया राजघराण्याची कर्तव्य, चार मुलांची काळजी यासोबत अनेक धर्मदाय संस्थांमध्ये काम करत आहे. ती ‘प्रोजेक्ट प्लेग्राउंड’ या संस्थेची सह-संस्थापक आहे. त्यातून सोफिया दक्षिण आफ्रिकेतील वंचित मुलांना मदत करते. सोबतच तिनं ‘प्रिन्स कार्ल फिलिप अँड प्रिन्सेस सोफिया फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. (Princess Sofia)
========
हे देखील वाचा : Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !
========
राजकुमारी सोफिया सोफियाहेमेट या रुग्णालयाची मानद अध्यक्षा देखील आहे. कोरोना महामारीच्या काळात याच रुग्णालयात स्वयंसेवक म्हणून तिने काम केले आहे. या सर्वांमुळेच चाळीस वर्षाच्या या राजकुमारीला आता स्वीडनच्या राजगादीचा वारस मानण्यात येत होते. मात्र तेवढ्यातच एपस्टाईनचे भूत पुन्हा बाहेर आल्यामुळे राजकुमारी सोफिया संकटात सापडली आहे. तिच्या या जेफ्री एपस्टाईन प्रकरणामध्ये सहभाग आहे किंवा नाही, यबाबत स्पष्ट माहिती येत नाही, तोपर्यंत राजकुमारी सोफियाला राजघराण्यातील कार्यक्रमापासून बाजुला ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
