Home » प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? मग हे वाचाच !

प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? मग हे वाचाच !

0 comment
Plastic Bottle Water Side Effects
Share

प्लॅस्टिकने आपल्या जीवनावर इतका प्रभाव टाकला आहे की, आजच्या जगाची कल्पनाही प्लास्टिक शिवाय करता येत नाही. अगदी पाण्याच्या बाटलीपासून मनुष्य प्लॅस्टिकवर अवलंबून आहे. पाण्याच्या बाटल्यांपासून ते जेवणाच्या डब्यापर्यंत आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंपर्यंत प्लास्टिकचा वापर आपण करत आहोत. काही लोकांना प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांविषयी माहिती आहे मात्र अजूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना त्याच्या दुष्परिणाम याबद्दल काहीच माहित नाही. प्लास्टिकचा वापर हा मानवी शरीरासाठी किती हानिकारक ठरू शकतो याची तुम्ही कल्पना ही करू शकत नाही.  प्लॅस्टिकमधून  बाहेर पडणारी रसायने शरीराला कितपत हानी पोहोचवू शकतात आणि त्यामुळे निसर्गाचे तसेच मानवी शरीराचे किती नुकसान होते याचाही तुम्ही विचार करू शकत नाही. प्लास्टिक हे एक पॉलिमर आहे. हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोराईडपासून बनलेले आहे. यात बीपी नावाचे रसायन असते. केमिकल्स आणि पॉलिमरमध्ये आढळणारे घटक शरीरात गेल्यास त्यांची वेगळीच रासायनिक प्रतिक्रिया होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आणि यामुळे शरीरात अनेक आजार होतात. आपण जर प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पित असाल किंवा प्लास्टिकच्या वस्तूंचा अधिक प्रमाणात वापर करत असाल  तर ते प्यायल्याने आपल्या शरीराचे काय नुकसान होते, हे आज आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.(Plastic Bottle Water Side Effects)

Plastic Bottle Water Side Effects
Plastic Bottle Water Side Effects

– प्लास्टिकच्या वापरामुळे शरीराचा त्यात आढळणाऱ्या रसायनाशी आपला थेट संपर्क येतो. यामुळे शरीर अनेक आजारांनी वेढले जाते . प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या शिसे, कॅडमियम, पारा यांसारख्या रसायनांमुळे शरीरात कॅन्सर, अपंगत्व, रोगप्रतिकारक शक्ती बिघडणे असे गंभीर आजार होतात आणि त्याचा परिणाम मुलांच्या विकासावर ही होतो.

– प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्यानंतर शरीर प्लास्टिक रसायनाच्या संपर्कात येते. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो आणि आपल्याला अधिक आजार होऊ शकतात. 

– प्लॅस्टिक बीपीए म्हणजेच बिस्फेनॉल थायरॉईड संप्रेरक रिसेप्टरचे प्रमाण कमी करते. ज्यामुळे हायपोथायरॉईडीझम सारखा गंभीर आजार होऊ शकतो. प्लॅस्टिक आपल्या शरीराला इतर प्रकारेही हानी पोहोचवू शकते. एका संशोधनानुसार प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ईडीसी सारखे अत्यंत धोकादायक आणि हानिकारक रसायन म्हणजेच एंडोक्राइन डिसेन्सिटायझिंग केमिकल असते. जे मानवी हार्मोनल सिस्टमला हळूहळू परंतु थेट हानी पोहोचवते.

Plastic Bottle Water Side Effects
Plastic Bottle Water Side Effects

– आजकाल बाजारातील बहुतांश पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या असून त्यात जीवनसत्त्वे असल्याचे म्हटले जाते . पण त्यात शुगर, हाय फ्रुक्टोज, कॉर्न सिरप अशी रसायने असतात. ज्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा धोका होऊ शकतो. टॉयलेट सीटपेक्षा ही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये जास्त जंतू असतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. ज्यामुळे तुम्ही गंभीर आजारी पडू शकता.

– प्लॅस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाशी संबंधित आजार, स्तनाचा कर्करोग, कोलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर सारख्या समस्याही उद्भवतात.

=================================

हे देखील वाचा: भात खाण्याचे ‘हे’ आश्चर्यचकीत करणारे फायदे वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

=================================

– प्लॅस्टिकचा वापर केल्याने आपल्या शरीरातील बीपीएचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे हायपोथायरॉईडीझमसारखा आजार होण्याचा धोका वाढतो. प्लॅस्टिकमुळे आपल्या शरीराला इतरही अनेक प्रकारे हानी पोहोचते. (Plastic Bottle Water Side Effects)

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की प्लास्टिक चा वापर न करता आपण काय वापरू शकतो तर प्लास्टिकच्या भांड्यांशिवाय आपल्याकडे फक्त स्टीलच्या भांड्यांचा पर्याय आहे. पण स्टीलच्या कंटेनरने पाण्याचा विषारीपणा कमी करता येत नाही.त्यामुळे जर पाण्याची किंवा अन्नाची गुणवत्ता वाढवायची असेल तर तांब्याच्या भांड्यांचा वापर करावा. तांब्याच्या भांड्यातील पाणी किंवा अन्न खाल्याने शरीराला खुप फायदे ही होतात. 

( डिस्क्लेमर: वरील लेख हा केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. ही सर्व माहिती खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही.) 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.