Home » Chenab Bridge : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आर्च ब्रिजचे उदघाटन; ‘ही’ आहेत या ब्रिजची वैशिष्ट्ये

Chenab Bridge : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आर्च ब्रिजचे उदघाटन; ‘ही’ आहेत या ब्रिजची वैशिष्ट्ये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chenab Bridge | Top Marathi Headlines
Share

भारत रोज नवनवीन यशाची शिखरं पादाक्रांत करत पुढे जात आहे. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूतील प्रसिद्ध रामेश्वरम बेटाला रेल्वेच्या मार्गाने जमिनीशी जोडणाऱ्या पाम्बन या सागरी पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. आता जगातील सर्वात उंच रेल्वे मार्गाचे उदघाटन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचे आज ६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. हा रेल्वे पूल जम्मू-काश्मीरच्या विकासातील एक महत्वाचा दुवा ठरणार आहे. चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम करणे खूपच अवघड मानले जात होते. मात्र ही अशक्य गोष्ट शक्य करत काश्मीरला इतर देशाशी जोडण्यात आले आहे. (Chinab Bridge)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. १३० वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण झाले असून हा २७२ किमी लांबीचा उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग असणार आहे. चिनाब नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंच असलेला हा रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ठरला आहे. चिनाब पूल प्रकल्पाला २००३ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र या पुलाला पूर्ण होण्यास तब्बल २२ वर्षांचा काळ लागला. अनेक अडचणींवर मात करत २००९ पर्यंत या पुलाची केवळ मूलभूत कामेच पूर्ण झाली होती. त्यानंतर मात्र २०१७ मध्ये ३२०० कर्मचारी आणि इंजिनियर्सने काम पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले. २०२१ मध्ये पुलाच्या आर्कचे काम सुरू झाले आणि रूळ टाकण्यात आले. आज २२ वर्षांनंतर या पुलावरून रेल्वे धावणार आहे. (Marathi News)

Chenab Bridge

चिनाब पूल सुरू झाल्यानंतर आता कटरा ते श्रीनगर दरम्यान असणारा ५ ते ६ तासांचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसमुळे फक्त ३ तासांवर येणार आहे. यासोबतच, काश्मीर रेल्वे मार्गाने देशाच्या इतर भागांशी जोडले जाईल. उत्तर रेल्वे ७ जूनपासून कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करणार आहे. लोकांना आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून ६ दिवस दोन गाड्या धावतील. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेनमध्ये दोन प्रवास वर्ग आहेत. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १३२० रुपये आहे. सध्या गाड्या फक्त बनिहाल येथे थांबतील, इतर थांब्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल. (Top Marathi News)

पंतप्रधान मोदींनी चिनाब पुलासोबतच, अंजी पुलाचेही उद्घाटन आज झाले. हा भारतातील पहिला केबल-स्टे रेल्वे पूल आहे, जो जम्मू आणि काश्मीरच्या कठीण भूभागातून जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सोबतच, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांना चालना मिळेल. यामुळे स्थानिक व्यापार आणि पर्यटन वाढेल. हा पूल नदीच्या पात्रापासून ३३१ मीटर उंचीवर बांधला आहे. त्याला आधार देण्यासाठी १०८६ फूट उंच टॉवर बांधण्यात आला आहे, जो ७७ मजली इमारतीइतका उंच आहे. हा पूल रियासी जिल्ह्यातील कटरा ते बनिहालला जोडणाऱ्या अंजी नदीवर बांधला आहे. चिनाब पुलापासून त्याचे अंतर फक्त ७ किमी आहे. या पुलाची लांबी ७२५.५ मीटर आहे. त्यापैकी ४७२.२५ मीटर केबल्सवर आहे. (Marathi Latest News)

चिनाब रेल्वे पुलाची खास वैशिष्ट्ये:
> उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या २७२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर, ३६ बोगदे आहेत. ज्यांची लांबी ११९ किमी आहे.

> हा पूल कुतुबमिनारपेक्षा पाच पट उंच आहे. हा चिनाब पूल पॅरिसच्या जगप्रसिद्ध अशा आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर अधिक उंच आहे.

> चिनाब पूल -१० डिग्री सेल्सियस ते 40 डिग्री सेल्सियस पर्यंतचे तापमान सहन करू शकणार आहे. या पुलाची क्षमता १२० वर्षांपर्यंत आहे.

> ४० किलोपर्यंतच्या TNT स्फोटकांचाही या पुलावर काही परिणाम होणार नाही. ८.० तीव्रतेचा जरी भूकंप आला तरी देखील या पुलाला कोणताही धोका होणार नाही. (Todays Top Headline)

Chenab Bridge

> २६० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वादळ देखील या पुलाचे नुकसान करू शकणार नाही. पुलाचा प्रत्येक भाग ६३ मिलीमीटरच्या ब्लास्ट-प्रूफ स्टीलने बनवलेला आहे.

> ब्रिज दरम्यान तब्बल ११२ सेन्सर बसवण्यात आले आहेत, जे वाऱ्याचा वेग, तापमान आणि कंपन इत्यादी माहिती देतील.

> चिनाब ब्रिज उभारणीसाठी ३०३५० मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले आहे.

> १५० सर्व्हरच्या सुविधेसह सुसज्ज एक अत्याधुनिक नियंत्रण कक्ष बांधण्यात आला आहे.

> हा पूल इतका मजबूत आहे की स्फोट झाला तरी त्याचे नुकसान होणार नाही.

==============

हे देखील वाचा ; Himachal Pradesh : या मंदिरात होतो मनुष्याच्या कर्माचा हिशोब !

Tamil Nadu : मानसिक तणाव आहे, मग या मंदिरात नक्की जा !

==============

> इनलेट ब्रिज सेक्शनचे पाया आणि खांब काँक्रीटचे बनलेले आहेत. सर्व इन्स्टॉलेशन जॉइंट्स जवळजवळ बोल्ट केलेले जॉइंट्स आहेत, एकूण सुमारे ६००,००० बोल्ट आहेत. (Social News)

> पुलाचा पाया खडकावर घातला आहे. आर्च स्पॅनचा पाया सुमारे ५० मीटर उंच आणि सुमारे ५० मीटर रुंद आहे. सर्व ब्रिज स्ट्रक्चर्स अचूकपणे 3D मॉडेल वापरून तयार केलं आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.