Home » मुलांमध्ये साकारात्मकता निर्माण करण्यासाठी पालकांनी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

मुलांमध्ये साकारात्मकता निर्माण करण्यासाठी पालकांनी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

by Team Gajawaja
0 comment
Positive Thinking in Children
Share

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घरात सकारात्मकता असणे फार गरजेचे असते. अशातच पालकांनी सुद्धा आपल्या समस्या मुलांपासून दूर ठेवाव्यात. ज्यामुळे मुलांवर आपल्या समस्यांमुळे नकारात्मक प्रभाव पडणार नाही. पण काही पालकांचे असे होते की, त्यांना तसे करायचे नसते तरीही मुल ही नकारात्मक विचार करतात. अशातच काही पॅरेंटिंग टीप्स फॉलो करुन तुम्ही मुलांना साकारात्मक विचार करण्यास मदत करु शकता. (Positive Thinking in Children)

नकारात्मक ही मुलांच्या दैनंदिन आयुष्यासह भविष्यावर ही परिणाम करते. अशातच मुलं आनंदित राहण्याऐवजी कमी वयातच तणावाखाली जातात किंवा त्यांच्यात चिडचिडेपणा येतो. या सर्वांपासून मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न पालकांनी केला पाहिजे.

-मुलांशी बोला
काही पालकांसमोर मुलं आपल्याला काय वाटते ते सांगतच नाहीत. त्यामुळे मुलं मनातल्या मनात काही गोष्टी लपवून ठेवतो. अशातच मुलांसोबत बसून बातचीत करा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही मुलांशी मित्रत्वाचे नात्याने बोलाल तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या मनात नक्की काय सुरुयं हे सांगतील.

-मुलांमधील चुका काढणे कमी करा
मुलं ही चुकतात. पण त्यांच्यात जर सकारात्मकता आणायची असेल तर पालकांनी त्यांच्या चुका काढणे बंद केले पाहिजे. ते चुकले तर तुम्ही त्यांना समजावून सांगा. पण त्यांच्यामधील चांगल्या गोष्टी सुद्धा पालकांनी पाहिल्या पाहिजेत. तरच तुम्ही मुलाला सकारात्मक बनवण्यास मदत करु शकता.

-नकारात्मक लोकांपासून दूर ठेवा
मुलांवर त्यांच्या संगतीचा परिणाम लगेच होते. अशातच मुलांसोबत असलेल्या नकारात्मक लोकांना त्यांच्या जवळ येऊ देऊ नका. कारण यामुळे सुद्धा मुलाच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत तुमच्या मुलाला ठेवाल तर तो सुद्धा त्याच पद्धतीने विचार करेल. (Positive Thinking in Children)

-स्वत: सकारात्मक रहा
मुलांना साकारात्मक बनवण्यासाठी पालकांनी सुद्धा स्वत: सकारात्मक असले पाहिजे. जेणेकरुन तुमचे मुलं तुम्हाला रोल मॉडेल मानून आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करेल आणि त्याच पद्धतीने जगेल.

हे देखील वाचा- तुमची मुलं शिव्या देण्यास शिकले असतील तर पालकांनी ‘या’ गोष्टी जरुर करा

-अपयशाचा सामना करा
यश आणि अपयश हे आयुष्यात येतच राहते. अशातच अपयश आल्यास तर मुलांना त्यावेळी नकारात्मक भावनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी अपयशातून शिकणे शिकवा आणि आयुष्यात पुढे जाण्यास सांगा. यामुळे मुलांच्या आयुष्यात सकारात्मक विचार वाढीस लागतील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.