Home » भारतातील राष्ट्रपती भवन उभारण्यामागील इतिहास तुम्हाला माहितेय का?

भारतातील राष्ट्रपती भवन उभारण्यामागील इतिहास तुम्हाला माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
President house
Share

देशाच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रोपती मुर्मू निवडल्या गेल्या आहेत. तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ हा २४ जुलै रोजी समाप्त झाला. परंतु देशाचे सर्वोच्च संविधानिक पद असणारे शासकीय निवास हे तेवढेच भव्य आहे जेवढा त्याचा इतिहास. कारण हे राष्ट्रपती भवन उभारण्यासाठी १७ वर्षांचा कालावधी लागला होता. राष्ट्रपती भवन हे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटि व्हॉइसरायचे शासकिय निवास होते. १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथून देशाची राजधानीला नवी दिल्लीत हलवण्यात आले तेव्हाच राष्ट्रपती भवनाचे काम सुरु झाले होते.(President house)

कोणी उभारले राष्ट्पती भवन?
राष्ट्पती भवन उभारण्यामागील एक खास किस्सा आहे. खरंतर इंग्रजांना दिल्लीत अशी एक इमारत उभारायची होती जी दशकच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ते एक आकर्षणाचे स्थान होईल. त्यासाठी रायनी हिलला सर्वाधिक महत्व दिले गेलेय राष्ट्रपती भवनाचा नकाशा हा प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुकलाकार एडविन लँडसीयर लुटियंस यांनी तयार केला होता. लुटियंस यांनी हा नकाशा हर्बट बेकर यांच्याकडे सोपवला. त्यांच्या देखरेखीखाली राष्ट्रपती भवन उभारणीचे काम सुरु झाले. सुरुवातीला राष्ट्रपती भवन पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले होते. पण ते उभारण्यासाठी तब्बल १७ वर्षांचा कालावधी लागला. याच्या उभारणीसाठी रायसीना हिल आणि मालचा गावातील ३०० लोकांची जवळजवळ ४ हजार हेक्टर जमिन हडपण्यात आली.

राष्ट्रपती भवनासह संसद भवन आणि त्याच्या आजूबाजूच्या शासकीय इमारतींची उभारणी सुद्धा त्यांनीच केली होती. जवळजवळ २ लाख वर्ग फूटच्या कारपेट परिसरात राष्ट्रपती भवन तयार करण्यासाठी ४५ लाख विटांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये निवासासह राष्ट्रपती कार्यालय आणि अन्य कर्मचाऱ्यांचे निवास ही तयार करण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की, राष्ट्रपती भवनाच्या उभारणीसाठी ७० कोटींहून अधिक विटा आणि ३० लाख दगडांचा वापर करण्यात आला होता. त्याच्या उभारणीच्या दरम्यान १ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च आला होता.(President house)

राष्ट्रपती भवन देशाच्या वास्तुकलेचा एक अभूतपूर्व नमूना आहे. राष्ट्रपती भवन चार मजली असून त्यात ३४० खोल्या आहेत. राष्ट्पती भवनाची सर्वाधिक मोठी ओळख म्हणजे सेंट्रल डोम. हा डोम लोकांना ऐतिहासिक सांची स्तूपाची आठवण करुन देतो. राष्ट्रपती भवनात असलेल्या खांबांवर घंट्यांचे डिझाइन करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाच्या मार्बल हॉलमध्ये किंग जॉर्ज पंचम आणि महाराणी मेरी यांचा फोटो सुद्धा आहे. महाराणीचे चांदीचे सिंहासन सुद्धा येथे आहे.

हे देखील वाचा- PGB म्हणजे काय? फक्त निवडक लोकच का होतात राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड जाणून घ्या अधिक

President house
President house

येल्लो आणि ग्रे ड्राइंग रुम नक्की काय आहे?
राष्ट्रपती भवनाच्या आतमध्ये दोन ड्राइंग रुम आहेत. यामध्ये एक यल्लोआणि दुसरा ग्रे ड्राइंग रुम नावाने ओळखले जाते. यामध्ये येल्लो ड्राइंग रुमचा वापर हा छोटेखानी कार्यक्रमांसाठी केला जातो. जर एकच मंत्री शपथ घेणार असतील तर तो शपथविधी येथे होतो. या व्यतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य लहान राजकीय कामांसाठी या हॉलचा वापर केला जातो. तर ग्रे ड्राइंगरुमचा वापर अतिथींच्या स्वागतासाठी केला जातो.

तर राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलची भव्यतेची जगभरात चर्चा आहे. या हॉलमध्ये २ टन पेक्षा अधिक वजन असलेले झुंबर लावण्यात आले आहे. इंग्रजांच्या काळात या कक्षाला सिंहासन कक्ष असे म्हटले जात होते. तेव्हा व्हॉइराइसचे आणि व्हॉइरायसीनचे दोन सिंहासन लावण्यात येत होती. परंतु स्वातंत्र्यानंतर फक्त एकच खुर्ची लावण्यात येऊ लागली. या हॉलचा वापर राजकीय कार्यक्रम आणि पुरस्कार वितरणासाठी केला जातो. या हॉलमध्ये गौतम बुद्ध यांची मुर्ती सुद्धा आहे. या हॉलची खासियत अशी की, राष्ट्रपतींच्या खुर्चीपासून जर सरळ रेष ओढल्यास ती राजपथावरुन थेट इंडिा गेटच्या मधोमध जाऊन मिळेल.

हे देखील वाचा- एथलीटच्या खेळातील संघर्ष ते खासदारकीची शपथ, जाणून घ्या पीटी उषा यांचा जीवनप्रवास

राष्ट्रपती भवनातील बॅक्वेंट हॉल हा भव्य आहे. या हॉलमध्ये १०४ लोक बसू शकतात ऐवढी जागा आहे. यापूर्वी या हॉलला स्टेट डायनिंग हॉलच्या नावाने ओखळले जात होते. त्यानंतर त्याला बँक्वेट हॉल असे नाव दिले आहे.या हॉलमध्ये सर्व माजी राष्ट्रपतींचे फोटो भिंतीवर लावण्यात आले आहेत. तसेच भिंतीवर सुंदर कोरिवकाम ही पहायला मिळते.(President house)

राष्ट्रपती भवनातील १४ एकर जागेवर पसरलेले मुगल गार्डनमध्ये जम्मू आणि जम्मू आणि काश्मीरच्या मुघल गार्डन्स, ताजमहालच्या आजूबाजूच्या बागा आणि अगदी भारत आणि पर्शियातील लघुचित्रांपासून प्रेरित आहे. राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीला लागून असलेल्या विशाल आयताकृती उद्यानाच्या या अतिशय सुंदर भागात शोभेच्या वनस्पती आणि कारंजे यांच्या व्यतिरिक्त फुलांच्या गालिच्यांनीही भुरळ घातली आहे. येथे झाडे लावण्याचे काम 1928 मध्ये सुरू झाले जे सुमारे वर्षभर चालले. अतिशय सुंदर दृश्य असलेल्या या बागेच्या मध्यभागी ट्युलिप फुलांनी सजवलेले पाण्याचे सुंदर तलाव आहे. सुवासिक वेली सर्वत्र पसरतात आणि फुलांवर भरपूर फुलपाखरे येतात, म्हणून याला फुलपाखरू उद्यान असेही म्हणतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.