प्रत्येकाला आपण कोणत्याही वयात तरुण दिसावे असे वाटत असते. अशातच जर कमी वयात केस सफेद होण्यास सुरुवात झाली तर खुप वय वाढल्यासारखे वाटत राहते. अशातच केसांना बहुतांशजण वारंवार हेअर कलर लावत असतात. काही जण विग ही लावतात. परंतु कमी वयातच तुमचे केस सफेद होण्यास सुरुवात झाली असेल तर वेळीच लक्ष द्या. कारण डॉक्टरांच्या मते, कमी वयात केस सफेद होण्याचे कारण हे सामान्य नव्हे. त्याचे गंभीर परिणाम ही आरोग्यावर होऊ शकतात. याचा थेट संबंध हृदय आणि मेंदूशी जोडला गेला आहे. (Premature Gray Hair)
ब्रेन ट्युमरचा धोका
बहुतांश लोकांना ही समस्या अनुवांशिक असल्यासारखी वाटते आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या दृष्टीने अशावेळी आरोग्याबद्दल विचार केला पाहिजे. डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष करु नये असे ही सांगितले आहे. कमी वयात केस सफेद झाल्यास हृदय रोग आणि ब्रेन ट्युमरचा धोका ही उद्भवू शकतो.
विटामीन डी ची कमतरता
पाश्चिमात्य देशांमध्ये बहुतांश लोक स्रिया आणि पुरुष मंडळी सनबाथ घेताना दिसून येतात. यामुळे विटामिन डी मिळते. चेहऱ्यावर चमक ते केसांच्या सुंदरतेसाठी याची मदत होते. त्वचा आणि केसांना यामुळे पोषक तत्व मिळतात.
अन्य अवयवयांमध्ये सुद्धा ट्युमर होण्याची शक्यता
२०१३ मध्ये भारताच्या एका संशोधन संघाने हे शोधण्याचा प्रयत्न केला होता की, विटामिन डी च्या कमतरतेमुळे केस सफेद होऊ लागतात. मात्र आता अमेरिकेच्या संशोधन संघाने हे शोधून काढले की, ट्युबरस स्केलेरोसिस कॉम्प्लेक्स एक असा विकार आहे जो ब्रेन, मणका, डोळे, फुफ्फुस, हृदय मध्ये ट्युमर होण्याची शक्यता असते. ट्युबरस स्केरोसिस ट्युमर शरिरात चहूबाजूंनी वाढतो आणि विकासाची क्षमता रोखतो.
डोक्याच्या चहूबाजू आणि ट्युमर वाढल्याने झटके येऊ शकतात. ट्युमर जर डोळ्यांवर झाला असेल तर त्यामुळे पाहण्याची समस्या येते. हृदय आणि फुफ्पुसात ट्युमर झाल्यास श्वास घेण्याची समस्या येऊ शकते. कमी वयात केस सफेद होण्यास सुरुवात झाल्यास लगेच डॉक्टरांना संपर्क करा.(Premature Gray Hair)
हे देखील वाचा- तुम्हाला ‘हा’ त्रास असेल तर नक्की कढीपत्त्याचा करा वापर…
या व्यतिरिक्त काही कारणे आहेत त्यामुळे तुमचे केस सफेद होऊ शकतात-
-डाउन सिंड्रोम
डाउन सिंड्रोम हा अनुवांशिकतेसंबंधित एक आजार आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीला ही समस्या होते त्याच्या परिवारात आधीपासूनच एखाद्याला डाउन सिंड्रोम झालेला असतो. डाउन सिंड्रोम झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर, नाक आणि मानेच्या आकारात बदल होतो. चेहरा आणि नाक अचाक चपट होते आण मानेचा आकार ही कमी होतो. त्याचसोबत केस ही सफेद होऊ लागतात. अनुवांशिक आजार असल्याने यावर पूर्णपणे निदान करणे संभव नाही.
-थायरॉइडची समस्या
हायपोथायरॉइडज्मच्या कारणास्तव ही केस वेगाने सफेद होऊ लागतात. ही समस्या शरिरात तेव्हा होते जेव्हा थायरॉइड ग्लँन्ड्समध्ये हार्मोन्स तयार होणे कमी होते.