Home » देशातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकच युनिफॉर्मबद्दलचा पीएम मोदींनी का मांडला विचार?

देशातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकच युनिफॉर्मबद्दलचा पीएम मोदींनी का मांडला विचार?

by Team Gajawaja
0 comment
Police Uniform
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिसांसाठी एक राष्ट्र, एक वर्दीचा विचार मांडला आहे. राज्यातील गृहमंत्र्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय चिंतन शिबिरला संबोधित करताना मोदी यांनी म्हटले की, त्यांच्याकडून याबद्दलचा फक्त विचार मांडण्यात आला आहे. हा विचार राज्यांसाठी ऑप्शनल आहे. पुढे मोदी यांनी म्हटले, पोलिसांसाठी एक राष्ट्र, एक वर्दीचा विचार आहे. याबद्दल विचार करावा. हे ५,५० किंवा शंभर वर्षात असे होऊ शकतो. पण आपल्याला विचार केला पाहिजेच. (Police Uniform)

मोदींचे असे म्हणणे आहे की, यामुळे कायद्याच्या चौकटीतील लोकांना एक सामान्य ओळख मिळेल. त्यांना देशात कुठे ही ओळखले जाईल. पंतप्रधानमंत्र्यांनी असे ही म्हटले त्यांचे असे मानणे आहे की, देशभरातील पोलिसांची ओळख एकसारखी असावी. देशातील बहुतांश ठिकाणी पोलीस ब्रिटिश कालीन खाकी वर्दी घालतात. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये त्यांचा रंग, कपडे आणि पॅटर्न बदलत राहतो. तर पाहूयात पोलिसांच्या वर्दीचा इतिहास आणि राज्यांनुसार पोलिसांच्या वर्दीत फरक का असतो त्याचबद्दल अधिक.

Police Uniform
Police Uniform

काय आहे पोलीसांच्या वर्दीचा इतिहास?
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची वर्दी ही सफेद रंगाची होती. भारताच्या वातावरणानुसार या रंगाची वर्दी ठिक नव्हती. लगेच खराब व्हायची. तेव्हा अधिकाऱ्यांनी विविध रंगातील वर्दी काढण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी बहुरंगी पोषाख सुद्धा डिझाइन केले. वर्ष १८४७ मध्ये सर हेनरी लॉरेंस द्वारे खाकी रंगाची पोलिसांची वर्दी म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत खाकी रंगाची वर्दी पोलिसांकडू घातली जाते.

कोण ठरवते पोलिसांची वर्दी?
भारतीय संविधानानुसर, देशातील कायदा आणि व्यवस्था राज्याचा विषय आहे यासाठी वर्दी आणि पोलिसांसबंधित अन्य मुद्द्यांवर निर्णय हा राज्य सरकारकडून घेतला जातो. संविधानाच्या सातव्या अनुसूचीची लिस्ट २ राज्यांसंबंधित आहे. संघ आणि राज्यांचे अधिकार त्यामुळे विभाजन होतात. राज्य सरकार आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षबलाच्या वर्दीवर निर्णय घेऊ शकतात. (Police Uniform)

हे देखील वाचा- आयुष्यातील प्रत्येक बंधनांवर मात करत “ती” बनली देशाची पहिली महिला बाउंसर

राज्यात विविध युनिफॉर्म
पोलिसांचे युनिफॉर्म हे राज्यांनुसार विविध आहेत. बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी ही खाकी रंगाची असते. काही राज्यात दुसरे रंग ही दिसतात. कोलकाता मधील पोलीस सफेद रंगांची वर्दी घालतात, तर अन्य राज्यांमध्ये वर्दीचा रंग हा खाकी आहे. पुड्डुचेरी मधील पोलीस आपल्या खाकी वर्दीसह लाल रंगाची टोपी घालतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.