Home » पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला लोकमान्य टिळक पुरस्कार, शरद पवारही उपस्थितीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला लोकमान्य टिळक पुरस्कार, शरद पवारही उपस्थितीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट, 2023 रोजी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. पीएम मोदी यांनी याला एक अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले.

by Team Gajawaja
0 comment
PM Modi Pune Visit
Share

PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट, 2023 रोजी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. पीएम मोदी यांनी याला एक अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले. त्यांनी असे म्हटले की, हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासियांना सपर्मित करतो. त्याचसोबत मोदी यांनी पुरस्कारासोबत मिळणारी रक्कम ही नमामि गंगे योजनेसाठी दान करणार असल्याची ही घोषणा केली.

पीएम मोदी यांनी असे म्हटले की, आजचा दिवस हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मी येथे येऊन जेवढा आनंदित झालो आहे तेवढाच भावुक सुद्धा. काही वेळापूर्वी मी मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले. लोकमान्य टिळक पुरस्कार मिळणे म्हणजे सन्मानाची गोष्ट आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची धरती आहे. मोदी यांनी आपल्या संबोधनात असे ही म्हटले की, पुरस्कारासह जबाबदाऱ्या सुद्धा वाढल्या जातात. मी देशवासियांना विश्वास देतो की, त्यांच्या सेवेत, त्यांच्या आशा-अपेक्षा नेहमीच पूर्ण करीन.

अजित पवार आणि शरद पवार ही एकाच मंचावर
आजच्या भव्य सोहळ्यात पीएम मोदी यांच्यासोबत मंचावर एका बाजूचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते. तर दुसऱ्या बाजूला पवारांविरोधात बंड करुन भाजपसोबत सरकारमध्ये सामील होणारे अजित पवार सुद्धा होते. या दरम्यान शरद पवार आणि पीएम मोदी यांनी एकाच मंचावरुन संबोधन सुद्धा केले. शरद पवारांनी आपल्या संबोधनात सर्जिकल स्ट्राइकचा सुद्धा उल्लेख केला.

अजित पवारांचे बंड आणि एनसीपीमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच वेळ होती जेव्हा पीएम मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर दिसले. विरोधी पक्ष आघाडीच्या सदस्यांनी पवारांना सोहळ्याला उपस्थित राहू नये, अशी विनंती केली होती.मात्र पवार यांनी ते ऐकले नाही. पवार यांना काही खासदार मिळून येथे जाऊ नये अशी विनंती करणार होती. मात्र पवार यांनी त्यांनाच भेटण्यास नकार दिला. (PM Modi Pune Visit)

शरद पवारांकडून पीएम मोदींचे कौतुक
शरद पवारांनी संबोधन करताना पीएम मोदी यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी असे म्हटले की, देशात पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता. पुढे पवार यांनी असे म्हटले की, बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात राहून केसरी नावाचे वृत्तपत्र सुरु केले होते आणि इंग्रजांवर जोरदार टीका केली होती. ते असे विचार करायचे की, पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असू नये. गणेश उत्सव, शिवजयंती सारखे उत्सव साजरे करण्याची सुरुवात बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या स्तरावर सुरु झाली होती.

हेही वाचा- लोकमान्य टिळक पुरस्कार नक्की काय आहे? का आणि कधी झाली याची सुरुवात?

अजित पवारांकडून शुभेच्छा
तर अटल बिहारी बाजपेई, डॉ. मनमोहन सिंह, शंकर दयाल शर्मा, इंदिरा गांधी यांना सुद्धा बाळ गंगाधर टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आता याच लिस्टमध्ये पीएम मोदी यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांनी देशासाठी जे काम केले आहे त्यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे असे ही अजित पवार यांनी म्हटले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.