हिंदू धर्मामध्ये आपण जसे विविध देवांचे भरपूर सण साजरे करतो, तसेच या धर्मात आपल्या पूर्वजांना देखील महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. आपल्या आयुष्यात जेवढे महत्व देवाला आहे तेवढेच महत्व पूर्वजांना देखील आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांना आपण कायम स्मरणात ठेवले पाहिजे आणि त्यांच्या शांतीसाठी श्राद्ध देखील केले पाहिजे. याच श्रद्धांसाठी वर्षातून काही दिवस राखीव असतात. यालाच पितृपक्ष असे म्हटले जाते. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर लगेच चाहूल लागते ती पितृपक्षाची. यालाच पितृ पंधरवडा देखील म्हणतात. (Pitrupaksha)
पितृपक्ष हा आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा काळ मानला जातो. या काळात आपल्या पूर्वजांची आठवण काढून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. मान्यता आहे की, पितृपक्षाच्या वेळी पूर्वज स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. पंचांगानुसार, दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि आश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते. पितृपक्षाचे १५ दिवस खूप शुभ मानले जातात. असे म्हटले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्तता मिळते. (Marathi News)
पितृपक्ष कधी सुरू होणार?
कॅलेंडरनुसार, या वर्षी पितृपक्ष महिना म्हणजेच भाद्रपद ७ सप्टेंबर रोजी पहाटे १:४१ वाजता सुरू होणार आहे. त्याच वेळी, ही तारीख ७ सप्टेंबर रोजी रात्री ११:३८ वाजता संपेल. त्यामुळे पितृपक्ष रविवार, ७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. तो सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच २१ सप्टेंबर २०२५ रोजी संपेल. यावेळी तृतीया आणि चतुर्थी तिथीचा श्राद्ध एकाच दिवशी केला जाईल. पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध सुरू होण्यापूर्वी पितृपक्ष अमावस्येला कुश स्वीकारला जातो. त्यानंतर, प्रोष्टपदी पौर्णिमा तिथीला प्रथम श्राद्ध केले जाते. (Top Marathi Headline )
पितृपक्ष म्हणजे काय?
पंचांगानुसार, भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावस्येपर्यंतच्या कालावधीला ‘पितृपक्ष’ म्हणतात. महालया देखील पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्व पितृ अमावास्यापासून सुरू होते. पितृपक्षाच्या या १५ दिवसांच्या काळात, पितरांसाठी विधी केले जातील, ज्यांना तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान म्हणतात. पितरांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो, ज्यामुळे जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि समृद्धी टिकून राहते. पितृपक्षातील पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध विधी केले जातात. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल तर तो अमावस्या तिथीला श्राद्ध कर्म करू शकतो. या दिवसाला सर्वपित्री श्राद्ध योगदेखील म्हणतात. (Todays Marathi Headline)
पितृ पक्ष २०२५ च्या तारखा
1) पौर्णिमा तिथी श्राद्ध – रविवार 7 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल
2) प्रतिपदा तिथी श्राद्ध – सोमवार 8 सप्टेंबर 2025
3) द्वितीया तिथी श्राद्ध – मंगळवार ९ सप्टेंबर २०२५
4) तृतीया तिथी श्राद्ध \ चतुर्थी तिथी श्राद्ध – बुधवार १० सप्टेंबर
5) भरणी तिथी आणि पंचमी तिथी श्राद्ध – गुरुवार ११ सप्टेंबर
6) षष्ठी तिथी श्राद्ध – शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५
7) सप्तमी तिथी श्राद्ध – शनिवार १३ सप्टेंबर २०२५
8) अष्टमी तिथी श्राद्ध – रविवार १४ सप्टेंबर २०२५
9) नवमी तिथी श्राद्ध – सोमवार १५ सप्टेंबर २०२५
10) दशमी तिथी श्राद्ध – मंगळवार १६ सप्टेंबर २०२५
11) एकादशी तिथी श्राद्ध – बुधवार १७ सप्टेंबर २०२५
12) द्वादशी तिथी श्राद्ध – गुरुवार १८ सप्टेंबर २०२५
13) त्रयोदशी तिथी/माघ श्राद्ध – शुक्रवार १९ सप्टेंबर २०२५
14) चतुर्दशी तिथी श्राद्ध – शनिवार २० सप्टेंबर २०२५
15) सर्वपितृ अमावस्या श्राद्ध – रविवार २१ सप्टेंबर २०२५ रोजी केले जाईल
पितृपक्षाची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार फार पूर्वीची गोष्ट आहे. महाभारतातील योध्दा कर्ण ज्याला दानवीर कर्ण असे देखील म्हणतात. याने आपले संपूर्ण जीवन दानधर्म, परोपकार आणि सत्कर्म करण्यात घालवले. कर्ण हा सूर्यपुत्र होता, आणि एक महान दानवीर म्हणून प्रसिद्ध होता. (Latest Marathi Headline)
=========
Ashtavinayak : अष्टविनायकातील सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मक
Ashtavinayak : अष्टविनायकातील सातवा गणपती – महडचा वरदविनायक
=========
कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा स्वर्गात प्रवेश झाला, पण तिथे त्याला जेवण म्हणून फक्त सोनेच मिळत होते – सोन्याचे अन्न, सोन्याचे फळ इत्यादी. त्याला खूप आश्चर्य वाटले आणि ते अन्न त्याला खाता येत नव्हते. तेव्हा कर्णाने यमराजांना विचारले, “मी इतके दान धर्म केले, माझ्यासारख्या दानी व्यक्तीला हे सोन्याचे अन्न का खाण्यासाठी दिले जात आहे? मी नेहमीच गरीबांना मदत केली आहे.” त्यावर यमराज म्हणाले, “हो, तू आयुष्यभर अन्न, धन, वस्त्रे सर्व काही दान केलेस, परंतु तू कधीच तुझ्या पूर्वजांना अन्नदान केले नाहीस, त्यांचे श्राध्द केले नाहीस. त्यामुळे तू स्वर्गात असूनसुद्धा अन्नास मुकला आहेस.” (Top Trending News)
कर्णाला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला. त्याने यमराजांना प्रार्थना केली की त्याला काही काळ पृथ्वीवर परत जाऊन पितरांसाठी श्राध्द करण्याची परवानगी द्यावी. यमराजांनी त्याला १६ दिवसांची कालावधी दिला, ज्यामध्ये कर्णाने आपल्या पूर्वजांसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राध्द केले. तेव्हापासून हे १६ दिवसाचे पितृपक्ष सुरु झाले असे म्हणतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics