सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2017 मध्ये रियाधमधील एका परिषदेत निओम शहराची घोषणा केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण मुक्त निओम शहराची घोषणा झाली आणि जगभरातील गर्भश्रीमंतांना प्रिन्स मोहम्मद यांनी या शहरात येण्यासाठी आमंत्रण दिलं. निओम या शब्दाचा अर्थच नवीन भविष्य असा होतो. प्रिस मोहम्मद यांनी या प्रकल्पातून सौदी अरेबियाला तेलाच्या अर्थकरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून निओम शहराकडे बघितले गेले. (Prince Mohammed bin Salman)
वाळवंटात असे आधुनिक शहर उभारणं हे कदापिही शक्य नाही, असे प्रिन्स मोहम्मद यांना अनेकवेळा सुचवण्यात आले. मात्र प्रिन्स आपल्या हट्ट्वार कायम राहिले. या प्रकल्पासाठी बांगलादेश, पाकिस्तानसह, श्रीलंका आणि भारतातूनही मोठ्या प्रमाणात मजूर सौदीला गेले. मात्र ज्या भागात निओम शहर उभारण्यात येत आहे, तेथील विषम हवामान आणि प्रकल्पाची अवघडता यामुळे अनेक मजूरांचा मृत्यू झाला. 21 हजाराहून अधिक कामगार या प्रकल्पाच्या उभारणीत मारले गेल्याचा अंदाज आहे. याप्रकल्पाला मृत्यूचा सापळा म्हणूनही ओळखले जाऊ लागले. या सर्वात सौदीच्या खजिन्यावरही निओम प्रकल्पाचा बोजा वाढला, निओमला पांढरा हत्ती अशीही ओळख मिळाली. वास्तवामध्ये हा प्रकल्प 2025 मध्ये पूर्णत्वास येईल अशी आशा प्रिन्स मोहम्मद यांना होती. मात्र निओममध्ये रोज होत असलेल्या अपघातांमुळे त्याच्या पूर्णत्वाची तारीख बरीच पुढे गेली आहे. प्रिन्स मोहम्मद यांना आता त्यांच्याच देशात विरोध सहन करावा लागत आहे. या सर्वात वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी प्रिन्स मोहम्मद यांनी निओम सिटीच्या कामातून 20 टक्के कर्मचा-यांची सुट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. (International News)
यामुळे प्रिन्स मोहम्मद यांनीही आपल्या स्वप्नवत शहराच्या निर्मितीपासून चार हात दूर रहाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा स्वप्नातील प्रकल्प असे वर्णन होत असललेल्या निओम शहराचा प्रोजेक्ट डब्यात जाण्याची शक्यता अधिक दिसत आहे. आधीच हा प्रकल्प त्याच्या अवाढव्य खर्चामुळे टीकेचे लक्ष होत आहे. आता त्यात आता निओम प्रकल्पातील 1000 कर्मचा-यांना कामावरुन काढून टाकल्याची बातमी आहे. ही संख्या प्रकल्पावर काम करणाऱ्या एकूण कामगारांच्या 20 टक्के एवढी असल्यामुळे पुन्हा एकदा निओम शहरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सौदी अरेबियाच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर 170 किलोमीटर लांबीच्या द लाइन शहरात हे सर्व कर्मचारी काम करत होते. निओम प्रकल्पाचाच हा एक भाग आहे. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे हे निओम शहर 2,63,000 हेक्टरमध्ये पसरलेले आहे. या प्रकल्पाची घोषणा केल्यावरच यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. (Prince Mohammed bin Salman)
प्रिन्स मोहम्मद यांनी या प्रकल्पाची घोषणा केल्यावर वैयक्तिक मोठी गुंतवणूक या प्रकल्पावर केली. शिवाय सौदी अरेबियाचा $1 ट्रिलियन सार्वजनिक गुंतवणूक निधी या प्रकल्पाला मिळत आहे. परंतु प्रिन्स मोहम्मद यांना या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येईल, अशी अपेक्षा होती. पण परदेशी गुंतवणूकदारांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवल्यामुळे निओम प्रकल्प सौदी अरेबियासाठी अडचणीचा ठरला आहे. न्यू यॉर्कच्या आकारापेक्षा 33 पट मोठा आणि आधुनिक सोयींनी सुसज्ज असे हे निओम शहर घोषणा झाले तेव्हापासून वादात सापडले. या प्रकल्पामध्ये 2023 पर्यंत 15 लाख देशविदेशातील नागरिक रहाण्यासाठी येतील, अशी अपेक्षा होती. पण या प्रकल्पाचा पहिला टप्पा असलेला 170 किमीचा पहिल्या योजनेचीच किंमत चारपटीनं वाढला. (International News)
================
हे देखील वाचा : Dalai Lama : दलाई लामांना भारताने आश्रय तर दिला, पण चीनमुळे …
==============
सध्या हा खर्च सौदीच्या जीडीपीच्या 25 पट पेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. यावरुन निओमनं सौदीला किती मोठा आर्थिक फटका दिला आहे, याची कल्पना येते. वास्तविक प्रिन्स मोहम्मद यांनी जे निओमचे चित्र काढले होते, ते एका स्वप्ववत शहराचेच आहे. पण या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी ज्या परिस्थितीतून कामगार जात आहेत, ती खूप मोठी अडथळ्याची शर्यत आहे. आता या प्रकल्पाच्या जागेत खराब रस्ते, अपुरी वीज आणि कुशल कामगारांचा अभाव यासारख्या अनेक समस्या आहेत. या प्रकल्पाच्या सीईओनेही राजीनामा दिला आहे. या प्रकल्पावर सल्लागार देणाऱ्या इंटरनॅशनल मॅककिन्से अँड कंपनीवरही योग्य सल्लागार न दिल्याचा आरोप आहे. मुख्य म्हणजे, याच निओम शहरात 2034 च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. जर हा सर्व प्रकल्पच गुंडाळला गेला तर या स्पर्धाही अन्यत्र कराव्या लागणार आहेत. (Prince Mohammed bin Salman)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics