Home » किराणाचे दुकान आणि जुनी भांडी वापरुन सुरु झालेल्या पिझ्झा हट कंपनीच्या यशाची कथा

किराणाचे दुकान आणि जुनी भांडी वापरुन सुरु झालेल्या पिझ्झा हट कंपनीच्या यशाची कथा

by Team Gajawaja
0 comment
Pizza Hut
Share

पिझ्झा हट फूड इंडस्ट्री मधील प्रसिद्ध नाव आहे. हैराण करणारी गोष्ट अशी की, जेव्हा याची सुरुवात झाली तेव्हा लोकांनी त्याची चव घ्यावी म्हणून तो फुकटात विक्री केला गेला. आज ही जगातील सर्वाधिक मोठी आणि निवडक पिझ्झा कंपन्यांपैकी एक आहे. जगभरात याचे जवळजवळ १७ हजार आउटलेट्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. पिझ्जा हटची सुरुवात १९५८ मध्ये दोन भाऊ फ्रंन्क आणि डेन कार्नी यांनी कंसास येथे केली होती. दोन्ही भावंडांनी का कधीच विचार केला नव्हता की, त्यांची कंपनी एकेदिवशी फूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध होईल. (Pizza Hut Success Story)

त्या काळात ते महाविद्यालयात शिकत होते आणि कंसास मधील बिशिटा येथे राहत होते. त्यांना पिझ्जाचा व्यावसाय सुरु करण्याची कल्पना ही त्यांचा पारिवारिक मित्र जॉन बेंडर यांनी दिला होता. दोघांनी मिळून पिझ्झा हटची सुरुवात केली आणि या कंपनीने जगभरात आपली ओळख निर्माण केली. तर पाहूयात पिझ्जा हटच्या यशाची कथा.

ना पिझ्झा बनवण्याची माहिती, ना व्यवसायाचा अनुभव
जेव्हा मित्राने त्यांना पिझ्झाचा व्यवसाय करण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना ही कल्पना फार आवडली. दोघांनी आईकडून ६०० डॉलर घेतले. हैराण करणारी गोष्ट अशी की, या दोघांना ना पिझ्जा तयार करता येत होता, ना व्यवसायाचा काही अनुभव होता.

दोघांनी मिळून शहरातील साउथ ब्लफमधअये भाड्याच्या इमारतीत एक दुकान घेतले. पिझ्जा तयार करण्यासाठी जुनी भांडी खरेदी केली. पिझ्जा तयार करण्याची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दोन्ही भावंडांनी सामुदायिक केंद्रांवर मोफत पिझ्झाची विक्री केली. जेणेकरुन लोकांनी त्याची चव घ्यावी. त्यांची हिच रणनिती कामी आली आणि त्याला यश ही मिळाले.

या कारणास्तव पिझ्जा हट नाव ठेवले
दुकान खरेदी केल्यानंतर नाव काय ठेवावे याचा विचार सुरु झाला. तर दुकानाच्या ज्या ठिकाणी नाव लिहायचे होते तेथे केवळ ८ अक्षरच मावणार होती. त्यामुळेच त्यांनी पिझ्झा हट असे नाव दिले. अशा प्रकारे ७ अक्षरांचे नाव त्या ६५ उंचाच्या इमारतीच्या बोर्डात फिट झाले.

लोकांना पिझ्झाची चव ऐवढी आवडली की माउथ पब्लिसिटीमुळेच पहिल्या वर्षात कंपनीला नफा होऊ लागला. कंपनीने असा वेग पकडला की, एका वर्षातच त्यांनी कंसासच्या टोपेका मध्ये कार्नी बंधुंनी याची पहिली फ्रंचाइजी सुरु केली. ब्रंन्डला मिळालेले यश पाहता दोन्ही भावडांनी या व्यवसाय वाढवण्याचा विचार केला. त्यांनी आपल्या मित्र आणि पार्टनर्सच्या मदतीने फ्रेंचाइजी वाढवण्यास सुरुवात केली. सणाच्या वेळी व्यवसायाला अधिक वाढवण्यासाठी शानदार ऑफर्स ही देण्यास सुरुवात केली. (Pizza Hut Success Story)

हे देखील वाचा- निळ्या रंगाचे गहू असतात आरोग्यासाठी फायदेशीर…

जाहिरातीमुळे व्यवसाय वाढला
दोघांनी बदलत्या काळात लोकांची गरज काय आहे हे त्यांना उत्तम पद्धतीने कळत होते. त्यांचे असे मानणे होते की,यशस्वी होण्यासाठी त्यांना पब्लिसिटीची सुद्धा गरज आहे. त्यामुळे त्यांनी याची जाहिरात दिली. १९६७ मध्ये पिझ्जा हटची पहिली जाहिरात जारी झाली. विविध ठिकाणच्या मेळ्यांमध्ये ही पब्लिसिटी केली गेली. १० वर्षाच्या आतमध्येच कॅनडा आणि अमेरिकेत याचे ३० रेस्टॉरंट सुरु झाले. त्यानंतर कंपनीने कधीच मागे वळून पाहिले नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.