Home » ‘या’ ठिकाणी महिलांना नो एन्ट्री, जाणून घ्या काय आहे कारणं

‘या’ ठिकाणी महिलांना नो एन्ट्री, जाणून घ्या काय आहे कारणं

by Team Gajawaja
0 comment
Places where women banned
Share

आपण अशा काही ठिकाणं पाहतो जेथे महिलांची पूजा केली जाते. त्यांचा आदर बाळगला जातो किंवा त्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान केला जातो. महिलांना सुद्धा काही संविधानाने हक्क दिले आहेत त्यानुसार त्या कुठेही फिरु शकतात किंवा आपल्याला वाटेल ते करु शकतात. त्याचसोबत महिलांसंबंधित काही परंपरा सुद्धा आपण पाहतो. मात्र तुम्ही कधी ज्या ठिकाणी महिलांना अजिबात प्रवेश दिला जात नाही अशा ठिकाणांबद्दल ऐकले आहे का कधी? आज त्याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.(Places where women banned)

-माउंट एथोस ग्रीस
माउंट एथोस हे जगातील थोडे विचित्र ठिकाण आहे. येथे कोणत्याही स्वरुपातील महिलांची जात अजिबातच नाही आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास या ठिकाणी जानवरांमध्ये सुद्धा मादी जनावराचा सुद्धा समावेश नाही. या ठिकाणी बहुतांश साधु राहतात आणि त्यांच्या मते येथे महिला आल्यास त्यांच्या ज्ञान यात्रेचा मार्ग धीमा होतो.

-बर्निंग ट्री क्लब
हे कोणत्याही धर्म किंवा क्रांतीसाठी नव्हे तर असचं आवड म्हणून तयार करण्यात आले आहे. येथे फक्त महिलांना नो एन्ट्री आहे. खरंतर येथे जगभरातील प्रसिद्ध लोक गोल्फ खेळतात आणि सर्व पुरुष मंडळींच असतात. कधी-कधी पण खुप कमी प्रमाणात येथे मुलींना एन्ट्री दिली जाते. या व्यतिरिक्त येथे बंदी घालण्यात आली आहे.

Places where women banned
Places where women banned

-सबरीमाला भारत
भारतातील सबरीमाला मंदिराचा इतिहास जसा जुना आहे तितकेच ते मंदिर ही फार प्रसिद्ध आहे. जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या स्वाति मालीवाल यांनी आपल्या ग्रुपसोबत येथे जाण्याबद्दल जाहीर केले होते. सबरीमाला मध्ये १०-५० वर्षापर्यंतच्या महिलांना जाण्यास बंदी आहे. कारण येथे कोणतेही मेंस्ट्रुएटिंग महिला येऊ शकत नाही. न्यायालयानेही याबाबत निर्णय दिल्यामुळे एवढा गदारोळ झाला की, पोलीस बंदोबस्त लावावा लागला.(Places where women banned)

हे देखील वाचा- ५५० वर्षांपूर्वीचा ममी, बसल्या जागीच भिक्षुने त्यागले होते प्राण

-माउंट ओमिनी जापान
जापान मधील हे ठिकाण पवित्र मानली जाते. येथे महिलांना या कारणासाठी बंदी आहे कारण हे ठिकाण ऋषींचे ठिकाण असल्याचे मानले जाते. येथे कोणत्याही प्रकारचा मोह येऊच शकत नाही. येथील महिलांवरील बंदी हटवण्याचा खुप वेळा प्रयत्न करण्यात आला पण तो हटला नाही. पण येथील स्थानिक लोक हे बंदीच्या पक्षाच्या बाजूने नेहमीच असतात.

-रणकपुर जैन मंदिर
रणकपुर मधील जैन मंदिरात महिलांना परिसरात प्रवेश दिला जातो. पण त्याच्या आतमध्ये जाण्यास बंदी आहे. ऐवढेच नव्हे तर महिलांना परिसरात जरी यायचे झाल्यास तर एक खास ड्रेस कोड फॉलो करावा लागतो. त्याचसोबत ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल त्यांना अजिबात प्रवेश दिला जात नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.