Home » अमरनाथ यात्रेची तयारी सुरु

अमरनाथ यात्रेची तयारी सुरु

by Team Gajawaja
0 comment
Amarnath Yatra
Share

समस्त हिंदूधर्मियांसाठी आदराचे स्थान असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेसाठी (Amarnath Yatra) नावनोंदणी सुरु झाली आहे. अमरनाथ यात्रा यावर्षी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या पवित्र यात्रेसाठी सरकारतर्फे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुरु झाली आहे. ही पवित्र अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) 62 दिवसांसाठी असणार आहे. यात्रेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  

शिवशंकराच्या स्थानात अवघड स्थान म्हणून ओळखले जाणारे बाबा अमरनाथ यात्रास्थळ भाविकांसाठी जुलै महिन्यापासून खुले कऱण्यात येणार आहे. बाबा बर्फानी म्हणूनही या शिवलिंगाला बोलले जाते. बाबा अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) अतिशय पवित्र मानली जाते. अवघड आणि निसर्गाचे बदलणारे रुप यांचे आव्हान स्विकारत दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ यात्रा करतात. यावर्षीच्या यात्रेसाठी नोंदणी सुरु झाली आहे. बाबा अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) आगाऊ नोंदणीसाठी 120 रुपये प्रति प्रवासी नियुक्त बँक शाखांद्वारे भरावे लागणार आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी प्रति प्रवासी 220 रुपये शुल्क असून त्यासाठी सरकारतर्फे सर्व अर्ज ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) यावर्षी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. हा प्रवास 62 दिवस चालणार आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांवरून यात्रा सुरू होईल.  या यात्रेसाठी श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) सर्व तयारी करत असून ज्या भक्तांना अमरनाथला पोहचता येणार नाही त्यांच्यासाठी बाबा बाबा अमरनाथांच्या सकाळ आणि सायंकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डातर्फे अमरनाथ यात्रेसाठी देशभरातील 542 बँक शाखांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. भारताच्या नागरिकांना अमरनाथ यात्रेसाठी नियुक्त बँक शाखांद्वारे प्रति प्रवासी 120 रुपये द्यावे लागतील. ऑनलाइन नोंदणीसाठी प्रति प्रवासी 220 रुपये शुल्क आहे. तर एनआरआय नागरिकांना पीएमबीद्वारे प्रति प्रवासी 1520 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.  देशभरातील पंजाब नॅशनल बँक, एसबीआय, जम्मू आणि काश्मीर बँक आणि येस बँकेच्या नियुक्त बँक शाखांद्वारे अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.  देशभरातील ज्या बॅंका यात्रेसाठी नोंदणी करत आहेत, त्यांची यादी श्री अमरनाथजी यात्रा श्राइन बोर्डाच्या https://jksasb.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.  ऑनलाइन नोंदणीची लिंक श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या श्री अमरनाथजी यात्रा या मोबाईल अॅपवर देखील उपलब्ध आहे. Google Play Store वर ही सुविधा उपलब्ध आहे.(Amarnath Yatra)

अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) 1 जुलैपासून सुरू होऊन 30 ऑगस्टला संपणार आहे. अवघड अशा या यात्रेसाठी सरकारने भाविकांचे वय निश्चित केले आहे.  ही वयोवर्यादा 13 ते 75 वर्षे अशी असणार आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डतर्फे 8 लाखांहून अधिक यावेळी बाबा बर्फानीच्या दर्शनास येतील असे सांगण्यात आले असून त्याची तयारी सुरु आहे.

अमरनाथ हे भगवन शंकराचे पवित्र तीर्थस्थान मानले जाते. नैसर्गिकरित्या होणारे हे बर्फाचे शिवलिंग आहे. त्याचा आकार चंद्राच्या प्रकाशाच्या आधारे ठरवला जातो. हे बर्फाचे शिवलिंग शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पूर्ण होते आणि त्यानंतर येणाऱ्या अमावास्येपर्यंत आकाराने खूपच लहान होत जाते. अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र यात्रा मानली जाते. अतिशय अवघड अशा यात्रेचे नियोजन करुनच मग प्रवास करावा असे आवाहन श्री अमरनाथजी श्राइन बोर्डातर्फे करण्यात यते. अमरनाथ यात्रेची तयारी करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी संपूर्ण कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणी करण्याचेही आवाहन असते. याशिवाय ओळखीसाठी मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आदी कागदपत्रे सोबत बाळगण्याचे आवाहन आहे. अमरनाथ यात्रेसाठी शारीरिक तंदरुस्ती आवश्यक असते.  त्यासाठी भाविकांना ही यात्रा सुरु करण्यापूर्वी किमान 2 ते 3 आठवडे दररोज किमान 6 किलोमीटर चालण्याचा व्यायाम करावा असे सुचवण्यात येते.  तसेच  कुठलाही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्लाही आवश्यक घ्यावा. अमरनाथ तिर्थस्थान 13,500 फूट उंचीवर आहे.  तिथे मळमळ, डोकेदुखी, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यासंदर्भात औषधे सौबत बाळगण्याचेही आवाहन आहे.  

=========

हे देखील वाचा : गीता प्रेसचे सुवर्ण वर्ष

========

आता ज्यांना हा प्रवास पायी शक्य नाही त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा आहे. मात्र हे हेलिकॉप्टरचे बुकींगही आधीच करण्याचे आवाहन आहे. हेलिकॉप्टरची तिकिटेही नियुक्त बँक शाखांमधून बुक होत आहेत. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या साईटवर त्याचे दरही देण्यात आले आहेत. याशिवाय यात्रेसाठी येणा-या भाविकांनी उबदार कपडे, पावसाळ्यात वापण्यात येणारे शूज, यासह टॉयलेट पेपर, साबण, नॅपकिन्स आदी सोबत बाळगण्याची सूचना श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या साईटवर करण्यात आली आहे.  (Amarnath Yatra)

या संपूर्ण यात्रेदरम्यान मोफत भोजन दिले जाते. अमरनाथ यात्रेचा जुलै ते ऑगस्ट हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या यात्रेची तारीख चंद्र चक्रानुसार बदलते. यावेळेच्या 1 जुलै पासून सुरु होणा-या यात्रेसाठी आता नोंदणी सुरु झाली असून भाविकांची यावेळी मोठ्या संख्येनं भाविक या यात्रेसाठी येतील असे श्री अमरनाथजी श्राइन बोर्डातर्फे सांगण्यात आले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.