मराठी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. पूजा नेहमीच तिच्या कमाल फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असतो. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या पूजा नुकतेच तिचे सिंपल मात्र अतिशय आकर्षक असे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पूजाने कॉटनची साडी नेसली आहे. तिची साडी निळ्या रंगाची असून त्याला हिरव्या रंगाची बॉर्डर आहे. अतिशय साधी तरीही खूपच सुंदर असलेल्या या साडीने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. यावर तिने हिरव्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज पूजाने परिधान केला आहे.
पूजाने हे फोटोशूट भर पावसात टेरेसवर केलेले आहे. ‘वर्षाऋतू’ असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहे. तिच्या या आकर्षक फोटोंवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत.
पूजा सावंतच्या मेकपबद्दल बोलायचे झाल्यास तिने अतिशय नॅचरल मेकअप केलेला दिसत आहे. तिने काजळ, लायनर, कानात झुमके आणि टिकली लावून लुक पूर्ण केला आहे.
‘कलरफुल’ नावाने लोकप्रिय असणाऱ्या पूजाचे ‘नाच गो बया’ हे गाणे सध्या तुफान गाजत असून, सोशल मीडियावर हे गाणे भरपूर गाजत आहे.