सहज आणि सोयीमुळे, देशभरातील करोडो लोक रोजच्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. यामुळेच रेल्वेला भारताची लाईफ लाईन देखील म्हटले जाते. कारण गरीबांपासून ते श्रीमंतापर्यंत, प्रत्येकजण प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतो. विशेषत: उन्हाळ्याच्या सुट्टीत रेल्वे प्रवाशांची संख्या अधिकच वाढते. याचे कारण म्हणजे, भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरलेले आहे. कमी अंतर असो वा जास्त, रेल्वे देशातील बहुतांश भागात आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की रेल्वे बनवण्यासाठी किती खर्च येतो? फक्त एका इंजिनची किंमत जाणून तर तुम्हाला धक्का बसेल. (Price of Train)

ज्या भागात रस्ते नाहीत, तिथेही रेल्वे रुळ आहेत. याशिवाय लांबच्या अंतरावर जायचे असेल, तर रेल्वेमध्ये आरामात झोपण्याची व्यवस्था असते. त्यामुळेच रेल्वेमध्ये प्रवास करणे, ही लोकांची प्राथमिकता असते. ज्यांच्याकडे वेळेची कमतरता नसते, ते लोक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.
जेव्हा एखादी नवीन कार किंवा बाईक बाजारात येते, तेव्हा लोक त्यांच्या वैशिष्ट्यांपासून ते किंमतीपर्यंत सर्वकाही जाणून घेण्यात रस दाखवतात. अशा परिस्थितीत, तुम्ही ज्या रेल्वेमधून प्रवास करता त्या रेल्वेची किंमत किती असेल याची कल्पना केलीय कधी? जाणून घेऊया रेल्वे बनवण्यासाठी किती खर्च येतो. (Price of Train)

ट्रेनचा प्रत्येक डबा आणि त्याच्या सोयीनुसार रेल्वेची किंमत ठरलेली असते. अशा परिस्थितीत जनरल बोगी, स्लीपर आणि एसी कोचचे दर वेगवेगळे आहेत.
जनरल पॅसेंजर रेल्वेची किंमत
या रेल्वेची किंमत सुमारे पन्नास ते साठ कोटी रुपयांपर्यंत जाते. बाकी रेल्वेच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे, कारण पॅसेंजर रेल्वेमध्ये सुविधाही कमी असतात. (Price of Train)

हे देखील वाचा: जेव्हा अनिल कपूर यांना जॅकी श्रॉफ यांनी एक दोन नाही तर तब्बल १७ वेळा लगावली होती थोबाडीत
एक्सप्रेस रेल्वेची किंमत
या रेल्वेला सुमारे २४ डबे असतात, ज्याची किंमत वेगवेगळी आहे. एक्सप्रेस रेल्वेचा प्रत्येक डबा बनवण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च येतो. अशा स्थितीत प्रत्येक डब्यानुसार या रेल्वेची किंमत ४८ कोटी रुपयांपर्यंत जाते. (Price of Train)

इंजिनची किंमतही असते भलीमोठी
जर तुम्ही रेल्वेच्या इंजिनची किंमत यासोबत जोडली, तर रेल्वेची किंमत आणखी वाढेल. रेल्वेचा सर्वात महाग भाग म्हणजे, त्याचे इंजिन. एका इंजिनची किंमत सुमारे वीस कोटी रुपये आहे. (Price of Train)