Home » किंग चार्ल्सच्या सिंहासन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यावर

किंग चार्ल्सच्या सिंहासन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यावर

by Team Gajawaja
0 comment
King Charles
Share

ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स (King Charles) यांच्या सिंहसन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे.  या राज्यरोहणसोहळ्यासाठी विविध धार्मिक विधी सुरु झाले असून राजाच्या राजवाड्याभोवती आतापासून अनेक नागरिकांनी गर्दी केली आहे. तसेच या भागातील हॉटेलही पर्यटकांनी फुल झाली आहेत. मात्र किंग चार्ल्स (King Charles) यांची लोकप्रियता गेल्या काही महिन्यात कमी झाल्याचे लक्षात आले आहे. या अभिषेक सोहळ्याची नागरिकांमध्ये उत्सुकता असली तरी तेवढीच नाराजीही आहे. चार्ल्स यांची द्वितीय पत्नी कॅमिला यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते. चार्ल्ससोबत या सोहळ्यात कॅमिला ऐवजी डायनाच असायला हवी होती, असे अनेक स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लंडनमधील काही नागरिक हा सोहळा टाळण्यासाठी काही दिवस अन्यत्र जाऊन सुट्टी घालवणार आहेत. असे असले तरी, या सोहळ्यासाठी सर्व देशांमधील मान्यवरांचे आगमन सुरु झाले आहे. त्यात राजकारण्यांपासून ते सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.  

किंग चार्ल्स (King Charles) यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात किंग जॉर्ज सहावे यांच्या सिंहासनाचा पुनर्वापर केला जाणार आहे. शाही परंपरेनुसार, वंशपरंपरागत सिंहासनेच वापरली जातात. राज्याभिषेकाच्या वेळी राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला या सिंहासनावर विराजमान होणार आहेत.  यावेळी चार्ल्स  त्यांचे आजोबा जॉर्ज सहावा यांनी वापरलेले सिंहासन वापरतील. इंग्लडच्या राजघराण्यात 86 वर्षांपूर्वी, 12 मे 1937 रोजी जॉर्ज सहावे यांचा राज्याभिषेक झाला होता. आता त्यांनी वापरलेले सिंहसन किंग चार्ल्स वापरणार आहेत.  

राजा चार्ल्स (King Charles) यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी भारतासह कॉमनवेल्थच्या प्रत्येक सदस्य देशाची नावे असलेला झेंडा लावण्यात येणार आहे.   लंडनमधील सेंट जेम्स पॅलेस येथील चॅपल रॉयल येथे या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. या झेंड्याच्या मध्यभागी एक झाड असून त्याच्या 56 फांद्यांना राष्ट्रकुल देशांची नावे दिली गेली आहेत.  ब्रिटनचा सम्राट ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड सारख्या 14 राष्ट्रकुल देशांचा राजा देखील आहे.

दरम्यान ब्रिटनच्या 70 वर्षांतील पहिला राज्याभिषेक साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक आणि पर्यटक लंडनमध्ये येत आहेत. पण लंडनमध्ये रहाणारे नागरिक या सोहळ्यासाठी उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाले आहेत.  राज्याभिषेक सोहळ्यासाठी लंडनची हॉटेल्स बुक झाली आहेत आणि बकिंगहॅम पॅलेसचा परिसर लोकांनी खचाखच भरला आहे. अशा परिस्थितीत लंडन पहायला येणा-यांना सुट्टीचा आनंद घेता येणार नाही, अशी भावना आहे. लंडनमध्ये राहणारे नागरिक या सोहळ्याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे त्यांनी शहराबाहेर जाण्याचे नक्की केले आहे.  

6 मे रोजी होणा-या या सोहळ्यात राजा चार्ल्स तिसरा हे ब्रिटनचे 40 वे राजे होणार आहेत. 1953 मध्ये, ब्रिटनची राणी आणि राजा चार्ल्स तृतीयची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेक झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सुमारे आठ महिन्यांनी, राजा चार्ल्स तिसरा ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान होतील.   किंग चार्ल्सचा राज्याभिषेक सोहळा लंडनच्या वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरू होईल. म्हणजेच अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर सकाळी 6 वाजता आणि पश्चिम किनार्‍यावर पहाटे 3 वाजता हा सोहळा सुरु होईल आणि पाहता येईल.  

दरम्यान राजा चार्ल्स (King Charles) यांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातून राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना आमंत्रण देण्यात आले होते.  पण त्यांच्या ऐवजी उपराष्ट्रपती जगदीप धनखर भारताचे प्रतिनिधित्व करतील. 

राज्याभिषेकानंतर चार्ल्स अधिकृतपणे ब्रिटनचे राजा होतील. सुमारे आठवडाभर ब्रिटनमध्ये राज्याभिषेक सोहळा होणार आहे. यानिमित्ताने 7 मे रोजी बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरही एका कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार आहे. सोनम कपूर व्यतिरिक्त, टॉम क्रूझ आणि म्युझिकल ग्रुप द पुसीकॅट डॉल्स देखील कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करतील. कार्टून कॅरेक्टर विनी द पूहही यावेळी उपस्थित राहणार आहे.  सोनम कपूर कॉमनवेल्थच्या व्हर्च्युअल गायनाची ओळख करून देईल आणि एक छोटेसे भाषण देणार आहे.  यावेळी राणी एलिझाबेथच्या प्लॅटिनम ज्युबिलीनिमित्त द पुसीकॅट डॉल्स या संगीत समूहाची प्रमुख गायिका निकोल शेरझिंगर यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

=======

हे देखील वाचा : चीनी नवरदेव शोधतायत सख्खा भाऊ नसलेली पार्टनर… पण का?

=======

या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असली तरी राजघराण्यातील अनेक गुपितेही जनतेच्या पुढे येत आहेत. ब्रिटनचा राजा म्हणून चार्ल्स सिंहासनावर बसणार असला तरी त्याचे कौटुंबिक जीवन इतर कोणत्याही व्यक्तीसारखे सामान्य आहे. त्याच्या दुस-या पत्नीबाबत समाजात नाराजी आहे.  त्याचे आणि त्याच्या भावाचे नाते दुरावले आहे. त्याचा धाकटा मुलगा हा त्याच्या कुटुंबातील अनेक गौप्य गोष्टी जनतेसमोर आणतो. एकूण काय चार्ल्स राजे होतील, पण कौटुंबिक समस्या मात्र त्यांच्या आसपासच रहाणार आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.