Home » Lord Shiva : जाणून घ्या प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे काय करु नये

Lord Shiva : जाणून घ्या प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे काय करु नये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lord Shiva
Share

प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. प्रदोष हा प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला येतो. प्रदोष हा एक शुक्ल पक्षात आणि दुसरा कृष्ण पक्षात. प्रदोष व्रत पाळल्याने जीवनात समृद्धी येते. या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात असे म्हणतात. दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीतील संध्याला प्रदोष काल असे म्हणतात. सोमवारी पडणार्‍या प्रदोष व्रतास सोम प्रदोष व्रत म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यातील पहिले प्रदोष व्रत हे १७ नोव्हेंबर रोजी सोमवारी अर्थात आज आहे. प्रदोष व्रत सोमवारी आल्याने त्याला सोम प्रदोष व्रत असे म्हटले गेले आहे. सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. (Pradosh)

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. ज्या दिवशी प्रदोष व्रत असते, त्या दिवशी आठवड्याच्या दिवसावरून प्रदोष व्रताचे नाव ठेवले जाते. प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी, भगवान शिवाची योग्य विधींनी पूजा केली जाते. उपवास देखील पाळला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, त्रयोदशीच्या तिथीला पूजा आणि व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार, जो कोणी प्रदोष उपवास ठेवतो आणि विधीनुसार भगवान शिवाची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. प्रदोष व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. यासोबतच, जीवनात आनंद आणि सौभाग्य प्राप्त होते. हिंदू धर्मात प्रदोष व्रताच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन केले पाहिजे. (Marathi)

Lord Shiva

प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे?
– प्रदोषच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर भगवान शंकराची यथायोग्य पूजा करावी. (Todays Marathi Headline)
– प्रदोषच्या दिवशी शिवलिंगाला बेलपत्र, गंगाजल, दूध आणि दही अर्पण करावे. यासोबतच शिवलिंगाला जलाभिषेक आणि रुद्राभिषेकही करावा.
– प्रदोषच्या दिवशी गरीब आणि ब्राह्मणांना अन्नदान करणं देखील खूप शुभ मानलं जातं.
– प्रदोषच्या दिवशी शक्यतो उपवास करावा. उपवास जमत नसल्यास या दिवशी गरिबाला अन्नदान करावे.
– प्रदोषच्या दिवशी अन्नाचे सेवन न करता फळांचे सेवन करावे. (Top Trending News)
– प्रदोषला शिवलिंगावर तूप, मध, दूध, दही आणि गंगाजल अर्पण करावे. ही कामे केल्याने साधकाला इच्छित वर मिळतो आणि लवकरच विवाह होण्याची शक्यता असते.
– प्रदोषाची पूजा करताना ईशान्य दिशेला तोंड करून बसावे. शिवलिंगावर जल अर्पण करताना पंचाक्षर मंत्राचा जप करा.
– प्रदोष व्रताच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन पाण्यात गंगाजल आणि तांदूळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. असे केल्याने कर्जाची समस्या लवकर दूर होते आणि धनाची प्राप्ती होते. (Top Marathi News)
– प्रदोष व्रताचे योग्यरित्या पालन केल्यास घरात शांती आणि आनंद येतो आणि वैवाहिक जीवन सुसंवादी राहते. अविवाहित मुलीनी हे व्रत करणे फायदेशीर असल्याचे मानले जाते.

प्रदोष व्रताच्या दिवशी काय करू नये?
– प्रदोष व्रताच्या दिवशी कोणालाही शिवीगाळ करू नये. कोणाविषयी वाईट चित्तू नये. प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला सिंदूर, हळद, तुळशी आणि नारळाचं पाणी अजिबात अर्पण करू नये. यामुळे या व्रताचा लाभ मिळत नाही,अशी मान्यता आहे. (Latest Marathi News)
– मान्यतेनुसार प्रदोष व्रतादरम्यान महिलांनी महादेवाच्या पिंडीला हात लावू नये. असे केल्याने माता पार्वतीच्या क्रोधाला सामोरं जावे लागते.
– प्रदोष व्रतात तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. व्रताच्या दिवशी सात्विक राहावे. यामुळे या दिवशी मद्य, मांस, कांदा, लसूण, तामसिक पदार्थांचं सेवन करू नये.
– प्रदोष व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण याचा दोष आपल्याला नंतर सहन कराला लागतो.
– उपवास करणाऱ्या व्यक्तीने भात आणि वातळ अन्न खाऊ नये. सकस आणि सात्विक आहार घ्यावा.
– काळा रंग नकारात्मकता आकर्षित करतो, यामुळे प्रदोष व्रतादिवशी काळे वस्त्र परिधान करू नये. (Top Stories)

=========

Pradosh : जाणून घ्या सोम प्रदोषाचे महत्त्व आणि पूजा विधी

=========

​सोम प्रदोष व्रताची अशी आख्ययिका
पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्यायले. हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर महादेवाचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली. तेव्हा देवांनी महादेवाचा मत्सर जल, बेलपत्र इत्यादींनी कमी केला. महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते, त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले. ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विषेश महत्त्व आहे. (Social News)

(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.