Home » Modi : पंतप्रधानांचा ताफा! जाणून घ्या मोदींच्या ताफ्यातील गाड्यांबद्दल

Modi : पंतप्रधानांचा ताफा! जाणून घ्या मोदींच्या ताफ्यातील गाड्यांबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Modi
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील नव्हे तर जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान आणि नेते म्हणून ओळखले जातात. सध्या मोदी सतत चर्चेत येत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात चालू असणाऱ्या ‘टेरिफ’ वादामुळे मोदींवर सतत जगभरातील मीडियाची आणि सामान्य लोकांची नजर आहे. मोदींची लोकप्रियता इतकी आहे, की कायम लोकं त्यांच्याबद्दल विविध गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. (Modi News)

मोदींचे वैयक्तिक आणि व्यायसायिक जीवन कसे असते? ते हे दोन्ही जीवन जगताना कसा समतोल साधतात? आदी अनेक गोष्टी सगळ्यांनाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. यातलीच अजून एक गोष्ट म्हणजे, जेव्हा जेव्हा मोदी कुठे जातात तेव्हा त्यांच्यासोबत किती आणि कोणत्या गाड्या असतात? त्यांचा ताफा कसा चालतो? (Narendra Modi)

आपण जेव्हा मोदींना त्यांच्या ताफ्यासोबत बघतो तेव्हा आपल्याला जाणवते की देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा अतिशय कडक आणि कठीण असल्याचे जाणवते. मोदींसोबत अनेक मोठमोठ्या आणि महागड्या आपल्याला पाहायला मिळतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी फीचर्सने सुसज्ज कार व कमांडोंच्या तुकड्या तैनात केल्या जातात. (Marathi News)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात अनेक हाय लेवल आर्मर्ड कारचा समावेश असतो. पंतप्रधानांसाठी सामान्य कारऐवजी, आर्मर्ड आणि बुलेटप्रूफ कार तयार केली जातात. त्यांची सुरक्षा ही देशाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांच्या ताफ्यातील गाड्या केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचे उदाहरण नाहीत तर त्या जगातील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक मानल्या जातात. पंतप्रधानांच्या कारमध्ये कोणती सेफ्टी फिचर्स असतात हे कधीच सांगितलं जात नाही. मात्र, तरीही या कारबाबत अनेक बातम्या येत असतात. आज आपण मोदींच्या ताफ्यात कोणकोणत्या गाड्या आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. (Todays Marathi Headline)

Modi

रेंज रोव्हर सेंटिनेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वापरले जाणारे रेंज रोव्हर सेंटिनेल ही एक अतिशय सुरक्षित आणि स्टायलिश एसयूव्ही गाडी आहे. ज्याची किंमत तब्बल १० कोटी रुपये आहे. यात ५.० लिटर Supercharged V8 इंजिन दिले गेले आहे, जे ३७५ बीएचपीची पॉवर देते. या एसयूव्हीला ० ते १०० किमी/ताशी वेग गाठण्यासाठी केवळ १०.४ सेकंद लागतात. या गाडीचा टॉप स्पीड १९३ किमी/ताशी आहे. या कारमध्ये एक आर्मर्ड बॉडी शेल आणि रन-फ्लॅट टायर्स आहेत, जे टायर पंक्चर झाल्यास देखील ८० किमी/ताशी वेगाने ५० किमी पर्यंत धावू शकतात. ही एसयूव्ही विशेषतः स्फोट आणि गोळीबारापासून संरक्षण देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. (Top Marathi Headline)

टोयोटा लँड क्रूझर
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात असलेली टोयोटा लँड क्रूझर ही एक अतिशय पॉवरफुल आणि सुरक्षित एसयूव्ही कार आहे. या गाडीची किंमत २ कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. यात ४.५ -लिटर डिझेल इंजिन आहे, जे २६० बीएचपी पॉवर आणि ६५० एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार बुलेटप्रूफ प्लेटिंग आणि ग्लासने सुसज्ज आहे, तसेच त्यात ब्लास्ट प्रोटेक्शन सारखे विशेष सेफ्टी टेक्नॉलॉजी देखील सामील केली गेली आहे. (Latest Marathi Headline)

मर्सिडीज-मेबॅक एस650 गार्ड
मर्सिडीज-मेबॅक एस६५० गार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात महागड्या आणि सुरक्षित कारपैकी एक आहे, ज्याची किंमत तब्बल १२ कोटी रुपये आहे. यात ६.० -लिटर ट्विन टर्बो V12 इंजिन आहे, जे ६३० bhp पॉवर निर्माण करते. या कारमध्ये VR10 लेव्हलची सुरक्षा आहे, जी जगातील सर्वोच्च बुलेटप्रूफ सुरक्षा श्रेणी मानली जाते. ही कार हँड ग्रेनेड आणि AK-47 सारख्या शस्त्रांपासून देखील संरक्षण करते. यात ब्लास्ट-प्रूफ चेसिस आणि विंडो ग्लास आणि इन-बिल्ट ऑक्सिजन सप्लाय सिस्टम सारखे फीचर्स देखील आहेत. २०२१ मध्ये, पंतप्रधान मोदी रशियाच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी ही कार वापरली होती. एका माहितीनुसार, Mercedes Maybach S650 ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेन कार आहे. मात्र, ही अधिकृत माहिती नाही. (Top Trending News)

========

Donald Trump : या भारतीयापुढे ट्रम्प नितीची हार !

========

BMW ७ सिरीज हाय सिक्युरिटी एलआई
BMW ७ सिरीज Li ही एक प्रतिष्ठित आणि पॉवरफुल कार आहे, जी अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळापासून पंतप्रधानांच्या सुरक्षा काफिलाचा भाग आहे. या कारमध्ये ४.४ लिटर ट्विन टर्बो V8 इंजिन आहे, जे 450+ bhp ची शक्ती देते. त्याची किंमत सुमारे १० कोटी असल्याचे सांगितले जाते. (Top Marathi News)

पंतप्रधानांच्या ताफ्यात त्यांच्या विशेष कार सारख्याच दोन डमी कारही चालतात. या ताफ्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे जॅमर आहे. ज्यावर अनेक अँटेना बसवलेले असतात. जॅमरच्या अँटेनामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला १०० मीटर अंतरावर ठेवलेली स्फोटके निकामी करण्याची क्षमता असते. ताफ्यात धावणाऱ्या सर्व वाहनांमध्ये एनएसजी शूटर कमांडो तैनात असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या ताफ्यात सुमारे १०० जणांची सिक्यूरिटी टीम असते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.