राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळालेल्या काही खास भेटवस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत का ? जर या भेटवस्तू खरेदी करायच्या असतील तर पुढच्या काही दिवसात ही सूवर्णसंधी तमाम भारतीयांना उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपतींना मिळालेल्या निवडक २५० भेटवस्तूंचा सोमवारपासून लिलाव करण्यात येणार आहे. या मौल्यवान भेटवस्तूंमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रॉक आर्ट पेंटिंग आणि भगवान बुद्धाची मूर्ती यांचा समावेश आहे. (Prime Ministers Gifts In Treasure House)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या वेबसाइटला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी या वेबसाइटला नुकतेच लॉन्च केले आहे. यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रॉक आर्ट पेंटिग हे सर्वात महाग असणार आहे. या पेंटिंगची मूळ किंमत ४,०२,५०० रुपये आहे. या पेंटिंगमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पोर्ट्रेट आहे, या चित्रात सुभाषचंद्र बोस त्यांच्या प्रतिष्ठित लष्करी गणवेशात, खंबीरपणे उभे असलेले दिसत आहेत. या पेंटिंगचे वजन १४.१५ किलो आहे. यात ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेअर येथे नेताजींनी पहिल्यांदा भारतीय तिरंगा फडकवल्याच्या ऐतिहासिक घटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्मृतिचिन्ह काढण्यात आले आहे.
ई-लिलावासाठी उपलब्ध असलेली आणखी एक वस्तू म्हणजे झाडाखाली बसलेली भगवान बुद्धांची मूर्ती. बिहारमधील बोधगया येथील महाबोधी मंदिर या प्राचीन बौद्ध मंदिरातून ही भेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळाली असल्यामुळे ती अधिक अमूल्य झाली आहे. हे स्मृतिचिन्ह ८२,५०० रुपयांच्या मूळ किंमतीवर बोलीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मिळालेली सुंदर ट्रॉफी २,७०० रुपयांच्या मूळ किंमतीत लिलावासाठी उपलब्ध आहेत. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना भेट देण्यात आलेल्या माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याची किंमत ३,१०० रुपयांपासून बोलीसाठी ठेवण्यात आली आहे. लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या या भेटवस्तू राष्ट्रपती भवन संग्रहालयात लोकांच्या पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. (Prime Ministers Gifts In Treasure House)
राष्ट्रपती किंवा पतंप्रधान अन्य देशांच्या दौ-यावर गेल्यावर त्यांना अनेक मुल्यवान भेटी मिळतात. या वस्तू त्यांना सरकारच्या तोषखान्यात जमा कराव्या लागतात. साधारण ३० दिवसात या भेटवस्तू जमा होतात. त्यानंतर संबंधित अधिकारी भेटवस्तूच्या मूल्याचे मूल्यांकन करतात. नियमानुसार कोणत्याही भेटवस्तूचे मूल्यमापन मूल्य ५००० रुपयांपेक्षा कमी असेल तर ती वस्तू ज्याला मिळाली आहे, त्यांना परत केली जाते. अर्थात त्यांना ही भेटवस्तू जर आपल्या जवळ हवी असेल तर त्याच्यावर आक्षेप घेतला जात नाही. (Prime Ministers Gifts In Treasure House)
==================
हे देखील वाचा : ब्रिटनजवळ इस्लामिक राज्य !
================
माजी राष्ट्रपती एपीजी अब्दुल कलाम यांनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक वस्तू या तोषखान्यात जमा केल्या होत्या. त्या वस्तूंचे मुल्य ठरवून त्यांचा लिलाव करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी अशाप्रकारच्या भेटवस्तूंचा लिलाव सुरू केला. २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा पहिला लिलाव केला. तेव्हा १५०० हून अधिक भेटवस्तू निवडल्या गेल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये २५०० हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला.
महान शास्त्रज्ञ आणि देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल यांच्या भेटवस्तूंचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या सर्वच भेटवस्तू लिलावासाठी दिल्या. त्यातून उभारलेल्या निधीला त्यांनी कल्याणकारी योजनांमध्ये दिले होते.
आयएएस अधिकारी एमव्ही राव यांनी कलाम यांच्या साधेपणाचे एक उदाहरण सांगितले आहे. २०१४ मध्ये एपीजे अब्दुल कलाम एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. त्याची प्रायोजक ‘सौभाग्य वेट ग्राइंडर’ नावाची कंपनी होती. या कंपनीकडून अब्दुल कलाम यांना ग्राइंडर भेट म्हणून देण्यात आला. पण त्यांनी ही भेट स्वीकारण्यास नकार दिला. खूप विनवणी केल्यानंतर कलाम यांनी भेट स्वीकारली, पण दुसऱ्याच दिवशी कलाम यांनी त्या ग्राइंडरचे पैसे चेकनं पाठवून दिले. पण कंपनीनं तो चेक जमा केला नाही. तेव्हा तो चेक लवकरात लवकर चेक जमा करा अन्यथा ग्राइंडर परत पाठवू, असा संदेश अब्दुल कलाम यांनी कंपनीला पाठवला. मग कंपनीनं चेक जमा केला तरी त्याचा फोटो काढून ती फ्रेम कंपनीमध्ये अभिमानानं लावण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या अशाच काही भेटवस्तू लिलावातून जनतेला घेता येणार आहेत. (Prime Ministers Gifts In Treasure House)
सई बने