Home » Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये उत्तम नफा मिळवण्यासाठी ‘या’ आहेत भन्नाट योजना

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये उत्तम नफा मिळवण्यासाठी ‘या’ आहेत भन्नाट योजना

by Jyotsna Kulkarni
0 comment
Post Office
Share

सर्वच लोकं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा कमावतो. आपल्या घराची, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी, त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी झटत असतो. आजच्या महागाईच्या काळात तर नवरा आणि बायको दोघेही बाहेर जाऊन काम करताना दिसतात. याचे कारण एकच आपला चांगला उदरनिर्वाह करणे आणि आणि खूपच आलिशान नाही पण उत्तम जीवनशैली जगणे. असे असले तरीही आपण कायम बचत करणे देखील आवश्यक आहे. भविष्याची तरतूद म्हणून प्रत्येकाने काही प्रमाणात बचत करणे गरजेचे आहे. आपण सर्वच मध्यमवर्गीय माणसं बचत करायचे म्हटले की, बँकेत सेविंग अकाऊंट उघडतो आणि त्यात थोडे थोडे पैसे टाकत जातो. मोठी रक्कम तयार झाली आणि त्याची एफडी करतो. (Post Office)

फारफार तर काही लोकं एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असतील. मात्र अनेकदा आपल्याला समजत नाही की, बँकेत अकाऊंट ओपन करून बचत केली पाहिजे की पोस्ट ऑफिसमध्ये. मात्र सध्याच्या काळात बऱ्याच लोकांचा कल आता पोस्टमध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढताना दिसत आहे. पूर्वी केवळ संपर्काचे माध्यम असलेल्या पोस्टमध्ये बचतीच्या दृष्टिकोनातून अनेक उत्तम, फायदेशीर आणि सामान्य लोकांना लाभ देणाऱ्या योजना आपल्याला पाहायला मिळतात. यासोबतच पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण अनेक इतर सुविधांचा देखील लाभ घेऊ शकतो. जाणून घेऊया याच पोस्टमध्ये मिळणाऱ्या सुविधांबद्दल आणि विविध योजनांबद्दल. (Marathi News)

भारतीय पोस्ट ऑफिस देशभरात विविध सेवा पुरवते. यात पत्रे आणि पार्सल पाठविणे, तसेच बँकिंग, लहान बचत योजना आणि विमा अर्थात पोस्टल लाइफ इन्शुरन्स यासारख्या सुविधांचा समावेश आहे. टपाल विभागाच्या अल्पबचत योजना सरकारद्वारे चालवल्या जातात आणि देशातील लाखो लोक त्यात गुंतवणूक करतात. लोकांमध्ये बचतीची सवय वाढवणे आणि आर्थिक समावेशकता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे. सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून रेल्वेची तिकिटे बुक करत आहे. इंडिया पोस्ट विभाग आता रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे तिकीट बुकिंग सेवा देखील देत आहे. (Marathi)

Post Office

पोस्ट ऑफिसमधील इतर फायदेशीर योजना
सुकन्या समृद्धी योजना
ही योजना मधल्या काही काळापासून प्रचंड गाजत आहे. मुलींसाठी असलेली ही योजना आल्यापासून सामान्य लोकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. ज्यांना मुली आहेत त्या सर्वानीच या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या भविष्यासाठी सर्वात लोकप्रिय योजना आहे. ती वार्षिक ८.२० टक्के व्याजदर देते. गुंतवणूक रक्कम २५० रुपये ते १.५ लाख रुपये प्रति वर्ष असू शकते. ही योजना मुलीचे शिक्षण आणि लग्न यासारख्या मोठ्या खर्चाची पूर्तता करण्यास मदत करते. मुख्य म्हणजे ही योजना कर लाभ देखील देते. (Todays Marathi HEadline)

मासिक उत्पन्न योजना
जर तुम्हाला निश्चित मासिक उत्पन्न हवे असेल, तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे. ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी रक्कम जमा करून दरमहा नियमित उत्पन्न मिळवू शकता. या योजनेत, एका व्यक्तीसाठी जास्तीत जास्त ₹९ लाख आणि संयुक्त खात्यासाठी ₹१५ लाख पर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेवर सध्या वार्षिक ७.४% व्याजदर आहे, जो दरमहा दिला जातो आणि योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असतो. या योजनेत ७.४ टक्के व्याजदर आहे. दरमहा खात्यात व्याज जमा होते, ज्यामुळे नियमित उत्पन्न मिळते. (Top Marathi News)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ही एक निश्चित-उत्पन्न गुंतवणूक योजना आहे, जी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. ही योजना लोकांना आयकर बचत करताना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. यामध्ये गुंतवणुकीची मुदत ही एक निश्चित उत्पन्न योजना आहे. जी सरकारद्वारे पूर्णपणे हमी दिली जाते. सध्या ती ७.७ टक्के व्याजदर देते आणि त्याची परिपक्वता कालावधी ५ वर्षांचा आहे. फक्त १००० पासून गुंतवणूक सुरू करता येते. कलम 80 सी अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. (Latest Marathi HEadline)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
ही भारत सरकारची एक लोकप्रिय, सुरक्षित आणि कर-बचत करणारी योजना आहे. यामध्ये दीर्घ मुदतीसाठी बचत केली जाते आणि त्यावर हमी असलेला परतावा मिळतो. दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक आणि कर बचतीचे फायदे देणारी ही योजना लोकप्रिय पर्याय आहे. पीपीएफ सध्या वार्षिक ७.१० टक्के व्याजदर देते. किमान गुंतवणूक रक्कम ५०० आणि कमाल रक्कम १.५ लाख रुपये प्रति वर्ष आहे. कालावधी १५वर्षे आहे आणि तो वाढवता येतो. कलम ८० सी अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध आहेत. (Top Trending News)

=========

SBI १ डिसेंबर २०२५ पासून बंद करणार ही सर्विस खातेदारांना होईल मोठा परिणाम

=========

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही पोस्टाची एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही ₹१००० पासून गुंतवणूक सुरू करू शकता. ही योजना १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी उपलब्ध आहे आणि यामध्ये निश्चित व्याज मिळते. या योजनेत गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते आणि आयकर कायदा कलम ८०C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. मुख्य म्हणजे ही योजना बँक एफडीसारखी काम करते, परंतु अधिक विश्वासार्ह आहे. व्याजदर १ वर्षासाठी ६.९ टक्के २ आणि ३ वर्षांसाठी ७ टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५ टक्के आहे. गुंतवणूक किमान १००० पासून सुरू करता येते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.