Home » 2025 मध्ये होणा-या महाकुंभाची तयारी सुरु

2025 मध्ये होणा-या महाकुंभाची तयारी सुरु

by Team Gajawaja
0 comment
Mahakumbh Mela
Share

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ मेळा (Mahakumbh Mela) होत आहे. या कुभमेळ्यासाठी तब्बल 15 कोटीहून अधिक भाविक प्रयागराजमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये देशभरातले आणि जगभरातूनही भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच या महाकुंभमेळ्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी प्रथम रेल्वेनं हालचाल सुरु केली असून महाकुंभ मेळ्याच्या दरम्यान 800 अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. याशिवाय संपूर्ण प्रगायगराजमध्ये उड्डानपुलांचे काम चालू आहे. यामुळे करोडो भाविक एकाच दिवशी आले तरी त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या उड्डानपुलांची उभारणी करण्यात येत आहे. तसेच येणा-या भाविकांची राहण्याची चांगली सुविधा होण्यासाठी हॉटेलही उभारण्यात येत आहे. ही सर्व विकासकामे 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.(Mahakumbh Mela)  

2025 मध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभाला 15 कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या भाविकांची प्रवासाची सुविधा योग्य पद्धतीनं होण्यासाठी रेल्वेनं तयारी सुरु केली आहे. 837 कोटी रुपयांचे बजेट या महाकुंभ मेळ्यासाठी तयार केले आहे. त्यातून 800 नव्या रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. या सर्व रेल्वेगाड्या महाकुंभ मेळा (Mahakumbh Mela) स्पेशल अशा नावानं चालवण्यात येणार आहेत. कुंभ स्पेशल ट्रेन सुरू झाल्यामुळे देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं प्रयागराजमध्ये येऊ शकतात. या सर्व विशेष ईशान्य रेल्वेच्या प्रयागराज जंक्शन, सुभेदारगंज, छिवकी, नैनी, रामबाग आणि उत्तर रेल्वेच्या प्रयागराज संगम, प्रयाग आणि फाफामौ रेल्वे स्थानकांवरून चालवल्या जाणार आहेत. रेल्वेनं आतापासूनच यासाठी विशेष टीम तयार केली आहे. 2019 च्या महाकुंभात काम केलेल्या कर्मचा-यांचा यात समावेश आहे. रेल्वेमार्गाची उपलब्धता आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांना राहण्यासाठी विशेष शेडही उभारण्यात येणार आहेत. त्याचेही काम सुरु झाले आहे. यासर्वात प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असेल. त्यामुळे उत्तरप्रदेशमधील सगळ्याच रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही बसवण्यात येत आहेत. (Mahakumbh Mela) 

महाकुंभ 2025 (Mahakumbh Mela) पूर्वी प्रयागराजला एक स्मार्ट सिटी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रयागराज शहराच्या रस्त्यांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. याशिवाय शहरात रेल्वे ओव्हरब्रिज आणि उड्डाणपूल, वाहनतळ, पक्के घाट आदी कामांचीही सुरुवात करण्यात आली आहे.  याबरोबरच प्रयागराजमध्ये महाकुंभाच्या दरम्यान दिवसरात्र भाविकांची ये-जा राहणार आहे. त्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांवरील पथदिवे नव्यानं लावण्यात येणार आहे. तसेच या पथदिव्यांचे खांबेही सुशोभित करण्यात येणार आहेत. या खांबांवर रंगीबेरंगी एलईडी पट्ट्या बसवण्यात येणार आहेत. यासर्वात प्रयागराज शहराचे सौदर्यही लक्षात घेण्यात येत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरील चौकामध्ये विशेष प्रकारची चित्रे काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये पौराणिक कथांमधील चित्रांचा समावेश असणार आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाकडून मेट्रो रेल्वेच्या 44 किलोमीटर लांबीच्या मार्गही विकसीत करण्यात येत आहे. या मेट्रोच्या मार्गावर असलेल्या सर्व थांबे हे मंदिराच्या आसपास असतील याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना प्रयागराजमधील कुठल्याही मंदिरात जाण्यास सुविधा होणार आहे. यासर्वात करोडोच्या संख्येनं येणा-या भाविकांचे नियोजन जेवढे मोठे आहे, तेवढीच शहराची स्वच्छताही महत्त्वाची असणार आहे. 2025 मध्ये होणा-या या महाकुंभाला करोडो भाविक आले तरी, शहराची स्वच्छता कमी होणार नाही, यासाठीही प्रशासन आत्तापासून काळजी घेत आहे. त्यासाठी शहरातील घाटांच्या आसपास बंदिस्त असे नाले बांधण्यात येत आहेत.आरोग्य विभागही सतर्क झाला असून या दरम्यान भाविकांना वैद्यकीय सुविधा मोफत पुरवण्याची तयारी सुरु आहे. प्रयागराजमध्ये आता पंचतारांकित हॉटेलचीही उभारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.  प्रयागराज मध्ये महाकुंभसाठी परकीय भाविकही मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्या सर्वांसाठीच आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेल उभारण्याचीही तयारी सुरु आहे. (Mahakumbh Mela)  

========

हे देखील वाचा : आषाढी एकादशी का साजरी केली जाते? जाणून घ्या वारीचे महत्व आणि माहिती

========

प्रयागराजमध्ये 2025 मध्ये महाकुंभ (Mahakumbh Mela)होत आहे. त्याचवेळी अयोध्येतील राममंदिराचे काम पूर्ण होणार असून भव्य असे राममंदिर रामभक्तांना पाहता येणार आहे. त्यामुळे महाकुंभाला (Mahakumbh Mela) येणारे भाविक अयोध्येतही जाणार आहेत. या सर्वामुळे उत्तरप्रदेशच्या पर्यटन व्यवसायाला कमालीची चालना मिळणार आहे.  त्यामुळेच दोन वर्षानी होणा-या या महाकुंभासाठी आतापासून चोख तयारी सुरु झाली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.