Home » पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ

पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ

by Team Gajawaja
0 comment
Platform Ticket Price
Share

भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकिटाच्या (Platform Ticket) दरात वाढ केली आहे. दक्षिण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या एका आदेशानुसार १ ऑक्टोंबर पासून प्लॅटफॉर्मचे तिकिट १० रुपयांऐवजी २० रुपयांना दिले जाणार आहे. दक्षिण रेल्वेने असे म्हटले की, सणाच्या काळात रेल्वे स्थानकात होणारी गर्दी पाहता त्यापासून बचाव करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकिटाची ही किंमत ३१ जानेवारी २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.

दक्षिण रेल्वेच्या प्रेस रिलिजनुसार, १ ऑक्टोंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत चेन्नई डिविजनच्या आठ स्थानकात प्लॅटफॉर्म तिकिट २० रुपयांना मिळणार आहे. यामध्ये एमजीआर चेन्नई सेंट्रल, चेन्नई इग्मोर, तंबरम, कटपाडी, चेंगलपट्टू अराक्कोणम, तिरुवल्लूर आणि आवाडी स्थानकांचा समावेश आहे. दरम्यान, यापूर्वी सुद्धा प्लॅटफॉर्मच्या तिकिटाचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर ते कमी करुन १० रुपये केले होते.

Platform Ticket
Platform Ticket

प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात ५ पट अधिक नफा
गेल्या वर्षात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटाच्या दरात पाच पट अधिक नफा झाला होता. देशात बहुतांश स्थानकात प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आले होते. डिसेंबर २०२१ मध्ये प्लॅटफॉर्मच्या तिकिटाच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ते १० रुपये केले गेले. कोरोनाच्या काळात प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्यामागील कारण असे सांगण्यात आले होते की, गर्दी कमी व्हावी.

हे देखील वाचा- भारतातील ‘या’ रेल्वेस्थानकात भटकतात आत्मा, स्थानिक ही पळ काढतात

दरम्यान, पुढील काही दिवसात दसरा, दिवाळी आणि छठ सारखे सण येणार आहेत. या सणासुदीच्या वेळी उत्तर भारतातील बहुतांश लोक महानगरांमधून आपल्या गावाकडे जातात आणि पुन्हा परतात. अशातच स्थानकात गर्दी वाढणे स्वाभाविकच आहे. मात्र या गोष्टी लक्षात घेता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर दुप्पट वाढवण्यात आले आहेत. (Platform Ticket)

दरम्यान, तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिट काढल्यानंतर ते २-३ तासांसाठी वॅलिड असते. त्यामुळे या कालावधीनंतर तुम्हाला तेथे थांबता येत नाही. परंतु नातेवाईकांना सोडण्यासाठी आपण गाडीत चढलो आणि ती सुरु झाल्यास काय करावे असा ही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तेव्हा घाबरु नका. कारण जरी टीसी गाडीत आल्यास त्याला तुम्ही तुमच्याकडील प्लॅटफॉर्म तिकिट दाखवून प्रवासाचे तिकिट त्याच्याकडून काढून घेऊ शकता. तर आपत्कालीन स्थितीत प्लॅटफॉर्म तिकिटाच्या माध्यमातून रेल्वेने प्रवास करता येतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.