Home » राजकारणात आणि बॉलिवूडमध्ये दबदबा असणारे बाबा सिद्धीकी आहेत तरी कोण?

राजकारणात आणि बॉलिवूडमध्ये दबदबा असणारे बाबा सिद्धीकी आहेत तरी कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Baba Siddique
Share

संपूर्ण मुंबईला नव्हे नव्हे संपूर्ण देशाला हादरवणारी एक मोठी घटना दसऱ्याच्या शुभ दिनी मुंबईत घडली आहे. अजित पवार गटाचे बडे नेते असलेल्या बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फटाक्यांच्या आवाजामध्ये बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांना तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

काँग्रेसचे मोठे आणि नावाजलेले नेते असलेल्या बाबा सिद्धीकी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्धीकी यांचे राजकारणासोबतच मनोरंजनविश्वात देखील मोठे आणि दृढ संबंध होते. बाबा सिद्धीकी म्हटल्यावर अनेकांना आठवतात त्या आलिशान आणि मोठ्या रमजानच्या पार्ट्या. बाबा सिद्धीकी या पार्ट्यांसाठी देखील मोठे चर्चेत असायचे. नक्की बाबा सिद्धीकी आहेत कोण?, राजकारणी असूनही मनोरंजनविश्वात त्यांच्या दबदबा का? चला जाणून घेऊया.

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी यांचा जन्म १३ सप्टेंबर १९५८ रोजी झाला. त्यांचे वडील मुंबईमधील वांद्रे या भागात घड्याळ तयार करण्याचे काम करायचे. बाबा सिद्दीकी हे देखील त्यांच्या अभ्यास सांभाळून त्यांच्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचे. बाबा सिद्दीकी यांनी मुंबईच्या एमएमके कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. मात्र बाबा यांचे शिक्षण चालू असतानाच त्यांना राजकारणात आवड निर्माण झाली. ते राजकारणाशी निगडित काम करू लागले.

Baba Siddique

बाबा सिद्दीकी यांनी 1977 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्यावेळच्या विविध विद्यार्थ्यांच्या चळवळींमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे सदस्य म्हणून सहभाग देखील घेतला होता. त्यांनी काँग्रेस पक्षात राहून काम करण्यास सुरुवात केली. १९७७ साली ते NSUI मुंबईचे सदस्य झाले. पुढे तीन वर्षात अर्थात १९८० साली त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि १९८२ साली त्यांना अध्यक्ष देखील करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मुंबई महापालिकेत प्रवेश झाला.

मुंबई महापालिकेत प्रवेश झाल्यानंतर त्यांनी हळूहळू ओळख तयार करून आपल्या कामाने स्वतःची ओळख तयार केली आणि स्वत:ला प्रस्थापित केले. पुढे बाबा सिद्धीकी यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विधानसभेत निवडून गेले. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून १९९९ मध्ये ते आमदार झाले. २००४ ते २००८ या काळात ते मंत्री देखील होते. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबा सिद्दीकींचा पराभव झाला होता. सध्या त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी या जागेवरून आमदार आहे.

बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक बडे नेते होते. मात्र यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अर्थात १० फेब्रुवारी २०२४ रोजी बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तत्पूर्वी बाबा सिद्दीकी हे काँग्रेसच्या तिकीटावर तीन वेळा आमदार झाले होते. २००० ते २००४ या कालावधीत महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून बाबा सिद्दीकी यांची नियुक्ती केली होती.

बाबा सिद्धीकी यांचे बॉलिवूडमधील बडे स्टार्स आणि टीव्ही स्टार्स यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध होते, त्यांच्या रमजान पार्ट्याना संपूर्ण मनोरंजनविश्व उपस्थित असायचे. राजकारणामध्ये असूनही मनोरंजनविश्वात दबदबा असलेल्या बाबा यांचा हा संबंध कसा तयार झाला जाणून घेऊया.

सुरुवातीपासूनच मुंबईतील वांद्रे हे बाबा सिद्दीकी यांचे राजकीय कार्यक्षेत्र होते. तेआणि वांद्रे हा भाग म्हणजे पॉश आणि संपूर्ण बॉलिवूड कलाकारांचे निवासस्थान. त्यामुळे जेव्हा ते राजकारणात स्वतःला स्थपित करत होते. तेव्हा त्यांची भेट अनेकदा विविध कलाकारांसोबत व्हायची. अशीच त्यांची भेट एकदा सुनील दत्त यांच्याशी झाली. त्यानंतर संजय दत्त यांच्या ते संपर्कात आले.

हळूहळू संजय यांच्याकडून सलमान आणि मग दुसरे कलाकार अशी त्यांची ओळख वाढत गेली. आज अशी परिसथिती होती की, बाबा सिद्धीकी यांच्या संपर्कात सर्वच बॉलिवूड स्टार्स होते. त्यांच्या एका फोनवर सर्व कलाकार रमजान पार्टीला यायचे. यातही सलमान खानशी बाबा यांचे संबंध जास्तच जवळचे आणि खास होते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.