Home » राजकारण म्हणजे वेड्यांचा बाजार

राजकारण म्हणजे वेड्यांचा बाजार

by Team Gajawaja
0 comment
Barack Obama
Share

राजकारण म्हणजे वेड्यांचा बाजार आहे, हे वाक्य आहे अमेरिकेचे ४४ वे अध्यक्ष राहिलेल्या बराक ओबामा यांचे.  जगात सर्वात शक्तीशाली देश म्हणून अमेरिकेचे नाव घेतले जाते.  या अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा हे, २००९ ते २०१७ या कालवधीत राहिले आहेत.  याच बराक ओबामा यांनी राजकारणाला वेड्यांचा बाजार म्हटले आहे. 

याला कारण झाल्या आहेत, त्यांच्या दोन मुली.  बराक ओबामा यांना मिलिया आणि साशा या दोन मुली आहेत.  या दोन्ही मुलींनी उच्चशिक्षण घेतले असून वेगवेगळ्या क्षेत्रात या दोघी कार्यरत आहेत.  आता अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहत असतांना ओबामा यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी राजकारणात येईल, आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरेल अशा चर्चा होत आहेत. (Barack Obama) 

यामुळे ओबामा व्यथित झाले आहेत.  त्यांनी एका मुलाखतीत आपल्या दोन्ही मुलींपैकी कोणतीही मुलगी कधीच राजकारणात येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.  यासाठी कारण देतांना त्यांनी राजकारण म्हणजे, वेड्यांचा बाजार आहे, या बाजारात माझ्या मुली येणार नाहीत, हे ठामपणे सांगितले आहे.  त्यामुळे आता ओबामा यांच्या या वक्तव्याची आणि त्यांच्या दोन मुलींची चर्चा होत आहे.  

बराक ओबामा हे अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असतांना त्यांच्यासह त्यांची पत्नी मिशेल, आणि मिलिया आणि साशा या मुली व्हाईट हाऊसमध्ये रहात होत्या.  ओबामा तब्बल आठ वर्ष अमेरिकेचे अध्यक्ष राहीले. ओबामा यांनी अध्यक्षपदाची पहिल्यंदा शपथ घेतली तेव्हा या दोन्ही मुली मिडियासमोर आल्या.  शाळेत जाणा-या या मुली आता उच्चविद्याविभूषीत झाल्या आहेत. ओबामा आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर अध्यक्षपदापासून दूर गेले.  त्यांनी व्हाईट हाऊस सोडले.  त्यानंतर हे ओबामा कुटुंब लाईमलाईटपासून दूर झाले. 

पण अलिकडे पुन्हा ओबामा कुटुंबातील कोणीतरी अध्यक्षपद निवडणुकीत येणार असल्याची चर्चा सुरु झाली.  यात पहिला नंबर आला तो त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा.  मिशेल ओबामा या पेशानं वकील असून त्यांचा अनेक सामाजिक संस्थांमध्ये सहभाग असतो.  तसेच ओबामांच्या कार्यकालातही ओबामा मिशेल यांचे सल्ले घ्यायेचे असे सांगण्यात येते.  त्यामुळेच मिशेल ओबामा यांचे नाव आघाडीवर आले.  पण मिशेल यांनी त्याला नकार देताच मिडियाचा मोर्चा त्यांच्या दोन मुली मिलीया आणि साशा यांच्याकडे वळला आहे.  (Barack Obama)

ही चर्चा वाढल्यावर बराक ओबामा यांनीच पुढे येत माझ्या दोन मुली राजकारणात येणार नाहीत, हे स्पष्ट केले आहे.  याचे कारण सांगतांना ओबामा यांनी सांगितले आहे की, माझ्या पत्नीला आमच्या मुलींनी राजकारणात यावे असे वाटत नसल्याचे सांगितले आहे.  लॉस एंजेलिसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी संबंधित निधी उभारणी कार्यक्रमात बराक ओबामा यांना यासंदर्भातले प्रश्न विचारण्यात आले होते.  बराक आणि मिशेल ओबामा यांच्या दोन्ही मुली आता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.  त्यांची मोठी मुलगी मालिया ही २५ वर्षाची तर धाकटी साशा ही २२ वर्षाची आहे.  २०२१ मध्ये हार्वर्डमधून पदवी घेतल्यानंतर मालिया ओबामा चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे.(Barack Obama)

==============

हे देखील वाचा : म्यानमारच्या राजकरणात भारत सरकारची एन्ट्री 

==============

नुकताच मालियाचा द हार्टहा लघुपट सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला आहे. मालिया ही या चित्रपटाची लेखक आणि दिग्दर्शक आहे. काही महिन्यांपूर्वी मालियाने तिच्या नावा बरोबर असलेले वडीलांचे नाव काढून टाकले आहे. आता ती सोशल मिडियावर मालिया ओबामाऐवजी मालिया ॲनम्हणून लिहिते.  यावरुन वडीलांच्या नावाचा ती आपल्या कार्यक्षेत्रात उपयोग करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Barack Obama)

तिच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले आहे.  मालियाची धाकटी बहीण साशाही अन्य क्षेत्रात कार्यरत आहे.  तिने गेल्या वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून समाजशास्त्राची पदवी घेतली आहे.  या दोन्ही मुलींवर त्यांची आई मिशेल ओबामा यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे.  मिशेल यांनी मुलींना स्वतंत्रपणे सांभाळले आहे.  व्हाईट हाऊसमध्ये रहात असतांनाही मिलिया आणि साशा या दोघींनी सामान्य नागरिकांप्रमाणे रहावे यासाठी त्यांचा आग्रह होता.  या दोन्ही मुली सुट्टीमध्ये अन्य अमेरेकी तरुणांप्रमाणे काम करुन पॉकीटमनी जमा करत असत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.