पोस्ट ऑफिसच्या खात्यातून तुम्ही जर १० हजारांहून अधिक रुपये काढणार असाल किंवा एखाद्याला ट्रांन्सफर करणार असाल तर तुम्हाला एक खास वेरिफिकेशन करावे लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला १० हजारांहून अधिक रक्कमेचा व्यवहार करता येणार आहे. कारण वेरिफिकेशन शिवाय आता १० हजारांहून अधिक रक्कमेचे ट्रांजेक्शन करता येमार नाही आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खाते सुरु करणे हा एक सुरक्षित आणि योग्य निर्णय आहे. जसे की, तुम्ही बचत खात्यात पैसे टाकून खाते सुरु करता त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसचे खाते सुरु करता येते.(Post Office Withdrawals)
त्यानंतर तुम्ही नियमितपणे पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यातून पैसे काढू शकता. मात्र पोस्ट ऑफिसच्या द्वारे १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमेसाठीच्या व्यवहारासाठी नियमात मात्र बदल करण्यात आला आहे. जर तुमचे अकाउंट ही पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तुम्हाला याची माहिती असणे गरजेचे आहे. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनद्वारे २५ ऑगस्टला जाहीर करण्यात आलेल्या सर्कुरलमध्ये याबद्दल सांगण्यात आले आहे.
असे होईल वेरिफिकेशन
पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, १० हजारांहून अधिक रक्कम काढण्यासाठी वेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. मात्र सिंगल हँडेड पोस्ट ऑफिसमध्ये अधिक व्यवहारासाठी वेरिफिकेशन प्रोसेस बंद केली आहे. या व्यतिरिक्त काही खास अटींनुसार पोस्ट ऑफिसद्वारे देवाणघेवाण सुद्धा केली जाते. असे नियम पोस्ट ऑफिसमध्ये होणाऱ्या बँकिंग फसणूकीला आळा घालण्यासाठी आहे. अशी प्रकरणे कमी केली जाऊ शकतात. यामुळे लोकांची फसवणूक होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. त्यामुळे वेरिफिकेशनसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे.(Post Office Withdrawals)
हे देखील वाचा- Old Pension Scheme लागू करणार पंजाब, जाणून घ्या योजनेबद्दल अधिक
नियम काय सांगतो
बँकेसंदर्भात फसणवूकीला आळा घालण्यासाठीच्या नियमाव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसने व्यवहाराच्या लिमिटला वाढवले आहे. प्रथम अकाउंट होल्डर फक्त ५ हजार रुपयांपर्यंत विड्रॉल करता येत होते. आता ती वाढवून २० हजार रुपयांपर्यंत केली आहे. या व्यतिरिक्त ब्रांन्चच पोस्टमास्टर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात ५० हजारांहून अधिक रक्कमेचे व्यवहार मान्य करणार नाही. पोस्ट ऑफिसमध्ये देशातील कोणताही नागरिक सहज आपले खाते सुरु करु शकतो. सध्या या खात्यावर ४ टक्क्यांनुसार व्याज दिला जातो. जो बचत खात्यापेक्षा अधिक आहे.