Portfolio Diet : सध्याच्या व्यस्त लाफइस्टाइलसह चुकीच्या खाण्यापिण्यासह तणावाच्या स्थितमुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. खासकरुन उच्च कोलेस्ट्रॉल अशी एक समस्या झाली असून याचा लाखोजण सामना करत आहेत. पण केवळ औषधांच्या मदतीने नव्हे तर काही खास डाएटच्या मदतीने कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. जाणून घेऊया पोर्टफोलियो डाएट म्हणजे नक्की काय आहे याबद्दल पुढे सविस्तर जाणून घेऊया.
पोर्टफोलियो डाएट नक्की काय आहे?
पोर्टफोलियो डाएट एक प्लांट बेस्ड डाएट आहे. या डाएटच्या मदतीने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. याशिवाय डाएटमध्ये अशा चार फूड्स एलिमेंट्सचा समावेश असतो जो शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. हा डाएट पहिल्यांदा 2 हजारच्या दशकाच्या सुरुवातीला कॅनडामधील रिसर्चर्स यांनी विकसित केला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत जगभरात हेल्थ एक्सपर्ट्स याची मदत घेतात.

Portfolio Diet
पोर्टफोलियो डाएटमधील चार मुख्य गोष्टी
-सॉल्यूबल फायबर म्हणजे पोटात जाऊन जेल सारखे तयार होते. यामुळे कोलेस्ट्रॉल अवशोषित होण्यापासून रोखले जाते. यासाठी ओट्स, बीन्स, सफरचंद आणि गाजर याचे सेवन करावे.
-सोया प्रोटीनमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. यासाठी टोफू, सोया दूध पिऊ शकता.
-प्लांट स्टेरॉलच्या मदतीने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे अवशोषण कमी होऊ शकते. फोर्टिफाइड ज्यूस, नट्सचे सेवन करू शकता.
-सुक्या मेव्यामध्ये बदाम, अक्रोडसारख्या गोष्टी खाव्यात. यामध्ये गुड फॅट्स असतात.
=======================================================================================================
हेही वाचा :
Watermelon : जाणून घ्या कलिंगड खाण्याचे फायदे आणि खाण्याची योग्य वेळ
वयाच्या चाळीशीत आरोग्याची अशी घ्या काळजी, हृदयासह संपूर्ण हेल्थ राहिल फिट
=======================================================================================================
पोर्टफोलियो डाएट आणि कोलेस्ट्रॉल
नियमित रुपात पोर्टफोलियो डाएटचे सेवन केल्यास शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. रिसर्चनुसार, हे डाएट एकट्याने फॉलो केल्यानेही कोलेस्ट्रॉल कमीत कमी 20-30 टक्के कमी होऊ शकते.
फायदा काय?
-कोलेस्ट्रॉलच्या स्तरामध्ये घट
-हृदयरोगासंबंधित आजारांचा धोका कमी
-वजन कमी करण्यास मदत
-ब्लड शुगर नियंत्रणात राहते
-शरीराला येणारी सूज कमी होते (Portfolio Diet)
या गोष्टींची घ्या काळजी
-पोर्टफोलियो डाएट पूर्णपणे प्लांट बेस्ड आहे. यामुळे नॉन-व्हेज खवय्यांना सुरुवातीला काही बदल करावे लागू शकतात.
-सोया प्रोटीनमुळे समस्या उद्भवणाऱ्या व्यक्तींनी याचे सेवन करणे टाळावे
-डाएट नियमित फॉलो करावे आणि पौष्टिक पदार्थही खा