सोशल मिडियामध्ये सध्या दुबईच्या राजकुमारीच्या घटस्फोटाच्या बातम्या रंगल्या आहेत. दुबईच्या या राजकुमारीनं आपल्या पतीला चक्क सोशल मिडियावर तलाक दिला आहे. हे करतांना राजकुमारीनं मला आज खूप आनंदी वाटत असल्याचा शेराही लावला आहे. राजकुमारी शेखा महारा ही दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची मुलगी आहे, शेख मोहम्मद बिन रशीद हे संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्षही आहेत. त्यांच्या मुलीनं थेट सोशल मिडियावर दिलेल्या या तलाकमुळे सर्वत्र खळबळ उडाली. राजकुमारी शेखा महारा ही तिच्या सौंदर्यासाठीआणि संपत्तीसाठी ओळखली जाते. मात्र तिच्यासोबत, सौदी अरेबिया, मोरोक्को, जॉर्डन येथील राजकुमारीही चर्चेत आल्या आहेत. या सर्व राजकुमारी सौंदर्य आणि त्यांच्याकडील बेशुमार संपत्तीसाठी ओळखल्या जातात. (Princess Of Country)
दुबईची राजकुमारी शेखा महारा बिंत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हिने तिचे पती बिन मोहम्मद बिन राशिद बिन मना अल मकतूम यांना थेट सोशल मिडियावरुन तिहेरी तलाक दिला. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली. दुबईच्या राजकुमारीने तिच्या पतीवर धोका दिल्याचा आरोप केला आहे. या वर्षी मे महिन्यात या जोडप्याला मुलगाही झाला आहे.
अशावेळी राजकुमारीच्या या निर्णयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. राजकुमारी शेखा महारा हिच्याकडे मोजदाद करता येणार नाही, एवढी संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. सोशल मिडियावर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. फक्त शेख महारा नाही तर अनेक अरब राजकुमारी त्यांच्या बेशुमार संपत्तीमुळे आणि सौदर्यानं ओळखल्या जातात. त्यांच्या जिवनातही असेच चढउतार आले आहेत. (Princess Of Country)
त्यातील एक प्रमुख नाव म्हणचे राजकुमारी अमीरा अल तावील. सौदी अरेबियाच्या या सुंदर राजकुमारीची वयाच्या १८ व्या वर्षी शाळेच्या पेपरसाठी मुलाखत घेत असताना राजकुमार अलवालीद बिन तलाल यांच्याबरोबर ओळख झाली. राजकुमार अलवालीद बिन हे तिच्यापेक्षा २८ वर्षांनी मोठे होते. या लग्नानंतर २०१३ मध्ये राजकुमारीनं घटस्फोट घेतला. २०१८ मध्ये, तिने एमिराती अब्जाधीश खलिफा बिन बत्ती अल मुहाई यांच्याबरोबर लग्न केले. महिलांच्या हक्कांसाठी राजकुमारी अमीरा नेहमी पुढे असते. राजकुमारीकडे ३२ अब्ज डॉलर्स संपत्ती असल्याची माहिती आहे. राजकुमारी अमिरा हिंदू, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मांची अभ्यासक आहे. (Princess Of Country)
शेखा अल मायासा बिंत हमाद बिन खलिफा अल थानी म्हजेच राजकुमारी अल मायासा ही कतारचे राजे तमीम बिन हमाद अल थानी यांची बहीण आहे. या राजकुमारीकडे २.४ अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती आहे. तिला महागड्या कलाकृती विकत घेण्याचा शौक आहे. शेखा अल-मायसा यांनी ड्यूक विद्यापीठ, यूएसए मधून राज्यशास्त्र आणि साहित्यात पदवी प्राप्त केली आहे. शेखा अल-मायसा यांनी रीच आउट टू एशिया या एनजीओची स्थापनाही केली आहे. ही संस्था आशियातील नैसर्गिक आपत्तीमधील पिडीतांना मदत करते. शेखा अल-मायसा या कतार संग्रहालयाच्या आणि दोहा फिल्म इन्टिट्यूटच्या अध्यक्षा आहेत.
====================
हे देखील वाचा : एआय सौंदर्यवतीही आली !
====================
शेखा अल-मायसा यांनी पॉल गॉगुइनचे व्हेन विल यू मॅरी? हे जगातील सर्वात महागडे पेंटिंग विकत घेतल्याचे सांगितले जाते. या राजकुमारीनं शेख जसिम बिन अब्दुलअजीझ अल थानी यांच्याशी विवाह आहे.यानंतर मोरोक्कोच्या राजकुमारी लल्ला सलमा यांचे नाव घेतले जाते. राजकुमारी सलमा या मोरोक्कोचे राजे मोहम्मद यांच्या सहाव्या पत्नी आहेत. सौदर्यवती राजकुमारी म्हणून त्यांची ओळख असली तरी राजकुमारी सामाजिक कार्यात पुढे असते. अभियंता असलेली राजकुमारी कर्करोग, एचआयव्ही पिडीतांसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देते. तिची संपत्ती १.५ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. (Princess Of Country)
जॉर्डनची राजकुमारी अमान बिंत हुसेन ही सुद्धा सोशल मिडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. जॉर्डनचे राजा हुसेन आणि राणी नूर यांची ती मुलगी आहे. राजकुमारी अमानने वॉशिंग्टनमध्ये शिक्षण घेतले आहे. अमेरिकन विद्यापीठातून तिनं समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. राजकुमारी इमानचे पहिले लग्न उद्योगपती झैद आझमी मिर्झा यांच्याशी झाले होते. राजकुमारीनं घटस्फोट घेतला असून जोसेफ रोलॅंड याक्स यांच्याबरोबर दुसरा विवाह केला आहे. राजकुमारीला दोन मुलं आहेत. या राजकुमारीकडेही अब्जो संपत्ती असून तिचेही सोशल मिडियावर हजारो फॉलोअर्स आहेत.
सई बने