सोरायसिस एक त्वचेसंबंधित आजार आहे. हा काही प्रकारचा असतो पण सर्वाधिक सर्वसामान्य म्हणजे प्लॉक सोरायसिस (Plaque Psoriasis). जगभरातील जवळजवळ ३ टक्क्यांहून अधिक लोकांना याने पछाडले आहे. काही वेळेस त्वचेवर येणाऱ्या हलक्या दाण्यांसह लाल रंगांच्या डागाकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र असे करणे तुम्हाला नंतर एखाद्या आजारात टाकू शकते. तर अशा प्रकारचे डाग किंवा पुरळ त्वचेवर आले असल्यास ती सोरायसिसची लक्षण असू शकतात. अशातच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.
काय आहे प्लाक सोरायसिस?
सोरायसिस त्वचेसंबंधित आजारांपैकी एक गंभीर आजार आहे. यामध्ये शरिराची रोगप्रतिकारक शक्तीच निरोगी पेशी आणि उतींवर हल्ला करते. सामान्यत: सोरायसिसची समस्या जाड्या त्वचेवर दिसते. यामध्ये स्किन एकाच ठिकाणी वाढू लागते. त्वचेवर लाल रंगाचे चट्टे येतात आणि हळूहळू त्यावर सफेद रंगाची पापुद्र तयार होतात. यामध्ये खुप प्रमाणात खाज येते आणि रुग्णाला ती खाज अहाय्य होते.

शरिराच्या कोणत्या भागावर होतो हा आजार?
प्लाक सोरायसिस खरंतर शरिरातील कोणत्याही भागावर होऊ शकतो. मात्र सामान्यपणे तो गुडघे, हाताचा कोपरा, स्कॅल्प, हाताचा पंजा आणि पाठीच्या खालची बाजू येथे होऊ शकतो. त्वचेवर निर्माण होणारे चट्टे हा व्यक्तीच्या स्किन टोनवर निर्भर करतात. पातळ त्वचेवर ते गुलाबी रंगाचे तर गडद रंगाच्या त्वचेवर त्याचा रंग जांभळा किंवा पिवळ्या रंगाचा असू शकतो. हा एक दीर्घकाळ चालणारा आजार आहे.
प्लाक सोरायसिसची कारणे
सध्या नेमक्या कोणत्या कारणास्तव सोरायसिस झाला आहे हे सांगणे थोडे मुश्किल होते. पण अॅडम फ्राइडमॅन, एमडी, प्रोफेसर जॉर्ज वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसन अॅन्ड हेल्थ सायन्स म्हणतात की, हा आजार नैसर्गिक आणि पालनपोषण यांचे मिश्रण असल्याचे मानले जाऊ शकते. यामध्ये अनुवंशिक हे सुद्धा याचे एक कारण असू शकते. (Plaque Psoriasis)
हे देखील वाचा- Lyme Disease ची जगभरात चर्चा, जाणून घ्या आजाराच्या लक्षणांबद्दल अधिक
सोरायसिसचे प्रकार
-प्लाक सोरायसिस
-गटेट सोरायसिस
-पस्चुरल सोरायसिस
-सोरियाटिक सोरायसिस
-एरिथ्रोडर्मिक सोरायसिस
सोरायसिसवरील उपचार
सोरायसिसवर असे ठोस उपचार नाहीत. मात्र तज्ञांच्या मदतीने तुम्ही त्यावर उपचार करु शकता.
-त्वचेवर जेथे लाल रंगाचे चट्टे आले आहेत तेथे क्रिम किंवा मलहम लावू शकता.
-तुम्ही फोटोथेरपीचा आधार घेऊ शकता.
-जर तुम्ही मीठाचे पाणी आणि कोरफडीसह स्नान करत असाल तर त्यापासून ही तुम्हाला आराम मिळेल.
-तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे आवश्यक लक्ष द्या. डेरी प्रोडक्ट्स, मीट किंवा अल्कोहोलचे सेवन खुप कमी प्रमाणात करा.