एक माणूस, जो गरीब होता ज्याच्या खिशात कायम फुटकी कवडीसुद्धा नसायची, पण रोज कोट्यवधीच्या नोटांची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याचं नाव डेव्हिड गॅट. एक सामान्य माणूस जो ल्युमिस फार्गो नावाच्या सिक्युरिटी कंपनीत आर्मर्ड कारचा सुपरवायझर होता. त्याचं काम होतं बँकांमधून कोट्यवधी डॉलर्स इकडून तिकडे नेणं. पण त्याचा पगार? खूपच कमी होता. मग त्याने असं काही केलं, ज्यामुळे FBI ला International Manhunt Mission सुरू करावं लागलं. ही आहे जगाच्या इतिहासातली सर्वात बावळटपणे केलेल्या चोरीची गोष्ट! त्याबद्दल जाणून घेऊ.
ही गोष्ट आहे 1997 सालची. डेव्हिड गॅट, हा अमेरिकेचा एक माजी सैनिक होता, जो आपल्या देशासाठी लढला होता. पण आता तो लूमिस फार्गो कंपनीत आर्मर्ड व्हॅनचा सुपरवायझर होता. म्हणजे काय? तर रोज करोडो रुपये बँकांमधून इकडून तिकडे नेण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. आठवड्याला 75-80 तास काम करायचा, पण कमी पगारामुळे तो वैतागला होता. याचवेळी त्याला भेटली केली कॅम्पबेल,जी ल्युमिस फार्गोमध्येच काम करायची. ऑफिसनंतर त्यांची भेटीगाठी व्हायच्या. केलीने नोकरी सोडली तरी त्यांची मैत्री कायम होती. एकदा केलीने डेव्हिडला स्टीव्ह चेंबर्स नावाच्या मित्राशी ओळख करून दिली. आणि इथूनच सगळं बिघडायला सुरुवात झाली! (David Gatt)
स्टीव्ह हा छोटा-मोटा गुन्हेगार होता. त्याच्या डोक्यात नेहमीच झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न होते. जेव्हा त्याला कळलं की डेव्हिड लूमिस फार्गोच्या आर्मर्ड व्हॅनचा सुपरवायझर आहे, तेव्हा त्याच्या डोक्यात एक खतरनाक आयडिया आली, बँक लुटायची! पण त्यासाठी डेव्हिडची गरज होती. स्टीव्ह आणि केलीने डेव्हिडला फसवायला सुरुवात केली. त्याला श्रीमंत आयुष्याची स्वप्नं दाखवली, ऐशोआरामाचं जीवन दाखवलं. डेव्हिड, जो आधीच आपल्या आयुष्याला कंटाळला होता, त्याच्या मनात हळूहळू लालसा निर्माण झाली आणि तोही या चोरीसाठी तयार झाला. (Top Stories)
आता प्रश्न होता, ही चोरी कशी करायची? स्टीव्हला गुन्ह्याचा अनुभव होता, पण तो छोट्या मोठ्या चोरीचा. केली आणि डेव्हिड तर यात नवखे होते. त्यांचा प्लॅन इतका साधा होता की कोणताही प्रोफेशनल चोर हसला असता. प्लॅन असा होता – 4 ऑक्टोबर 1997 च्या रात्री डेव्हिड व्हॉल्टमध्ये थांबेल, सिक्युरिटी कॅमेरे बंद करेल, त्यांच्या रेकॉर्डिंग कॅसेट्स चोरेल आणि कंपनीच्या व्हॅनमध्ये पैसे भरून तिथून पळून जाईल. पुढे डेव्हिड 10,000 डॉलर्स घेऊन मेक्सिकोला पळेल, कारण तेव्हा अमेरिकन बॉर्डरवरून फक्त इतकीच रक्कम नेण्याची परवानगी होती. बाकी सगळे पैसे स्टीव्हकडे राहतील. मग काही काळानंतर डेव्हिड परत येईल आणि मग सगळे पैसे समान वाटले जातील. पण इथेच एक मोठी चूक होती! (David Gatt)
आणि मग ती रात्र आली. 4 ऑक्टोबर 1997.संध्याकाळी 6 वाजता डेव्हिडने आपल्या ट्रेनी स्टाफला घरी पाठवलं. आता तो एकटाच व्हॉल्टच्या जबाबदारीवर होता. घाबरत-घाबरत त्याने दोन सिक्युरिटी कॅमेरे बंद केले, रेकॉर्डिंग कॅसेट काढली, पण एक तिसरा कॅमेरा बंद करायचा तो विसरला, जो व्हॉल्टच्या एका कोपऱ्यात लपलेला होता. त्या कॅमेऱ्याने सगळं रेकॉर्ड केलं.
