Home » Pitrupaksha : पितृ पक्षात कावळ्यांना जेवू का घालतात?

Pitrupaksha : पितृ पक्षात कावळ्यांना जेवू का घालतात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pitrupaksha
Share

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून लगेच पितृपक्षाला सुरुवात होते. वर्षातले सर्वात महत्वाचे १५ दिवस म्हणजे पितृ पंधरवडा. या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्धकर्म करत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. हे संपूर्ण पंधरा दिवस आपल्या पूर्वजांसाठी राखीव असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये श्राद्धादिकर्म केली जातात. पितृपक्ष भाद्रपद महिन्यामधील शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून अर्थात आज ७ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. (Pitrupaksha)

श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करून पूर्वजांचे स्मरण या कालावधीत केले जाते. आपल्या पूर्वजांच्या श्राद्धच्या तिथीला सर्व स्वयंपाक केला जातो आणि कावळ्याला घराच्या टेरेसवर पान ठेवले जाते. कावळा जेवणाला टोच मारत नाही तोवर आपले श्राद्ध पूर्ण झाले असे मानले जाते नाही. पितृपक्षात कावळ्यांना खूपच महत्व असते. कावळ्याला भोजन दिले जाते आणि त्याने ते खाल्ले म्हणजे पूर्वजांनी अन्न ग्रहण केले असे मानतात. पण, पितृपक्षात कावळ्यांना भोजन दिले जाण्यामागे नक्की काय शास्त्र आहे? श्राद्धादिकर्मामध्ये कावळ्याला महत्व का दिले जाते? (Marathi News)

७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी आहे. हिंदू धर्मात पितृपक्ष अत्यंत महत्त्वाचा असून या काळात पुर्वजांचे स्मरण केले जाते. या कालावधीत पुर्वज आपल्या घरी येतात आणि आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. या पितृपक्षात आपण आपल्या पितरांसाठी खास त्यांच्या आवडीचे जेवण तयार करतो. पितृपक्षात हे भोजन पितरांचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या कावळ्यांना दिले जाते. आपले पूर्वज कावळ्याच्या स्वरूपात येतात असे धार्मिक कारण सांगितले जाते. पितरांचा आत्मा शांत व्हावा आणि तो आत्मा केवळ कावळ्यांना दिसतो असा समज आहे. शिवाय पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना खाऊ घातल्यामुळे पितृदोष दूर होतोच, त्यासोबतच पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. हिंदू परंपरेत कावळ्यांना पितरांचा दूत मानतात. पितृपक्षासह इतर कोणत्याही शुभकार्यात लोक पितरांची आठवण ठेवून कावळ्यांना अन्न देतात. (Todays Marathi News)

Pitrupaksha

हिंदू धर्मात कावळ्याला पितरांचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की पितरांचा आत्मा कावळ्यांच्या रूपाने येऊन आपल्या वंशजांकडून भोजन आणि पूजा स्वीकारते. कावळा न थकता लांबचा प्रवास करू शकतो, त्यामुळे आत्मा त्याच्या रूपात सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो. याच कारणामुळे पितृपक्षात कावळ्यांना भोजन दिले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा जन्म कावळ्याच्या योनीत होतो अशीही मान्यता आहे. (Top Marathi News)

या काळात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पिंपळाचं झाड हे पूर्वजांचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे या महिन्यात श्राद्ध घालताना पिंपळाची पूजाही केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, कावळा कधीही स्वत:ला मारत नाही किंवा कोणत्याही आजाराने मरत नाही. कावळे अचानक मरतात. कळपातील कोणताही कावळा ज्या दिवशी मेला, त्या दिवशी त्याचे इतर कावळे मित्र अन्न खात नाहीत. (Latest Marathi News)

पितृपक्षात कावळ्यांसोबत गाय, कुत्रा यांनाही भोजन दिले जाते. गायीला भोजन दिल्यामुळे पितरांचे आशिर्वाद मिळतात तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते. कुत्र्यांला भोजन दिले तर पितरांच्या आत्म्यास शांती मिळते असे म्हणतात.

पौराणिक कथा
पुराणकथेनुसार इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते. या कावळ्याने वनवासात असणाऱ्या सीतेला जखमी केले. त्यावर सीतेने त्याला तुला अशुभ समजले जाईल तसेच तुला कोणी स्पर्श करणार नाही असा शाप दिला आणि श्रीरामचंद्रापाशी कावळ्याची तक्रार केली. श्रीरामचंद्रांनी जवळच पडलेली दर्भाची काडी फेकून कावळ्याला मारली. त्या काडीने कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला. तेव्हापासून त्याला ‘एकाक्ष’ नाव पडले. (Top Trending News)

========

Pitrupaksha : ‘या’ तारखेपासून सुरु होतोय पितृपक्ष, जाणून याचे महत्व

=========

यानंतर जयंताने आपण केलेल्या कृत्याबाबत श्रीरामाची माफी मागितली. तेव्हा श्रीरामांनी त्याला उ:शाप दिला. मनुष्य मृत झाल्यानंतर त्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याखेरीज त्याचा आत्मा मुक्त होणार नाही. याच वेळी ही दर्भाची काडी देखील महत्त्वाचे कार्य करेल. तेव्हापासून कावळ्याला पितरांचा दूत मानले गेले आहे. तसेच कावळ्याला भविष्यातील घटनांचा आभास होतो असे म्हणतात म्हणून तर सकाळी कावळा ओरडला की कोणी पाहुणे येणार आहेत असे म्हणतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.