Home » पीएम मोदी ठरले सर्वाधिक फॉलोवर्स असणारे नेते

पीएम मोदी ठरले सर्वाधिक फॉलोवर्स असणारे नेते

by Jyotsna Kulkarni
0 comment
PM Modi followers on X
Share

यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये तिसऱ्यांदा यश मिळवत आपली हॅट्रिक साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांचा अतिशय योग्य आणि उत्तम पद्धतीने उपयोग करून घेतला. यात अगदी रेडिओपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वच माध्यमांचा समावेश आहे. (PM Modi followers on X)

‘मन की बात’ करत मोदीजींनी सगळ्यांवर आपला प्रभाव टाकला आणि देशातच नाही तर परदेशातही त्यांनी त्यांच्या हुशारीने, प्रभावी व्यक्तिमत्वाने सगळ्यांना आपलेसे केले. भारताची जगात प्रतिमा उजागर करण्यासाठी मोदीजींना सर्वात जास्त श्रेय जाते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जगभरातील अनेक देशांमध्ये हजेरी लावली. सगळीकडे मोदींच्या नामाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळाला.

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियत्ते झपाट्याने झालेली वाढ आपल्याला विविध माध्यमांच्या मार्फत दिसतच असते. मात्र आता मोदीजींच्या लोकप्रियतेचे एक मोठे उद्धरण समोर आले. आजच्या सोशल मीडियाच्या काळात मोदीजी देखील विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यांना जगभरातील असंख्य लोकं फॉलो करतात. अशातच एक्स अर्थात ट्विटरवर त्यांनी १०० दशलक्ष म्हणजेच १० कोटी फॉलोअर्सची संख्या ओलांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले आहेत. मागील ३ वर्षात ३० दशलक्ष म्हणजे 3 कोटी नवीन लोकांनी मोदींना फॉलो केले आहे. नरेंद्र मोदी २००९ मध्ये X अर्थात ट्विटरवर आले होते. (PM Modi followers on X)

PM Modi followers on X

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना धन्यवाद म्हटले आहे. त्यांनी लिहिले, “या माध्यमावर आल्याने चर्चा, वाद-विवाद, अंतर्दृष्टी, लोकांचे आशीर्वाद,त्यांच्या टीका आणि बऱ्याच काही गोष्टींचा आनंद, अनुभव घेतला. भविष्यात मी अशाच रोमांचक काळाची वाट पाहत आहे.”

दरम्यान १० कोटी फॉलोवर्स असणारे नरेंद्र मोदी हे जगभरातील पहिलेच राजकीय नेते बनले आहेत. त्यांनी जगभरातील अतिशय मोठ्या आणि गाजलेल्या नेत्यांनी देखील याबाबतीत मागे टाकले आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, दुबईचे शासक, पोप फ्रान्सिस यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी हे खूप पुढे आहेत. जो बिडेन यांना ३८.१ मिलियन लोक फॉलो करतात, तर दुबईचे शासक एचएच शेख मोहम्मद यांना ११.२ मिलियन लोकं फॉलो करतात. यावरूनच समजते की पंतप्रधान मोदी यांची जगभरात किती लोकप्रियता आहे. अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकं त्यांना फॉलो करत आहेत. (PM Modi followers on X)

आपण जर आपल्याच देशातील चर्चित आणि प्रसिद्ध राजकीय नेत्यांच्या फॉलोवर्सशी नरेंद्र मोदी यांच्या फॉलोवर्सची तुलना केली तर इथे देखील मोदी यांनी सगळ्यांनाच खूप मागे सोडले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे X वर २६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २७.५ मिलियन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे १९.९ दशलक्ष, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ७.४ मिलियन, लालू यादव यांचे ६.३ मिलियन, तेजस्वी यादव यांचे ५.२ मिलियन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांचे 2.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

====================

हे देखील वाचा : २५ जून साजरा होणार ‘संविधान हत्या दिन’

====================

पंतप्रधान मोदींचे १०० दशलक्ष फॉलोअर्स झाल्यानंतर ते आता जागतिक पातळीवरील सर्वाधिक फॉलोवर्स असणारे दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले आहेत. पहिला नंबर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा असून त्यांचे सर्वाधिक १३१.७ दशलक्ष इतके फॉलोअर्स आहेत. मात्र ते आता कोणत्याही सरकारी पदावर कार्यरत नाहीत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा क्रमांक तर तिसऱ्या क्रमांकावर डोनाल्ड ट्रम्प असून त्यांचे ८७.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. चौथ्या क्रमाकांवर जो बायडेन ३८.१ दशलक्ष आणि रेसेप तय्यिप एर्दोगन हे २१.५ दशलक्ष फॉलोअर्ससह पाचव्या क्रमांकावर आहेत. (PM Modi followers on X)

यात मोदी यांनी विराट कोहली, ब्राझिलचा फूटबॉलपटू नेयमार ज्यु., गायिका टेलर स्विफ्ट, लेडी गागा आणि किम कार्दशियन आदी मोठमोठ्या जागतिक सेलिब्रिटींना देखील मागे टाकले आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.