Post Office : भारतीय पोस्ट ऑफिसच्या योजना आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वात विश्वसनीय मानल्या जातात. खासकरून ज्यांना बँक किंवा शेअर मार्केटमध्ये धोका पत्करायचा नसतो, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजना भक्कम पर्याय ठरतात. अशाच योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme) जी एका वेळच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दर महिन्याला हमखास व्याज देते आणि कालावधी संपल्यावर मूळ रक्कम परत मिळते. (Post Office)
काय आहे ही योजना? पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS) ही भारत सरकारकडून चालवली जाणारी एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार एकदाच पैसे जमा करतात आणि नंतर दर महिन्याला ठराविक रक्कम व्याज स्वरूपात मिळवतात. सध्याच्या नियमांनुसार, या योजनेवर वार्षिक 7.4% व्याजदर लागू आहे. म्हणजेच, जर तुम्ही जास्तीत जास्त रक्कम ₹9 लाख (सिंगल अकाउंटसाठी) किंवा ₹15 लाख (जॉइंट अकाउंटसाठी) गुंतवली, तर दर महिन्याला तुम्हाला सुमारे ₹9,250 पर्यंत उत्पन्न मिळू शकतं. (Post Office)

Post Office Schemes
गुंतवणुकीचा कालावधी आणि परतावा या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला दर महिन्याला तुमच्या खात्यात व्याज जमा होत राहते. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर मूळ गुंतवणूक परत मिळते.विशेष म्हणजे, ही योजना सरकारी हमी असलेली असल्यामुळे यात भांडवलाची सुरक्षितता आणि निश्चित परतावा दोन्ही मिळतो. (Post Office)
=======================
हे देखिल वाचा :
Post Office : एकदाच गुंतवणूक आणि दर महिन्याला निश्चित इनकम! पोस्ट ऑफिसची कमाल योजना
Loan Guarantor : लोन गॅरंटर होण्यापूर्वी जाणून घ्या हे ५ मोठे धोके; नाहीतर होईल आयुष्यभर पश्चात्ताप!
========================
पात्रता आणि नियम
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
अल्पवयीनांच्या नावाने पालक खाते उघडू शकतात.
सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ₹9 लाख आणि जॉइंट अकाउंटमध्ये ₹15 लाख गुंतवणुकीची मर्यादा आहे.
व्याज प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा केलं जातं.
गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर का?
निश्चित उत्पन्न: मार्केटच्या चढउतारांपासून पूर्णपणे सुरक्षित.
टॅक्स बेनिफिट: मिळणारं व्याज करपात्र असलं तरी TDS लागू नाही.
वरिष्ठ नागरिकांसाठी उत्तम: ज्येष्ठांना दर महिन्याचं उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त.
सुरक्षितता: भारत सरकारकडून थेट हमी असल्याने जोखीम शून्य.
आजच्या अस्थिर आर्थिक परिस्थितीत पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणजे स्थिर आणि सुरक्षित उत्पन्नाचा आधार. एकदाच गुंतवा आणि ५ वर्षांसाठी दर महिन्याला हमखास पैसा मिळवा.नोकरीतून निवृत्त झालेल्यांसाठी, गृहिणींसाठी किंवा स्थिर उत्पन्न शोधणाऱ्यांसाठी ही योजना एकदम योग्य आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
