Home » प्राईम व्हिडीओने केली आपली पहिली कायद्यावर आधारित मालिका ‘गिल्टी माइंड्स’ची घोषणा

प्राईम व्हिडीओने केली आपली पहिली कायद्यावर आधारित मालिका ‘गिल्टी माइंड्स’ची घोषणा

by Team Gajawaja
0 comment
गिल्टी
Share

श्रिया पिळगावकर आणि वरूण मित्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेली पहिली कायद्यावर आधारित मालिका ‘गिल्टी माइंड्स’ ची घोषणा प्राईम व्हिडीओने आज केली. निर्माती, दिग्दर्शिका शेफाली भूषण आणि जयंत दिगंबर सामळकर यांनी सहदिग्दर्शन केलेली ही कायदा सुव्यवस्थेवर आधारित मालिका दोन महत्वकांक्षी वकिलांचा प्रवास दाखवते.

यामधील एक अतिशय सरळमार्गी प्रामाणिक वकील आहे तर दुसरा एका प्रतिष्ठित कायदे कंपनीमध्ये काम करणारा परंतु काळे धंदे करणारा वकील आहे.

====

हे देखील वाचा: कपिल शर्माच्या ‘शो’वर जाॅन अब्राहमने केल मोठं वक्तव्य, म्हणाला…

====

या मालिकेमध्ये नम्रता शेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेन्जामिन गिलानी, वीरेंद्र शर्मा, दीक्षा जुनेजा, प्रणय पचौरी, दीपक कालरा आणि चित्रांगदा सात्रुपा यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून करिष्मा तन्ना, शक्ती कपूर आणि सुचित्रा कृष्णमूर्ती हे पाहुणे कलाकार आहेत.

प्राईम व्हिडिओच्या मिर्झापूर या मालिकेत श्रियाला प्रेक्षकांनी यापूर्वीच पाहिले आहे. त्याच वेळी, वरुण मित्रा जलेबी आणि तेजसच्या स्टार कास्टचा एक भाग आहे. या शोचे दिग्दर्शन शेफाली भूषण आणि जयंत दिगंबर सामलकर यांनी केले आहे.

करिश्मा तन्ना, शक्ती कपूर आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांसारखे कलाकार या शोमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती करण ग्रोव्हर, अंतरा बॅनर्जी आणि नावेद फारुकी यांनी केली आहे.

====

हे देखील वाचा: ‘RRR’च्या यशानंतर कंगना झाली ‘SS Rajamauli’ची फॅन, म्हणाली- तुम्ही भारतीय सिनेमाचे महान दिग्दर्शक

====

दोन तात्विक दृष्ट्या भिन्न वकिलांच्या या न्यायालयीन नाट्याचे करण ग्रोव्हर हे निर्माते आहेत व अंतरा बॅनर्जी आणि नावेद फारुकी हे सहनिर्माते आहेत. भारतात व २४० अन्य देशा- प्रदेशांमध्ये राहणारे प्राईम व्हिडीओ चे सभासद २२ एप्रिल २०२२ पासून या अमेझॉन ओरिजिनल सिरीजचा आनंद घेऊ शकणार आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.