पासपोर्ट बनवण्यासाठी पोलिसांचे क्लियरेंस सर्टिफिकेट (Police Clearance Certificate) असणे फार महत्वाचे आहे. पोलिसांच्या वेरिफिकेशननंतरच तुम्हाला पासपोर्ट दिला जातो. मात्र पासपोर्ट तयार करणाऱ्यांना माहिती असते की, हे सर्टिफिकेट मिळवणे किती मुश्किल असते. आता पर्यंत चार-पाच वेळा पोलीस स्थानकात जाऊन येणे, पोलीस घरी तपासणीसाठी येणे अशा गोष्टी होत नाही तो पर्यंत क्लियरेंस सर्टिफिकेट बनत नाही. पासपोर्ट बनवण्यासाठी उशिर होण्यामागे हे सुद्धा एक कारण आहे. याच समस्येला सुधारण्यासाठी आता एक नवा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता अर्जदार पोस्ट ऑफिसातील पासपोर्ट सेवा केंद्रात सुद्धा पोलीस क्लियरेंस सर्टिफिकेटसाठी अर्ज करु शकतात. आजपासून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
काय आहे क्लियरेंस सर्टिफिकेट
पोलीस क्लियरेंस सर्टिफिकेट नेहमीच स्थानिक पोलीस स्थानकातून दिले जाते. हे सर्टिफिकेट तुमच्या रहिवाशी प्रमाणपत्राच्या आधारावर पोलिसांकडून दिले जाते. पासपोर्ट बनवण्यासाठी हे नेहमीच गरजेचे असते. कारण अथॉरिटीला कळून घ्यायचे असते की, अर्जदाराच्या विरोधात कोणताही गुन्हा तर दाखल केलेला नाही ना. पोलिसांकडून अर्जदाराचे सर्व रेकॉर्ड ही तपासून पाहतात आणि त्यानंतरच क्लियरेंस सर्टिफिकेट देतात. याच आधारावर तुम्हाला पासपोर्ट दिला जातो.
याआधी काय होती व्यवस्था
अर्जदार याआधी पोलीस क्लियरेंस सर्टिफिकेटसाठी शासकीय पासपोर्ट सेवा पोर्टलच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करत होता. जी लोक परदेशात राहतात, त्यांना क्लियरेंस सर्टिफिकेटसाठी हायकमीशन ऑफिस म्हणजेच इंडियन एम्बेसीच्या कार्यालयात अर्ज करावा लागत होता.आता पासपोर्ट संबंधित सर्व सुविधा पोस्ट ऑफिस सेवा केंद्रात सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदार ऑनलाईन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर अर्ज करु शकतो. (Police Clearance Certificate)
हे देखील वाचा- पोस्ट ऑफिसातून तुम्ही १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढणार असाल तर करावे लागेल ‘हे’ वेरिफिकेशन
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
परराष्ट्र मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, पोस्ट ऑफिसात पोलीस क्लियरेंस सर्टिफिकेट देण्याची सुविधा अशा कारणास्तव सुरु केली की, सध्या याची मागणी अधिक आहे. याचा अर्थ असा झाला की, अधिकाधिख लोक पासपोर्टसाठी अर्ज करत आहेत. त्यामुळेच क्लियरेंससाठी समस्या येत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरु झाल्यास कोणत्याही व्यक्तीला त्याच्या घराजवळील पासपोर्ट सेवा केंद्रावर जाऊन ते सर्टिफिकेट सहज बनवता येऊ शकते. यामुळे पोलीस स्थानकात वारंवार जाण्याचा वेळ ही वाचणार आहे. मात्र सर्टिफिकेटसाठी पोस्ट ऑफिसात तुम्हाला प्रथम अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.