भारताचे शेजारी असलेल्या दोन प्रमुख देशांचे अस्तित्व पुढील काही वर्षात संपुष्टात येईल अशी परिस्थिती आहे. हे दोन देश म्हणजे, रशिया आणि जपान आहेत. गेल्या तीन वर्ष युक्रेनसोबत युद्ध लढणा-या रशियामध्ये एक नवा सामाजिक धोका उभा राहिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा धोका जपानलाही त्रस्त करत आहे. या दोन देशांना हा जाणवणारा धोका म्हणजे, घटत्या जनसंख्येचा आहे. अलिकडच्या काही वर्षात जपानमधील जन्मदरात घसरण होत आहे. येथील परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की, जन्मदर वाढवण्यासाठी जपान सरकार युवकांना अनेक सुविधा देत आहे. (Population)
अशीच परिस्थिती रशियामध्ये उद्भवण्याची चिन्हे आहेत. 1800 नंतर रशियामध्ये सर्वात कमी मुले जन्माला आली आहेत. येथील जन्मदर 200 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. रशियामध्येही भविष्यात जपानसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती असून युद्धापेक्षा या सामाजिक प्रश्नावर पुतिन सरकारनं लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. गेल्या तीन वर्षापासून युक्रेनबरोबर युद्धात व्यस्त असलेल्या रशियामध्ये कमी होत चाललेल्या लोकसंख्येचा प्रश्न वाढला आहे. सध्या रशियामध्ये लोकसंख्या टिकवून ठेवण्यासाठी प्रति महिला 2.1 मुले आवश्यक आहे. मात्र हा जन्मदर सध्या 1.5 वर आल्यानं चिंता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यामुळे रशियाची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. (International News)
रशियासोबत चीन आणि जपानही अशाच समस्येनं ग्रस्त आहेत. जपानमध्येही कमी होणारी लोकसंख्या ही भविष्यात या देशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभी करणारी ठरत आहे. 2024 या वर्षात जपानची लोकसंख्या ही 8.98 लाखांनी कमी झाली. ही घट मोठी असून अभ्यासकांच्या मते दर वर्षी यात काही टक्क्यांनी वाढ होत जाणार आहे. अशीच परिस्थिती आता रशियामध्येही निर्माण झाली आहे. रशियामध्ये गेल्या काही वर्षात तरुण वर्गामध्ये लग्न संस्था आणि कुटुंब याबदद्ल अनास्था निर्माण झाली आहे. त्यातही करिअरमुळे अनेक तरुणांनी मुलांना जन्म देणे टाळले आहे. त्याचा परिणाम येथील जन्मदरावर झाला आहे. युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून रशियामधील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या युद्धात ओढला गेला आहे. त्यातही अनेकांनी रशियाबाहर जाणे पसंत केले आहे. या सर्वांचा परिणाम रशियामधील जन्मदरावर पडला आहे. रशियाच्या लोकसंख्येत विक्रमी घट झाली आहे. (Population)
गेल्या 200 वर्षाचा विक्रम मोडीत निघाला आहे. यासंदर्भात काम करणा-या रोसस्टॅट नावाच्या सरकारी संस्थेने लोकसंख्येचे नवीन आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारीवरून या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रशियामध्ये फक्त 1,95,400 बाळांचा जन्म झाला. गेल्या वर्षीच्या या महिन्यांच्या तुलनेत हा आकडा तीन टक्के कमी आहे. या संस्थेनुसार हा जन्मदर असाच राहिला तर रशियाची लोकसंख्या वर्षभरातच 30 लाखांपेक्षा जास्त कमी होणार आहे. रोसस्टॅटच्या अहवालानुसार पुढील दोन वर्षांत रशियातील लोकसंख्येत 11 लाखाहून अधिक घट होणार आहे. यानंतर दरवर्षी हा आकडा वाढत जाणार असून रशियामध्ये भविष्यात कमी लोकसंख्येचे मोठे संकट उभे रहाणार आहे. रशियातील संस्थेने हा अहवाल सादर करतांना जपानमधील लोकसंख्येचे उदाहरण दिले आहे. जपानमधील कमी होत जाणारी लोकसंख्या हा मोठा सामाजिक प्रश्न झाला आहे. सध्या जपानचा जन्मदर आता जगातील सर्वात कमी आहे. याचा थेट परिणाम देशातील कामगार वर्गावर झाला असून या देशात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. (International News)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
Portfolio Diet म्हणजे काय? घ्या जाणून सविस्तर इन्फो
=======
याचे अनेक सामाजिक परिणाम आता पुढे येत आहेत. येथील कंपन्यांमध्ये कर्मचा-यांची भरती करण्यासाठी आवश्यक असे मनुष्यबळ नाही. शिवाय कमी होत जाणा-या लोकसंख्येमुळे तयार होणा-या उत्पादनाची खरेदीही होत नाही. याचा थेट परिणाम जपानच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. गेल्या दहा वर्षापासून जपानच्या लोकसंख्येत काही लाखांनी घट होत आहे. जपानी सरकारनं यावर तोडगा म्हणून तरुणांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. शिवाय दोन पेक्षा अधिक मुले असणा-या कुटुंबाचा खर्चही सरकार करत आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्चही सरकार करीत असले तरी जपानी तरुणांमध्ये कुटुंब व्यवस्थेबाबतची अनास्था दूर करण्यात सरकारला यश आले नाही. अशीच परिस्थिती रशियामध्ये होत असून भविष्यात या देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (International News)
सई बने