Home » आध्यात्मिक, गांधीवादी आणि सेवादार… अशा होत्या पीएम मोदी यांच्या आई

आध्यात्मिक, गांधीवादी आणि सेवादार… अशा होत्या पीएम मोदी यांच्या आई

by Team Gajawaja
0 comment
PM Narendra Modi Mother
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांचे ३० जानेवारीला निधन झाले. त्यामुळे संपूर्ण जगभरातून त्यांना श्रद्धांजली दिली जात आहे. लहानपणापासून आव्हानांचा सामना करत असलेल्या हिराबेन यांनी गरीबी आणि कठीण परिस्थितींमध्ये सुद्धा आपल्या मुलांना वाढवले. पति दामोदरदास मोदी यांच्या निधनानंतर त्या मुलगा पंकज मोदी यांच्यासोबत राहू लागल्या होत्या. तर पीएम मोदी यांना आपल्या काही जबाबदारींमुळे त्यांच्यासोबत अधिक काळ व्यतीत करता आला नाही. मात्र पंकज यामध्ये भाग्यवान होते. त्यांनी आपल्या आईसोबत दीर्घकाळ व्यतीत केला. (PM Narendra Modi Mother)

अहमदाबाद मिरर सोबत बातचीत करताना पंकज मोदी यांनी असे म्हटले होते की, गुजराती शब्द ‘बा’ हे एक अक्षर आहे. ज्याचा अर्थ आई असा होतो. मात्र हा शब्द माझ्यासाठी संपूर्ण जगच आहे. माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूवर आईची छाप आहे. तसेच आईच्या काही रुपांबद्दल ही त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, त्यांनी आई हिराबेन या खुप आधात्मिक होत्या. जो पर्यंत शरिराने साथ दिली तो पर्यंत त्या प्रत्येक वर्षी केदारनाथ, बदरीनाथ सारख्या धामच्या येथे जायची. त्यांच्यासोबत मी सुद्धा जायचो असे पंकज मोदींनी सांगितले. तेथे संतांची सेवा करत.

PM Narendra Modi Mother
PM Narendra Modi Mother

वयाच्या अवघ्या ६-७ वर्षापासूनच पंकज मोदी यांनी आपल्या आईसोबत व्रत ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यामध्ये आध्यात्म आणि सेवा भाव हा आईकडूनच आला होता. त्यांचा आणखी एक मुलगा सचिन याच्यामध्ये ही आईचे संस्कार दिसून येतात.

महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरित होत हिराबेन यांनी चरखा चालवणे, सूत कातणे अशी कामे करायच्या. तसेच हिराबेन या स्वत:च खादीचे कपडे स्वत:साठी तयार करत. खादीच्या साडी घालणे त्यांना आवडायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गांधी यांच्या मार्गाने चालतात हे सुद्धा आपण वेळोवेळी पाहिले आहे. पकंज मोदी यांना सुद्धा खादीच्या वस्तू फार आवडतात.(PM Narendra Modi Mother)

हे देखील वाचा- एशियातील पहिल्या कमर्शियल महिला पायटल म्हणून रेकॉर्ड करणाऱ्या ”इंद्राणी सिंह”

बा यांच्या धर्मनिरपेक्षतेवर त्यांच्या मुलांना नेहमीच गर्व वाटायचा. लहानपणापसूनचे मित्र अब्बास यांची कथा तर मोदी यांनी अशी सांगितली होती की, त्यांच्या बा अब्बासला आपल्याच मुलाप्रमाणे वागवायची. पंकज मोदी यांनी सांगितले की, वडनगरच्या जिल्ह्यात ते रहायचे, तेथे मुस्लिम आणि हरिजन लोकसंख्या अधिक होती. पण बा या सर्वांना समानतेने पाहत. त्यांनीच मुलांना दिलेल्या संस्कारांमुळे सर्वांना सर्वधर्म समभाव या दृष्टीने पाहण्याची शिकवण मिळाली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.