रोज ते पैसे तिथून बँकेत नेण्यासाठी घेऊन जायचा ते आज तो स्वत:साठी नेणार होता. यावेळी त्याला पैसे मोजायचे नव्हते, तर सगळं व्हॉल्ट रिकामं करायचं होतं. त्यात २० डॉलरच्या नोटांचा ढीग होता, साधारण ८ लाख नोटा किंवा ८,००० हून जास्त गड्ड्या. या सगळ्या व्हॅनमध्ये भरण्यासाठी त्याला दोन तास लागले. त्याने जवळ जवळ व्हॅनमध्ये चौदाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये भरले होते. पैसे भरल्यानंतर डेव्हिड वेड्यासारखा नाचला त्याचा तो डान्सही तिसऱ्या कॅमेऱ्याने टिपला. (Top Stories)
दुसऱ्या दिवशी सकाळी, लूमिस फार्गोचे कर्मचारी आले, आणि व्हॉल्टच्या चाव्या गायब होत्या, पोलिसांना बोलावलं गेलं. डेव्हिड ऑफिसमध्ये नव्हता, म्हणून संशय थेट त्याच्यावरच गेला. सिक्युरिटी फुटेजमध्ये डेव्हिडचा डान्स पाहिल्यावर शंका खात्रीत बदलली. फुटेजमध्ये दिसलं की डेव्हिड चोरीदरम्यान पेजरवर कोणाला तरी मेसेज करत होता. यामुळे पोलिसांना कळलं की तो चोरीत एकटा नव्हता. (David Gatt)
पोलिसांनी आणि FBI ने डेव्हिड आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. दोन दिवसांनी जंगलात ती व्हॅन सापडली, ज्यात जवळपास २५ कोटी रुपये तसेच सोडले होते. कदाचित वेळ कमी पडल्याने डेव्हिडने ते सोडले. आता डेव्हिड आणि त्याच्या साथीदारांकडे 14 मिल्यन डॉलर्स होते म्हणजेच ११ शे कोटी रुपये, तेही 20 डॉलर्सच्या नोट्समध्ये, ज्या ट्रॅक करता येणार नव्हत्या. (Top Stories)
डेव्हिड प्लॅनप्रमाणे 10,000 डॉलर्स घेऊन मेक्सिकोला पळाला. तिथे तो एका लग्झरी बीच रिसॉर्टवर राहायला लागला. FBI ने डेव्हिड आणि त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी न्यूजपेपरमध्ये जाहिराती दिल्या, माहिती देणाऱ्याला ५ लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलं. नंतर त्यांनी शोध असा सुरू केला की अचानक कोणाकडे जास्त पैसा आला आहे हे तुम्हाला दिसल तर आम्हाला कळवा. (David Gatt)
================
हे देखील वाचा : Europe Building Rules : या देशांमध्ये टोलेजंग इमारती उभारु शकत नाही, सर्वात श्रीमंत देशाचाही समावेश
================
यामुळे पोलिसांना अनेक कॉल येऊ लागले आणि एक कॉल आला ज्याने स्टीव्ह चेंबर्सवर बोट ठेवलं. FBI ने त्याच्यावर नजर ठेवली. स्टीव्ह आणि त्याची बायको मिशेल यांनी मोठं घर, BMW गाडी आणि इतर ऐशोआरामाच्या गोष्टींवर पैसे उधळले होते. बँक खात्यांची तपासणी केल्यावर कळलं की त्यांनी ४ ऑक्टोबरनंतर मोठी रक्कम जमा केली होती, तीही २० डॉलरच्या नोटांमध्ये. मिशेलने बँक टेलरला विचारलं होतं की किती पैसे जमा केल्यावर सरकारला कळवावं लागत नाही. FBI ने स्टीव्हच्या फोनवर नजर ठेवली, आणि एक धक्कादायक गोष्ट समोर आली. स्टीव्ह डेव्हिडला मेक्सिकोत मारण्याचा प्लॅन आखत होता, जेणेकरून सगळा पैसा तो एकटाच घेईल! FBI ने स्टीव्हचा साथीदार माइक मॅकेनीला अटक केली, आणि त्याने सगळं सांगितलं. डेव्हिड मेक्सिकोत आहे, आणि सगळा प्लॅन स्टीव्हचाच होता हे पोलिसांना समजलं. (David Gatt)
1 मार्च 1998 ला डेव्हिडला मेक्सिकोतून अटक झाली. दुसऱ्या दिवशी स्टीव्ह, मिशेल आणि केलीला अटक झाली. FBI ने चोरलेल्या पैशांपैकी 88% परत मिळवले. स्टीव्हला 11 वर्षांची, तर डेव्हिडला 7 वर्षांची शिक्षा झाली. डेव्हिडवर ३० लाख डॉलर्सचा दंडही ठोठावला, जे त्याने खर्चच केले नव्हते. (David Gatt)
या घटनेवर 2016 मध्ये “मास्टरमाइंड्स” नावाचा एक मूवी आला होता. डेव्हिडने या चित्रपटात कन्सल्टंट म्हणून काम केलं, पण त्याला एकही पैसा मिळाला नाही. का? कारण कायद्याने त्याची कमाई थेट त्याचावर ठोठावलेल्या दंड भरण्यासाठी जाते. आज डेव्हिड फ्लोरिडात आपल्या कुटुंबासोबत राहतो, तो बांधकाम मजूर म्हणून काम करतो, तो दंड त्याने आयुष्यभर कमावलं तरी तो भरू शकणार नाही. असं त्याचं म्हणणं आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics