Home » राज्यभिषेक सोहळ्याची तयारी जोरात!

राज्यभिषेक सोहळ्याची तयारी जोरात!

by Team Gajawaja
0 comment
coronation
Share

किल्ले रायगडावर एक जून ते सात जून दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक (coronation) सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवभक्त हजेरी लावणार आहेत त्यामुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे वारंवार या तयारीचा आढावा घेत आहेत.(coronation)

रायगडावरील शिवराज्यभिषेकाच्या (coronation) कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. नागरिकांसाठी पाणी, आरोग्यसेवा अन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. खुद्द गडावर नागरिकांसाठी दहा लाख लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाचाड येथे पन्नास लाख लिटर पाणी नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर १०९ सीसीटीव्ही, एलईडी सुविधा, ३०० शौचालय आणि १०० स्नानगृह आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत. २४ मेडिकल सेंटर, प्रत्येक ३०० मीटरवर एक आरोग्य सेंटर याप्रमाणे मेडिकल सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.(coronation)

डॉक्टर, परिचारिका, औषधे तसेच व्हीलचेअरची देखील सुविधा येथे करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत १७० पोलीस अधिकारी, १२०० पोलीस कर्मचारी, ३५० होमगार्ड आणि १ एसआरपी प्लाटून इथे तैनात असणार आहे. त्याचबरोबर लोकांना आपापल्या घरून राज्याभिषेक सोहळा बघता यावा यासाठी सोहळ्याचे थेट प्रक्षेपणदेखील करण्यात येणार आहे. सोहळ्याला उपस्थिती लावणाऱ्या शिवभक्तांनी नियामांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.(coronation)

मोठ्या प्रमाणात लोकांचा ओढा गडाकडे असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून अवजड वाहनांना इथे बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान १६ टन पेक्षा जास्त वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीला परवानगी नसेल. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते पळस्पे, वाकण फाटा ते खोपोली व इतर राज्य मार्गावरून होणारी वाळू, रेती भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच इतर अवजड वाहनांना बंदी असेल. ३१ मे रोजी रात्री १२ पासून ते २ जून रात्री १२ वाजेपर्यंत तसेच ४ जून रात्री १२ ते ६ जून रात्री १२ पर्यंत ही बंदी असेल.

=======

हे देखील वाचा : सुरतमध्ये आशियातील सर्वात मोठे पार्क 

=======

राज्यभिषेक (coronation) सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. राज्यातीलच नाहीतर अनेक केंद्रीय मंत्रीदेखील या सोहळ्याला आपली उपस्थिती लावतील. गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.