Home » ऋषी सुनक यांच्यासोबत प्रज्वल पांडे नावाच्या 19 वर्षीय तरुणाचेही नाव चर्चेत

ऋषी सुनक यांच्यासोबत प्रज्वल पांडे नावाच्या 19 वर्षीय तरुणाचेही नाव चर्चेत

by Team Gajawaja
0 comment
Prajwal Pandey Story
Share

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि भारतामध्ये आनंदोत्सव साजरा झाला.  जणु आपल्याच परिचयातील व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाली आहे, अशा थाटात सोशल मिडीयावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.  पण या सर्वांपेक्षाही बिहारमध्ये आनंदोत्सव साजरा झाला.  हा आनंद ऋषी सुनक यांच्यासाठी होताच, पण त्यासोबत प्रज्वल पांडे (Prajwal Pandey Story) या अवघ्या 19 वर्षीय युवकासाठीही होता.  हा प्रज्वल पांडे म्हणजे नेमका कोण आणि ऋषी सुनक यांच्या विजयात त्याचा काय सहभाग हा प्रश्न पडला असेल.  पण प्रज्वलच्या उज्वल यशाबद्दल ऐकल्यावर त्याच्यावर प्रत्येक भारतीयाला कौतुकाचा वर्षाव करावसा वाटेल.  बिहारच्या सिवान जिल्ह्यातील प्रज्वल पांडे (Prajwal Pandey Story)चे नाव सध्या ब्रिटनच्या पार्लमेंटमधील प्रत्येक सदस्याच्या तोंडी आहे.  सिवानच्या जिरादेई ब्लॉकमधील जामापूर गावचा रहिवासी असलेल्या प्रज्वल पांडेने (Prajwal Pandey Story) ऋषी सुनक यांच्या प्रचार मोहिमेची सूत्र सांभाळली होती.  एवढंच नाही तर ऋषी सुनक यांना डावलून जेव्हा लिझ ट्रस यांची निवड ब्रिटनच्या पंतप्रधानपदी झाली, तेव्हाही हा प्रज्वल ऋषी सुनक यांच्या पाठिशी होता.  आता ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर या प्रगल्भ तरुणाला त्यांनी आपल्या विशेष सल्लागारांच्या टीममध्ये सहभागी करुन घेतले आहे.  प्रज्वल हा अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून परिचित आहे,  आता त्याचे यश पहाता सिवानमधील त्याचे परिचित प्रज्वल भविष्यात ब्रिटनच्या राजकारणात प्रवेश करेल आणि काही वर्षांनी तो नक्की ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.  

25 ऑक्टोबर रोजी युनायटेड किंगडम, म्हणजेच ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आणि भारतीयांनी आनंद साजरा केला.  पण ऋषी सुनक यांच्यासोबत प्रज्वल पांडे (Prajwal Pandey Story) नावाच्या 19 वर्षीय तरुणाचेही नाव चर्चेत आहे.   ब्रिटीश पीएम सुनक यांच्या प्रचार टीमचा कोअर कमिटी सदस्य म्हणून प्रज्वलनं काम पाहिलं आहे. प्रज्वल गेल्या दहा वर्षांपासून लंडनमध्ये राहत आला.   प्रज्वलला ऋषी सुनक यांच्या प्रचार मोहीमेत सहभागी करुन घेण्यात आले.  पण यामागे प्रज्वलचे यश लपलेले आहे.  किंग एडवर्ड ग्रामर स्कूल, चेम्सफोर्डचा प्रज्वल विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच गणित आणि अर्थशास्त्र या विषयांची त्याला आवड आहे.  2019 मध्ये, त्यांची चेम्सफोर्ड युथ स्ट्रॅटेजी ग्रुपचा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. नंतर 2020 मध्ये, त्यांची एसेक्स क्लायमेट अॅक्शन कमिशनचे सह-अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. एसेक्स क्लायमेट अॅक्शन कमिशनमधील कार्यकाळात प्रज्वलनं अनेक नेते आणि प्रमुख व्यक्तींसोबत हवामान धोरण तयार करण्यासाठी काम केले.   प्रज्वलच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच ही अत्यंत हुशार आणि प्रतिभावान आहे.  प्रज्वलची आई, मनीषा या शिक्षिका असून त्याची 19 वर्षीय बहीण केंब्रिज विद्यापीठात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.  तर त्याचे वडील राजेश पांडे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत

प्रज्वलचे ऋषी सुनक यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी ऑगस्ट 2022 मध्ये जेव्हा ऋषी सुनक यांनी आपला चार सुरू केला तेव्हाच प्रज्वलला मुख्य प्रचार संघात घेण्यात आले.  प्रज्वलने निवडणूक व्यवस्थापनात अथक परिश्रम घेतले. पण लिस ट्रस यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली.  तेव्हाही हार न मानता प्रज्वल आपल्या कामात व्यस्त राहिला.  लिस ट्रस यांनी राजीनामा दिल्यावर प्रज्वलनं पुन्हा आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि ऋषी सुनक यांच्या विजयामुळे ती मोहीम यशस्वी झाल्याचे म्हणता येईल.  

=========

हे देखील वाचा : पुष्कर मेळाव्यामध्ये उंट मेळाव्याचे दर्शन

========

प्रज्वल 2021 मध्ये हार्वर्ड इंटरनॅशनल इकॉनॉमिकच्या स्पर्धेचा विजेता आहे.  2019 मध्ये त्यांनी यूके युथ पार्लमेंटमध्ये विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.  प्रज्वलने वयाच्या 16 व्या वर्षी कंझर्व्हेटिव्ह पार्टी ऑफ ब्रिटनमध्ये प्रवेश केला.  प्रज्वलचे वडिलोपार्जित गाव सिवान जिल्ह्यातील जामापूर गावात आहे. त्यांचे आजोबा वगीश दत्त पांडे हे सुमारे 50 वर्षांपूर्वी कुटुंबासह झारखंडमधील सिंद्री येथे राहायला गेले.  प्रज्वलचे कुटुंब झारखंडमधील सिंद्री येथे आहे.  त्याचे आजी-आजोबा सिंद्री येथे रहात असल्यामुळे प्रज्वल आणि त्याचे आई-वडील  दर वर्षी सिंद्री येथे येतात.  स्वतः प्रज्वल 2019 मध्ये कुटुंबासह सिवानमधील जामापूर गावात आला होता.  येथे धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यावर तो पुन्हा ब्रिटनला गेला. आता हाच प्रज्वल ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत काम करणार आहे.  अवघ्या 19 वर्षात प्रज्वलनं मिळवलेलं हे यश त्याच्या पुढील उज्वल वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.