उत्तरप्रदेशमधील गया येथे सध्या एका मेळ्याची तयारी सुरु आहे. काही दिवसातच सुरु होणा-या पितृपक्षामध्ये गया येथे हा मेळा भरतो. या मेळ्यामध्ये फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातील हिंदू आवर्जून हजेरी लावतात. आपल्या पूर्वजांचे पिंडदान करण्यासाठी येथे लाखो लोक येतात. गया येथील या पितृपक्ष मेळ्यासाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. 6 ते 21 सप्टेंबर दरम्यान होणा-या या पितृपक्ष मेळ्यासाठी यावर्षी किमान 10 लाख भाविक येतील अशी माहिती आहे. त्यांच्यासाठी निवासस्थाने आणि भोजनगृहांसह पिंडदान स्थळांचीही सोय करण्यात येत आहे. (Uttar Pradesh)

पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरु होत आहे. या पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे पिंडदान कऱण्याची प्रथा हिंदू धर्मामध्ये आहे. यामागे मृत पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष देणे आणि त्यांना स्वर्गप्राप्तीचा मार्ग मोकळा करणे हा उद्देश असतो. यामुळे पूर्वजांना सांसारिक आसक्तींपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते असे मानले जाते. पिंडदान विधी हा नदीकिनारी किंवा पवित्र नद्यांच्या संगमावर होतो. त्यातही उत्तरप्रदेश येथील गया, प्रयागराज आणि हरिद्वार सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये पिंडदानाचे विशेष महत्त्व आहे. यामध्येही गयामध्ये दरवर्षी पिंडदान मेळाच भरतो. यासाठी फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील हिंदू धर्मीय या गयामध्ये जमतात. (Social News)
पितृपक्षासाठी आता गया येथे तयारी सुरू आहे. यावर्षी पितृपक्ष 6 सप्टेंबरपासून सुरू होत असून 21 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष आहे. या दरम्यान गया येथे 16 दिवसांचा मेळा भरतो. त्याला पितृपक्ष मेळा म्हणतात. या मेळ्यासाठी लाखो भाविक गयामध्ये येतात. दरवर्षी ही संख्या वाढत असून आत्तापर्यंत यासाठी किमान 10 लाख भाविकांनी नोंद केली आहे. मात्र पुढच्या काही दिवसात यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या भाविकांच्या निवा-याची सोय करण्याचे काम या भागात सुरु आहे. गया जिल्हा प्रशासन मेळ्याची तयारी करत आहे. (Uttar Pradesh)
मेळा परिसरात विष्णुपाद आणि विविध पिंड वेदींमध्ये तयारी करण्यात येत आहे. यासाठी अनेक भाविकांनी आधीपासूनच बुकींग केले आहे.
गयामध्ये 54 पिंड स्थळे आहेत येथेच पूर्वजांचे पिंड दान आणि तर्पण केले जाते. यामध्ये 45 पिंड वेदी आणि 9 तर्पण स्थळे आहेत. याच परिसरात देशविदेशातून येणा-या भाविकांसाठी निवासस्थानांची सोय करण्यात येत आहे. येथे 18 हजाराहून अधिक निवासस्थाने उभारण्यात येत आहे. शिवाय शहरातील गांधी मैदानात 2500 लोकांच्या मोफत राहण्यासाठी एक तंबू शहर बांधले जात आहे. याशिवाय 132 हॉटेल, गेस्टहाऊस आणि खाजगी इमारतीमध्येही भाविकांच्या राहण्याची सोय कऱण्यात येणार आहे. गयामध्ये मोठ्या संख्येने येणा-या भाविकांना सोयीचे व्हावे म्हणून टॅक्सी, ऑटो रिक्षा, ई-रिक्षा, रिंग बसचे भाडे निश्चित करण्यात आले असून त्याचे बोर्डही शहरात लावण्यात आले आहेत. गया येथील फाल्गु नदीमधील कचरा साफ करणाऱ्या बोटी वापरल्या जाणार आहेत. (Social News)

यासर्वात प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये भाविकांची संख्या मोजण्यासाठी जी आधुनिक प्रणाली लावण्यात आली होती, तशीच प्रणाली आता गयामध्येही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे चेह-यावरुन भाविकांची ओळख करता येणार आहे. सोबतच रेल्वे स्थानक परिसरात यात्रेकरूंसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये स्थानिक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. शिवाय भाविकांना स्वस्त दरात चांगले भोजन मिळावे, या हेतूने विविध ठिकाणी जीविका दीदी स्टॉल उभारण्यात येत आहेत. (Uttar Pradesh)
=======
Ekadshi : भाद्रपदामध्ये येणाऱ्या परिवर्तिनी एकादशीचे महात्म्य
=======
गया व्यतिरिक्त प्रयागराजमध्ये पितृपक्षाचा मोठा मेळा भरतो. प्रयागराजमध्ये भाविक गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर त्यांच्या पूर्वजांच्या साठी पिंडदान आणि तर्पण करतात. गंगा-यमुनेच्या संगमावर पूर्वजांसाठी तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय वाराणसी येथे गंगा नदीच्या काठावरही पूर्वजांसाठी पिंडदान आणि तर्पण करण्याची प्रथा आहे. येथेही पितृपक्षामध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात. या सर्वच ठिकाणी आता स्थानिक प्रशासनातर्फे तयारी सुरु करण्यात आली आहे. सध्या उत्तरप्रदेशमधील नद्यांमध्ये पूर आलेला आहे. गंगा नदीच्या पूराचे पाणी ओसरु लागल्यामुळे नदी परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ दिसत आहे. यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून आरोग्य पथकालाही दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
