Home » भारताप्रमाणेच ‘या’ देशात साजरा करतात पितृपक्ष

भारताप्रमाणेच ‘या’ देशात साजरा करतात पितृपक्ष

by Team Gajawaja
0 comment
Pitru Paksh
Share

हिंदू धर्मात आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते.  मातापित्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची पूजा केली जाते.  भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्णपक्ष अमावस्या या सोळा दिवसांच्या पितृपक्षात पूर्वजांची पूजा करण्यात येते. सध्या हाच पितृपक्ष चालू आहे.  मात्र फक्त भारतातच पितृपक्ष होत नाही तर चिनमध्येही अशाच प्रकारे पितृपक्ष येतो आणि त्यातही कुटुंबाच्या पूर्वजांची पूजा केली जाते.  चीनमध्ये तब्बल 2500 वर्षांपासून पितृ पक्ष होत असून पितृ दोष शांतीसाठी चिनी संस्कृतीमध्ये विविध उपाय आणि पूजा करण्यात येतात.  (Pitru Paksh )  

भारतामध्ये पितृपक्षा(Pitru Paksh ) चे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  आपल्या पूर्वजांचे स्मरण या  दिवसात करण्यात येते.  तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यात येतात.  यासाठी काही जण घरात पूजा करतात.  तर काही पवित्र देवस्थानावर जाऊन आपल्या पूर्वजांची पूजा करुन त्यांना तर्पण अर्पण करतात.  श्राद्ध आणि तर्पण याद्वारे पितरांना प्रसन्न करून पितृदोष शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.  यातून आपल्या कुटुंबाच्या पूर्वजांचा आशीर्वाद कायम सोबत राहतो तसेच कुटुंबाच्या प्रगतीसाठीही त्यांचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.  मात्र ही प्रथा फक्त भारतातच होते असे नाही तर आपल्या शेजारच्या चीनमध्येही अशाच काहीशा प्रकारे पितरांची पूजा करुन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो.   

भारताप्रमाणेच काही आशियायी देशात अशाच प्रकारे पितृपक्ष मानला जातो.  त्यामध्ये चीन आणि जपान या दोन देशात भारताप्रमाणेच पितृ दोष शांतीसाठी उपाय केले जातात. फक्त त्याचे नाव आणि काही प्रथा वेगळ्या आहेत. चीनमध्ये पितृपक्षाला (Pitru Paksh ) छिंग मिंग या नावाने ओळखले जाते. छिंग म्हणजे स्वच्छ आणि मिंग म्हणजे इथे तेजस्वी.  या छिंग मिंगच्या कालावधीत चिनी नागरिक त्यांच्या पूर्वजांच्या कबरींना भेट देतातया कबरींची स्वच्छता करण्यात येते.  तसेच त्याचे सुशोभिकरण करण्यात येते.  या कबरींवर सुवासिक फुले आणि हार अर्पण करण्यात येतो.  कबरीची स्वच्छता करताना संपूर्ण कुटुंब उपस्थित असते. आम्हा सर्वांना तुमची आठवण आहे,  हा त्यामागील उद्देश असतो.  कबरींचे सुशोभिकरण करण्यात आल्यावर त्यावर  त्या व्यक्तिच्या आवडीचे पदार्थही ठेवले जातात.  त्यानंतर संपूर्ण कुटुंब प्रार्थना करते आणि कबरीभोवती तीन-चार फेरे घेतात. अशी पूजा झाल्यावर हे कुटुंब कबरीवर ठेवलेल्या पदार्थांचे प्रसाद म्हणून सेवन करतात. यातून आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्याचे मानण्यात येते.  

हिंदू धर्मानुसार पितृपक्ष (Pitru Paksh ) सप्टेंबर महिन्यात येतो.  चीनमध्ये हा पितरांचे आभार मानणारा सण 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी, चीनमधील सर्व कुटुंबांमध्ये पूर्वजांची पूजा करण्यात येते.  या दिवशी जणू संपूर्ण चीनमध्ये पूर्वज दिन पाळण्यात येतो.  या दिवसाची सुरुवात 2500 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले जाते.  याच सुमारास चिनमध्ये शांग हा सम्राट झाला.  शांग याला चीनमध्ये देवाचा पुत्र मानले जाते.  त्यानेच आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एक उत्सव साजरा केला. 

त्यानुसार चीनमध्ये आजपर्यंत ही प्रथा पाळण्यात येत आहे.  यातील ब-याच प्रथा या भारतासारख्या आहेत.  पूर्वजांची पूजा करण्यामागे पहिले कारण सांगितले जाते की,  मृत्यूनंतरही कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात.  त्यांचे पवित्र आत्मे कुटुंबाच्या आसपास असतात.  त्याबद्दल त्यांची कृतज्ञता या दिवशी व्यक्त करुन संपूर्ण कुटुंब त्यांना आदरांजली देण्यासाठी जाते. चीन, जपान, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, तैवान आणि इंडोनेशिया या देशांमध्येही अशाच प्रकारे पूर्वजांची पूजा करण्यात येते.  त्याला फक्त नाव वेगळे आहे.  पण सर्व कुटुंब एकत्र येऊन आपल्या पूर्वजांना अशाच प्रकारे गोडाधोडाचे जेवण अर्पण करते आणि त्यांचा आशीर्वाद प्रप्त करते.  जपानमध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसांत चुगेन नावाचा सण साजरा केला जातो.  त्यात आपल्या पूर्वजांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या प्रार्थना ठेवल्या जातात.  

==========

हे देखील वाचा : भारतीय नोटांवर किती भाषा छापलेल्या असतात?

==========

भारतात पितृ पक्षामध्ये,  (Pitru Paksh ) पवित्र स्थळांवरही पूजा करण्यात येतात.  श्रीकृष्ण नगरी मथुरेत यमुना नदीच्या काठावर वसलेल्या बोधिनी तीर्थ, विश्रामतीर्थ आणि वायु तीर्थ येथे विधी करुन पूर्वजांना तर्पण अर्पण करण्यात येते.  तसेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथेही देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पिंडदानासाठी शिप्रा नदीच्या काठी येतात. प्रयागराजमध्ये असलेली त्रिवेणी संगम नदी ही पूर्वजांच्या पिंडदानासाठी अत्यंत पवित्र मानली जाते. काशीतील गंगा नदीवरही पिंडदानासाठी मोठी गर्दी असते.  बिहारमधील गया येथेही फाल्गु नदीच्या काठावर या दरम्यान मोठी गर्दी असते. पितृ पक्षाच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पिंड दान देण्यासाठी बोधगयाला येतात.  याशिवाय जगन्नाथ पुरी हे चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. त्यामुळे येथेही पिंडदानासाठी गर्दी असते.  

सई बने

 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.