एक कप चहा, पाऊस आणि ती कोणीही असो तुमची वेळ असो किंवा तुमची मैत्रीण असो असे हे पावसाळ्याचे (Monsoon) कॉम्बिनेशन फारच रोमँन्टिक असतेच. तरीही पावसाची एखादी जरी सर पडण्यास सुरु झाली तर घरातील किचन मध्ये गरमागरम भजी तयार करणे ते कोणत्या पिकनिक स्पॉटला जायचे याची लिस्टच बाहेर पडते. त्यामुळे पावसाळा आणि मनसोक्त भिजण्याचा आनंद यासारखे सुख कोणतेच नव्हे. अद्याप पावसाला सुरुवात झाली नसली तरीही आधीपासूनच तेव्हा कुठे फिरायला जायचे याचे प्लॅनिंग तर सुरु झालं असेल हे नक्कीच. आपले बजेट आणि कामातून थोडा ब्रेक घेऊन एखाद्या ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जाणे म्हणजे काही काळासाठी तंत्रज्ञानाच्या जगाला थोडावेळ ब्रेक देण्यासारखे आहे.
कोणत्या ठिकाणांना भेट देण्यापूर्वी भारतात मान्सूनच्या काळात उत्तम पाऊस पडतो. ठिकठिकाणी झाडांना फुटलेली पालवी, हिरवळ हे सगळं दृष्य नयनरम्य वाटते. मनाला हवे असलेली शांतता हिरव्या माळरानापुढे पूर्ण होते. यंदाची पावसाळ्याची सुट्टी हटके आणि नेहमीच लक्षात रहावी असे तुम्हाला वाटत असेल तर पुढील काही ठिकाणांना तुम्ही नक्कीच भेट द्या.
दार्जिलिंग
पावसाळ्यात कुठे जायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दार्जिलिंगचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. येथे विस्तारलेले चहाचे मळे, हिरवीगार झाड आपल्या सुंदरतेने एखाद्याला मोहून टाकतील अशी वाटतात. आपल्या भौगोलिक दृश्यांव्यतिरिक्त दार्जिलिंगच्या टॉय ट्रेनचे ही पर्यटकांमध्ये खुप आकर्षण आहे. त्यामुळे पावसाची मजा तर लुटता येईलच पण निसर्गाचा हिरवागार आविष्कार ही आपण येथे आल्यानंतर कधीच विसरणार नाही.
कौसानी
कौसानी हे ठिकाण मान्सूमध्ये (Monsoon) फिरण्यासाठी बेस्ट आहे. उत्तराखंड मध्ये कौसानी हे एक लहान गाव आहे. आपल्या भौगोलिक सुंदरतेसाठी ते फार प्रसिद्ध आहे. मान्सूनमध्ये कौसानी हिरव्यागार गालिच्याने नटलेले दिसते. येथील वातावरण ही पाहण्याजोगे असते. निळ्या आकाशात काळे-पांढरे ढग पाहणे म्हणजे निर्सगाचा चमत्कारच येते अनुभवायला मिळतो. त्यामुळे तुम्ही कौसानीला नक्कीच भेट देऊन पहा.
हे देखील वाचा- मैत्रिणींसह करताय ट्रिपचे प्लॅनिंग, तर मुलींसाठी सुरक्षित ‘या’ शहरांना नक्की द्या भेट
कोडाइकनाल
तमिळनाडू मधील कोडाइकनाल हे पावसाळ्याची मजा घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. कारण कोडाइकनाल हे डोंगराळ भागात असल्याने सर्वत्र हिरवळ पसरल्याचा आनंद देते. पावसाळ्याची सुट्टी ते निसर्गरम्य दृष्य पाहायचे असेल तर कोडाइकनाल खरंच तुमच्यासाठी परफेक्ट मान्सून डेस्टिनेशन ठरु शकते.
मुन्नार
केरळातील इद्दुकी जिल्ह्यात असलेल्या मुन्नारला तुम्ही तुमच्या पावसाळ्यातील पिकनिक स्पॉटचा विचार करु शकता. समुद्री सपाटीपासून १६०० फूट उंचीवर असलेल्या मुन्नारचे पावसाळ्यातील रुप हे अनोखे दिसते. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यास आवडत असलेल्या लोकांसाठी तर हे ठिकाण स्वर्गासारखेच वाटते.
महाबळेश्वर
महाराष्ट्रातील अतिशय थंड हवेचे ठिकाण म्हणून ओखळल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचा पर्याय ही तुमच्या पावसाळ्यातील पिकनिकसाठी परफेक्ट आहे. मान्सूनच्या काळात महाबळेश्वर मध्ये डोंगरांना आलेले ताजेपण आणि तेथील नजारा पाहणे म्हणजे मनाला सुख मिळण्यासारखे आहे. डोंगरातून वाहणारे पाणी, विविध पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंडगार वारे आपल्याला प्रसन्न करतात.