पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातच्या कार्यक्रमादरम्यान फ्रांन्स मधील शारलोट शोपाचा उल्लेख केला होता. पीएम मोदी गेल्या दोन दिवसांपासून फ्रांन्स दौऱ्यावर असताना शारलोट यांची भेट घेतली होती. पेशाने योगा टीचर शारलोट यांचे वय १०० वर्ष आहे. तरीही त्या अगदी कठीण योगाचे प्रकार अगदी सहजतेने करतात. पीएम मोदी यांनी असे सांगितले की, शारलोट आपल्या उत्तम आरोग्य आणि दीर्घयुष्यासाठी योगालाच सर्व श्रेय देतात. (PM Modi Mann ki baat)
पीएम मोदी यांनी त्यांचे वर्णन भारताच्या योगशास्राचा प्रमुख चेहरा म्हटले आहे. पीएम मोदी यांनी सर्वांना शारलोट शोपा यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला आहे. तर जाणून घेऊयात कोण आहेत शारलोट शोपा.
१०० वर्षीय योगा टीचरने ५० वर्षांपूर्वी सुरु केला होता योगा
सर्वसामान्यपणे तरुण्यात शरिर हे लवचीक असते. वाढत्या वयासह शरिराचा लवचीकपणा कमी होतो. मात्र शारलोट यांना पाहून असे वाटतच नाही.वयाच्या शंभराव्या वर्षी सुद्धा योगामधील कठीण आसन सुद्धा त्या सहजतेने करतात. ५० वर्षांपूर्वी त्यांनी याची सुरुवात केली होती आणि आता त्या योगा प्रशिक्षक झाल्या आहेत.
एका कार्यकारी सचिवच्या रुपात निवृत्त होणाऱ्या शारलोट यांचा जन्म जर्मनीत झाला होता. त्या आपल्या कामासाठी अफ्रिका आणि कॅमरुन मध्ये राहिल्या. ५० वर्षापूर्वी जेव्हा त्या वयाच्या पंन्नाशीत आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्याने योगा सुरु केला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्या सातत्याने योगा करत आहेत. आज त्या फ्रांसमधील योगाच्या योगदानासाठी फार चर्चेत असतात.
त्यांचे असे म्हणणे आहे की, आज वयाच्या शंभरीत सुद्धा त्यांना त्यांचे शरिर हेल्दी आणि लवकीच आहे. याचे संपूर्ण श्रेय हे योगाला देतात. शारलोट असे म्हणतात की, केवळ शारिरच नव्हे तर मानसिक रुपात ही योगा तुम्हाला हेल्दी बनवतो. यामुळे शांति आणि स्थिरता मिळते. त्याबद्दल आपल्या मित्रांना सांगतात आणि शिकवतात सुद्धा.
हेही वाचा- एकटेपण, आजार आणि मृत्यूची भीती, अखेर कसे आयुष्य जगतायत पुतिन
शारलोट त्या लोकांपैकी एक आहेत ज्या शरीरिक क्षमतेच्या आधारावर हेल्दी राहण्यास मदत करतात. यासाठी त्या वेळोवेळी योगाची मदत घेतात. शारलोट यांच्या संदर्भातील एक ट्विट सुद्धा मोदी यांनी केले होती. पीएम मोदी शारलोट यांच्यामुळे ऐवढे प्रभावित झाले होते की, त्यांनी त्यांचा उल्लेख मन की बात मध्ये केला होता.