Home » R Ashwin : आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला लिहिले भावनिक पत्र

R Ashwin : आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला लिहिले भावनिक पत्र

by Jyotsna Kulkarni
0 comment
R Ashwin
Share

काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) स्टार गोलंदाज (Bowler) आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या (Test Series) मध्यातच अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) त्याच्या निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आणि सगळ्यांचा धक्का बसला. अश्विनने ब्रिसबनमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या (Third Test Match) शेवटच्या दिवशी निवृत्त होण्याची घोषणा केली. (PM Modi letter to R Ashwin)

अश्विनच्या या निर्णयामुळे लाखो क्रिकेटप्रेमी (Cricket Lover) लोकांना दुःख झाले. आर अश्विनने त्याच्या करियरमध्ये केवळ त्याच्या गोलंदाजीनेच (Bowling) नव्हे तर फलंदाजीने (Batting) देखील भारतासाठी अनेक अशक्य वाटणारे विजय शक्य करून दिले. अश्विन निवृत्त झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत त्याच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील अश्विनसाठी एक खास पत्र (Letter) लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी अश्विनला शुभेच्छा देताना त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे. शिवाय त्याने अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्याचे सांगत अनेक घटनांना उजाळा दिला आहे. मोदी यांनी नक्की या पत्रात काय लिहिले चला जाणून घेऊया.

“आशा आहे की, हे पत्र तुम्हाला तुमच्या उत्तम आरोग्य स्पिरिटमध्ये असताना मिळेल.
तुमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेने भारतातील आणि जगभरातील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अशा वेळी जेव्हा प्रत्येकजण आणखी अनेक ऑफ-ब्रेकची अपेक्षा करत होता, तेव्हा तुम्ही कॅरम बॉल (Carrom Boll) टाकला ज्याने सगळेच बोल्ड झाले. तरी देखील, प्रत्येकाला हे समजले आहे की तुमच्यासाठी हा एक कठीण निर्णय होता, खासकरून तुम्ही भारतासाठी खेळलेल्या उत्कृष्ट कारकिर्दीनंतर.

R Ashwin

आम्ही आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९९ क्रमांकाची जर्सी नक्कीच मिस करू. तुम्ही प्रतिस्पर्ध्यांभोवती जाळे विणत बॉलिंग करताना कोणत्याही क्षणी आपल्याला विकेट मिळेल अशी भावना नेहमीच सर्वांमध्ये असायची. तुमच्याकडे चांगल्या ऑफ-स्पिनसह फलंदाजांना बाद करण्याची विलक्षण क्षमता आहे. तसेच परिस्थितीच्या मागणीनुसार खेळण्याची विविधता आहे.

तुम्ही सर्व फॉरमॅटमध्ये घेतलेल्या ७६५ आंतरराष्ट्रीय विकेट्सपैकी प्रत्येक विकेट खास होती. कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार (Man Of The Series) मिळवण्याचा विक्रम तुम्ही स्वतःच्या नावे केला. यावरूनच गेल्या अनेक वर्षांमध्ये तुम्ही कसोटी संघाच्या यशामध्ये दिलेले मोलाचे योगदान दिसून येते.

एक तरुण खेळाडू असताना तुम्ही कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेतल्या आणि २०११ वन-डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग झालात. २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या षटकात तुम्ही संघाला विजय मिळवून दिला आणि तुम्ही संघाचे प्रमुख सदस्य झालात. तुम्ही खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विजय मिळवून संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वर्षातील सर्वोत्कृष्ट ICC क्रिकेटर ठरलेला एक खेळाडू म्हणून, आपण आंतरराष्ट्रीय प्रशंसा आणि कमालीचा सार्वत्रिक आदर मिळवला.

एकाच सामन्यात शतक झळकावत पाच विकेट्स देखील घेऊन तुम्ही तुमच्या अष्टपैलू पराक्रमाचे प्रदर्शन केले होते. फलंदाजीमध्ये सुद्धा तुम्ही २०२१ मध्ये सिडनीमध्ये खेळलेल्या मॅच सेव्हिंग इनिंगच्या या देशाला अनेक आठवणी दिल्या आहेत.

अनेकदा खेळाडू त्यांनी खेळलेल्या काही अविस्मरणीय शॉटसाठी लक्षात राहतात. पण २०२२ मधील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या सामन्यात एक शॉट आणि विजय या दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही कायमच आमच्या स्मरणात राहाल. तुमच्या विजयी शॉटमुळे खूप आनंद झाला. ज्या पद्धतीने तुम्ही पहिला बॉल सोडला होता, तो वाइड बॉल होण्याच्या मार्गावर होता, यावरून तुमची समयसूचकता दिसून आली.

प्रतिकूल परिस्थितीतही तुमचा प्रामाणिकपणा आणि वचनबद्धता समोर आली. तुमची आई रुग्णालयात दाखल असताना देखील तुम्ही ज्या प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने पुन्हा दौऱ्यावर गेला होता. शिवाय चेन्नईतील पुराच्या वेळी तुमचा कुटुंबाशी कोणताही संपर्क होत नसताना देखील तुम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत राहिलात.

======

हे देखील वाचा : अश्विन अन्नाची रिटायरमेंट !

                         आर अश्विन आहे तब्बल ‘इतक्या’ संपत्तीचा मालक

======

तुमची कारकीर्द पाहून तुमच्यात असणारी लवचिकता आणि अनुकूलता दिसून येते. खेळाच्या विविध फॉरमॅट्ससाठी तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे ध्येय तयार केले ते टीमसाठी मोलाचे होते. अनेक अभ्यासकांनी, विश्लेषकांनी तुमच्या क्रिकेटच्या अभ्यासाचे खूप कौतुक केले आहे. मला खात्री आहे की असे उत्तम ज्ञान भावी पिढीतील तरुणांना नक्कीच उपयोगी पडेल.

मैदानावर आणि मैदानाबाहेर खेळाचे अॅंबेसिडर म्हणून देशाला आणि तुमच्या कुटुंबाला अभिमान वाटला. तुमच्या आई – वडिलांचे, तुमची पत्नी प्रीथी आणि तुमच्या मुलींचेही अभिनंदन. त्यांचा त्याग आणि पाठिंबा, एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून तुमच्या कायमच मदतीस आला आणि प्रेरणा देत राहिला. मला आशा आहे की आता तुम्हाला त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवायला मिळेल, ज्याची तुम्ही वर्ष इतकी वाट पाहत असाल.

पुन्हा एकदा गौरवशाली कारकिर्दीबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

दरम्यान सध्या नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले हे पत्र कमालीचे गाजत असून, सगळीकडे याच पत्राची चर्चा होताना दिसत आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.