Post pregnancy skin care- तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्या तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? तुमची त्वचा मॉइश्चराइजरपेक्षा ही अधिक तेलकट होतेय का? प्रेग्नेंसी दरम्यान ब्रेस्टफीड करणाऱ्या महिल कोणत्याही प्रकारच्या ब्युटी प्रोडक्टस वापरु शकत नाहीत. कारण यामध्ये असलेल्या केमिकलमुळे तुमच्या मुलाला त्रास होण्याची अधिक शक्यता असते. अशातच ज्या महिल्या नुकत्याच आई झाल्या आहेत त्यांना तेलकट त्वचेच्या समस्येला सामोरे जाणे ही सर्वसामान्य बाब आहे आणि हे होतेच. त्यामुळे प्रेग्नेंसीनंतर तेलकट त्वचेसाठी नक्की कोणते मॉइश्चराइजर वापरावे या संबंधित आपण जाणून घेणार आहोत. त्याचसोबत मॉइश्चराइजर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि ते कधी-केव्हा लावावे हे सुद्धा आपण पाहणार आहोत.
प्रेग्नेंसीनंतर तेलकट त्वचेची समस्या का होते?
डिलिव्हरीनंतर तेलकट त्वचा किंवा पिंपल्स येणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. कारण शरिरात झालेल्या हार्मोनच्या बदलामुळे ही समस्या होते. जेव्हा प्रोजेस्टेरोन हार्मोनचा स्तर वाढतो तेव्हा सीबम ग्लॅड्स हे उत्तेजित होतात. अशातच नुकत्याच आई झालेल्यांचे पोर्स बंद होऊ शकतात आणि ब्रेकआउटची समस्या होऊ शकते.म्हणूनच नुकत्याच आई झालेल्या महिलांनी ऑइल फ्री मॉइश्चराइजर किंवा कॉस्मेटिकचा वापर करावा, जेणेकरुन पोर्स बंद होऊ देत नाही.
-डिलिव्हरी नंतर तेलकट त्वचेची समस्या कधीपर्यंत राहते?
मुलांना जन्म दिल्यानंतर काही महिन्यापर्यंत महिलांच्या शरिरात हार्मोनच्या स्तर नॉर्मल होतो आणि तेलकट त्वचा आणि पिंपल्सची समस्या दूर होते. परंतु काही महिलांमध्ये हार्मोनचा स्तर पुन्हा नॉर्मल होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. त्यांच्या त्वचेवर तेलकटपणा आणि पिंपल्सची समस्या दीर्घकाळापर्यंत राहू शकते.
हे देखील वाचा- लहान मुलांमधील ‘या’ लक्षणांना करु नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

-प्रेग्नेंसीनंतर तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी?
फेस क्लींजर
सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर माइल्ड फेसवॉश जरुर वापरा. यासोबत घराबाहेर पडल्यानंतर पुन्ही घरी आल्याननंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुणे विसरु नका. तेलकट त्वचेसाठी महिलंनी जेल बेस्ड क्लींजरचा वापर केला पाहिजे. चुकून सुद्धा मिल्की किंवा एक्ने वॉश वापरु नका.(Post pregnancy skin care)
मॉइश्चराइजर वापरा
काही महिलांना सारखे असे वाटत असे की. त्यांची त्वचा आधीपासूनच तेलकट आहे. त्यामुळे त्वचेवर मॉइश्चराइज लावण्याची काहीच गरज नाही. असा विचार तुम्ही करत असाल तर हा चुकीचा आहे. तेलकट त्वचेसाठी ओलाव्याची गरज असते. फक्त फरक असा असतो की, तेलकट त्वचेसाठी फक्त नेहमीच ऑइल फअरी मॉइश्चराइजर निवडावी. तुम्ही विटामिन सी ऑइल फ्री मॉइश्चराइजर हा उत्तम ऑप्शनपैकी एक आहे.
सनस्क्रिन जरुर लावा
तुम्ही घराबाहेर जात असाल तर सनस्क्रिनचा नेहमीच वापर करावा. नुकत्याच आई झालेल्या महिलांनी मिनरल बेस्ड सनस्क्रिन उत्तम मानले जाते. सनस्क्रिन खरेदी करतेवेळी त्यामधील गोष्टींवर लक्ष ठेवा. तुमच्या सनस्क्रिनमध्ये झिंक ऑक्साइड किंवा टाइटेनियम डायऑक्साइड असावे. या व्यतिरिक्त कमीतकमी ३० एसपीएफ असणारे सनस्क्रिन निवडा.